11 Dec 2023, 22:39 वाजता
उद्यापर्यंत उलट तपासणी पूर्ण करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय मूदतीपूर्वीच लागण्याची शक्यता आहे. 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपूर्वीच निकाल येण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत उलट साक्ष पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या वकिलांना दिले आहेत. उद्या शिंदे गटाचे दीपक केसरकर, राहुल शेवाळे आणि अखेर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची उलट साक्ष नोंदवण्यात येणार आहे. 13 ते 15 डिसेंबर दरम्यान लेखी युक्तिवाद होणार असून 16 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी होणार आहे. तर 20 डिसेंबरनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सुप्रीम कोर्टानं 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुदतपूर्व निकाल येण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
11 Dec 2023, 19:10 वाजता
महाराष्ट्रातील कॅसिनो नियंत्रण कायदा रद्द करत असल्याची फडणवीसांची घोषणा
Fadanvis on Casino Act : महाराष्ट्रातील कॅसिनो नियंत्रण कायदा अखेर रद्द करण्यात आलाय... उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली... 1976 साली याबाबतचं विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही... आता कॅसिनो नियंत्रण कायदा रद्द करत असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
11 Dec 2023, 18:19 वाजता
गोळीबारात गजानन तौर यांचा मृत्यू झाल्याची माहिती
Jalna Firing : जालन्यात गजानन तौर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडलीये. गजानन तौर हे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शहरातील मंठा चौफुलीवर काही अज्ञातांनी गजानन तौर यांच्यावर गोळीबार केलाय. या गोळाबारात तौर यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गजानन तौर हे रामनगर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होते. पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी तौर यांच्या दिशेनं गावठी पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
11 Dec 2023, 18:04 वाजता
आमदारांच्या बैठकीत मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तब
New CM of Madhya Pradesh : मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत... भोपाळमध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. मोहन यादव मध्य प्रदेशात माजी उच्च शिक्षणमंत्री होते. दक्षिण उज्जैनमधून मोहन यादव आमदार आहेत. ओबीसी नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
11 Dec 2023, 17:47 वाजता
कोर्टाचा आजचा निर्णय हा मैलाचा दगड- फडणवीस
Fadanvis Live | Marathi News LIVE Today : 370चा निर्णय कायम राहिल्यानं भारताचा विजय असल्याची उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. हा काश्मीरच्या लोकांचा विजय, भारताचा विजय झालाय असं फडणवीस यांचं वक्तव्य.
जम्मू-काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असं फडणवीस म्हणाले. कोर्टाचा आजचा निर्णय हा मैलाचा दगड, भारताचा मुकूट चमकत राहिल असं फडणवीस यांचं विधान.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
11 Dec 2023, 16:16 वाजता
तुळजाभवानीचं सोनं-चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेला हायकोर्टाची स्थगिती
HC on Tuljabhavani Gold : तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलंलं सोनं आणि चांदी वितळवण्याच्या प्रक्रियाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. विधी आणि न्याय विभागानं या प्रक्रियेला परवानगी दिली होती. मात्र त्याला काही भाविक आणि पुजाऱ्यांनी विरोध केलाय. 2009 पासून तुळजाभवानी देवीच्या चरणी 207 किलो सोनं आणि 2 हजार 570 किलो चांदी जमा आहे. कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत प्रक्रियेला स्थगिती दिलीय, पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणारंय.
11 Dec 2023, 14:03 वाजता
मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती बिघडलीय. धाराशिवमधल्या माकणीमध्ये जरांगेंची सभा सुरू होती. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडलीय. भाषण सुरू असताना जरांगेंना चक्कर आली. जरांगे यांना अशक्तपणा जाणवतोय. जरांगेनी अखेर व्यासपीठावर खाली बसून भाषण केलं. डॉक्टरांनी व्यासपीठावर येऊन जरांगेंची तपासणी केली. जरांगेंना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. जरांगेंनी पुढचे 5 दिवस विश्रांती घेतली नाही, तर किडनीवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
11 Dec 2023, 13:20 वाजता
'ठाकरेंबद्दल सामंतांचा दावा खोटा', खासदार संजय राऊतांचं वक्तव्य
Sanjay Raut on Uday Samant : आमदार अपात्रता सुनावणीत उदय सामंतांनी गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय...2019 साली मविआ सरकारमध्ये शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं...शिंदेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंना भेटलो त्यावेळी आश्वासन दिल्याने मी मंत्रिमंडळात सामील झाल्याचा दावा सामंतांनी केलाय...यावर राऊतांनी प्रतिउत्तर दिलंय...कोणतंही सरकार आलं तरी सत्तेत राहणं हाच सामंतांचा हेतू आहे...आमचं सरकार आल्यावर ते आमच्याही दारात येतील...मात्र, त्यांना आम्ही घेणार नसून, त्यांचा दावा खोटा असल्याचं राऊतांनी म्हटलंय...
11 Dec 2023, 13:01 वाजता
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'शेतीसाठी नाशिक जिल्हा महत्त्वाचा','धोरण ठरवण्यांकडून मात्र शेतीला किंमत नाही','शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही','कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत नाही','कांदा पिकवणारा शेतकरी लहान आहे','नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल','अर्थव्यवस्थेत नाशिकच्या शेतकऱ्यांची नोंद','त्याला काही पैसा मिळाला तर दंगा करायचं कारण नाही','महाग आहे तर कोण म्हणतो मग तुम्हाला कांदा खा?','आंदोलनाशिवाय दिल्लीला कळत नाही','कांदा निर्यातबंदी सरकारनं उठवलीच पाहिजे', शरद पवार यांचं वक्तव्य.
11 Dec 2023, 12:34 वाजता
Vijay Wadettiwar Live | Marathi News LIVE Today : 'राज्यात दुष्काळ जाहीर करावा','दुष्काळ जाहीर करण्यासाठी पत्रं दिली','वारंवार मागणीनंतर दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर','40 तालुकेच फक्त दुष्काळ घोषित केले','बैल गेला आणि झोपा केला','सत्ताधारी आमदार पाहून दुष्काळ जाहीर होतो ','विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप.