Breaking News Live Updates: स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF जवानाला मारली थप्पड

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

Breaking News Live Updates: स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF जवानाला मारली थप्पड

Maharashtra Breaking News Today: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबरोबरच वरळीमधील हिट अँड रन प्रकरण आजही गाजण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आजही तिव्र ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी देशातील अनेक भागांमध्ये पाऊस कोसळतोय. या आणि अशाच सर्व बातम्यांसंदर्भातील अपडेट्स आपण या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहेत. क्षणोक्षणाच्या लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा.

11 Jul 2024, 22:22 वाजता

स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF जवानाला थप्पड लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जयपूर विमानतळावरची ही घटना असून सुरक्षा तपासणीवरुन वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. 
थप्पड लगावणाऱ्या स्पाईसजेटच्या महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्याने अयोग्य भाषेचा वापर केल्याचा स्पाईसजेटचा दावा आहे. 'ड्युटी संपल्यावर घरी येऊन भेट' असं महिलेला सागितल्याचा आरोप जवानावर करण्यात आलय. महिला कर्मचाऱ्यांसोबत उभे राहण्याचा स्पाईसजेटने निर्णय घेतलाय.

 

11 Jul 2024, 19:09 वाजता

छगन भुजबळांना राज्यात जातीय दंगली घडवायच्या आहेत असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय. नावं सांगणार त्याला विधानसभेला पाडायचं म्हणजे पाडायचं. असं जाहीर आवाहन मनोज जरांगेंनी उपस्थित मराठा समाज बांधवांना केलंय. बीडमधील रॅलीत भाषणादरम्यान त्यांनी हे आवाहन केलंय.

11 Jul 2024, 17:47 वाजता

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची आज बीडमध्ये जनजागृती रॅली होतेय. या रॅलीसाठी मोठ्या संख्येने तरुण सहभागी झालेयत. रॅलीमध्ये तीन हजारांहून अधिक स्वयंसेवक नेमण्यात आलेयत. सगेसोयरेंच्या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम आहेत. या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी मराठा तरुण रॅलीत सहभागी झालेयत. बीड जिल्ह्याने सर्वांची हवा टाईट केली असून रॅलीला रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली निघणार आहे...सुभाष रोड, माळीवेस चौक, अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणाराय...त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य अशी जाहीर सभा देखील होणाराय...रॅलीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय..

 

11 Jul 2024, 14:55 वाजता

बीकेसीमधील पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेसचा राडा; अदानींविरोधातील आंदोलनादरम्यान घडला प्रकार

मुंबईतील बीकेसीमधील पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेसने राडा केला आहे. अदानींविरोधात वीज बीलदरवाढीविरुद्ध काँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान हा प्रकार घडला आहे.

11 Jul 2024, 13:13 वाजता

मुस्लिम आरक्षणावरुन अबू आझमींचा महाविकास आघाडीला टोला

अबू आझमी यांनी विधानसभेमध्ये मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. "मराठा आरक्षण बाबत चर्चा होते मुस्लिम समाजाला आरक्षण आम्हला दिलं जात नाही," असं आझमी म्हणाले. महाविकास आघाडीला टोला लगावताना अबू आझमींनी, "जे आमची मत घेतात ते हि आरक्षणावर काही बोलत नाहीत," असंही म्हटलं. 

11 Jul 2024, 13:13 वाजता

धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही: मुनगंटीवार

अबू आझमींनी उपस्थित केलेल्या मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, "मुस्लिम धर्मातील काही जातींना आरक्षण आहेच.  धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. मुस्लिम धर्मातील गरीब जातींना आरक्षण दिल गेलं आहे," असं म्हटलं आहे. 

11 Jul 2024, 13:01 वाजता

...तर कोणालाही अर्बन नक्षल म्हणून अटक होईल : पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये आज जनसुरक्षा विधेयकावरुन सरकारला प्रश्न विचारला आहे. "जनसुरक्षा विधेयक सरकार आणत आहे. त्याची एवढी तातडीने गरज आहे ‌का?" असं पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारलं आहे. "हा कायदा जर पास झाला तर कोणालाही अर्बन नक्षल म्हणून अटक करता येईल. हे निवडणुकीच्या तयारीसाठी आहे का‌? ते विधेयक तरी उपलब्ध करुन द्यावे," अशी मागणी त्यांनी केली.

11 Jul 2024, 13:01 वाजता

'कल्याणजवळ 7000 कोटींचा घोटाळा; एका बिल्डरने...'

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कल्याण जवळील एका कथित 7 हजार कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात धक्कादायक दावा विधानसभेत केला आहे. "कल्याणजवळच्या एका गावात 63 एकर शासकीय जमीन बिल्डरच्या घशात घातली आहे. 7000 कोटींचा घोटाळा झाला आहे. बिल्डरने ही जमीन ताब्यात घेवून 30 हजार कोटींचा प्रकल्प राबवत आहे," असं वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणामध्ये सरकारने लक्ष घालावं असे निर्देश दिलेत.

11 Jul 2024, 12:16 वाजता

Mumbai Rains: मुंबईसाठी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे

पुढील 4 ते 5 तासांत मुंबईमध्ये  काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील 4 तास मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत. मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

 

11 Jul 2024, 11:15 वाजता

वरळी हिट अँड रन प्रकरण : धक्कादायक खुलासा! अपघाताच्या आदल्या रात्री...

वरळी हिट अँड रन प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातापूर्वी मिहीर आणि त्याच्या मित्रांनी 12 मद्यपान केले होते असे पोलीस चौकशी समोर आले आहे. मिहीर शाह याने आपघात करण्यापूर्वी दारूचे अनेक पेग पोटात रिचवले होते. आदल्या रात्री म्हणजे शनिवारी रात्री  आरोपी मिहिर आणि त्याच्या मित्रांनी जुहूतल्या बारमध्ये 12 विस्कीचे पेग रिचवले होते. अपघाताच्या 4 तास आधी मिहीर शहा आणि मित्रांनी विस्कीचे 12 पेग प्यायल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. वयाची 25 वर्षे पूर्ण नसतानाही आरोपीला विस्की देण्यात आली होती म्हणूनच बारवर कारवाई करण्यात आली होती.