Sanjay Gaikwad : '...एकनाथ शिंदेंना जीव मारण्याचा कट', शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Sanjay Gaikwad : '...एकनाथ शिंदेंना जीव मारण्याचा कट', शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप

11 Oct 2023, 23:22 वाजता

गुजराती फलक तोडफोडप्रकरणी, ठाकरे गटाच्या 3 शिवसैनिकांना अटक

 

Vandalism of Gujarati board : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये गुजराती बॅनर तोडल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या तीन शिवसैनिकांना अटक करण्यात आलीय. मुंबई महापालिकेच्या तक्ररीवरून ही अटकेची कारवाई करण्यात आलीय. घाटकोपरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्यानातील गुजराती भाषेत लिहिलेला बोर्ड फोडला. घाटकोपर पूर्वेत उद्यानात 'मारू घाटकोपर' या बोर्डवरून संताप व्यक्त होत होता.  या बोर्डवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. हे नाव काढून टाकण्याची मागणी मनसेनेही केली होती. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत हा बोर्ड फोडून टाकला आणि माझं घाटकोपर असं ठसठशीत मराठीत लिहिलेला बोर्ड झळकावला होता.

11 Oct 2023, 20:20 वाजता

ललीत पाटीलचं खासदार हेमंत गोडसेंसोबत संबंध- सुषमा अंधारे 

 

Sushma Andhare on Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्यानंतर सुषमा अंधारेंनी आता शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनाही लक्ष्य केलंय. ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा हेमंत गोडसेंसोबत फोटो असून याचीही माहिती समोर यायाला हवी असं सुषमा अंधारे यांनी म्हंटलंय. ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमध्ये 9 महिने अॅडमिट होता त्याला नेमका कोणता आजार होता? कुणाच्या आशीर्वादानं त्याला रूग्णालयात इतके दिवस ठेवण्यात आलं असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.  

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Oct 2023, 19:35 वाजता

ड्रग्ज माफियाला ललित पाटीलला पोलिसांची मदत?

 

Lalit Patil Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी नवं सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांच्या हाती लागलंय.. ललित पाटील स्वतःहून पळाला की, त्याला पळायला पोलीस कर्मचा-यांनी मदत केली, असा सवाल हे सीसीटीव्ही पाहिल्यानंतर उपस्थित होतोय... ससून हॉस्पिटलमधून पळून ललित ज्या हॉटेलमध्ये पोहोचला, त्याच हॉटेलमध्ये अवघ्या एका तासात काळे नावाचा पोलीस कर्मचारी पोहोचल्याचं नव्या सीसीटीव्हीतून स्पष्ट होतंय... आपल्या हाताला झटका देऊन ललित पळाल्याचा दावा काळेनं केला होता... मात्र या सीसीटीव्हीमुळं पोलीस कर्मचारीच संशयाच्या भोव-यात सापडलाय. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाली ७ वाजून ४७ मिनिटाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. ससूनमधील पोलिसांना मॅनेज करून ललित पाटील अनेकदा त्याच हॉटेलमध्ये जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... याच प्रकरणावरुन पुण्यातले आमदार रवींद्र धंगेकर यांनीही प्रश्न उपस्थित केलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Oct 2023, 19:08 वाजता

तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात रोमन साम्राज्यातील दागिने

 

Tuljabhavani Khajina : तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात रोमन साम्राज्यातील दागिने आढळून आले आहेत. हे दागिने आठव्या शतकातील असल्याचं सांगण्यात येतंय. यात सर्वोच्च कॅरेटचा हिराही आढळलाय. तसच शिवकालीन जगदंबा लिहिलेला अलंकारही सापडलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Oct 2023, 18:27 वाजता

मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवे उद्या वाहतुकीसाठी बंद

 

Mumbai-Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर उद्या दुपारी १२ ते १ या वेळेते वाहतूक बंद राहणार आहे. गँट्री बसवण्याचं काम असल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते १ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. गँट्री बसवण्याचं काम पूर्ण झाल्यावर मुंबईकडे जाणारी वाहतूक खुली कऱण्यात येईल 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 Oct 2023, 18:12 वाजता

शिंदे गटाचा दसरा मेळावा क्रॉस मैदानात

 

Shinde Group on Dasra Melava : शिवसेना शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा मुंबईतील क्रॉस मैदानात होणाराय... झी २४ तासनं पाच दिवसांपूर्वीच याबाबतची बातमी दिली होती... त्या बातमीवर आज शिक्कामोर्तब झालं... शिवसेनेचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर घेण्याचा निर्णय शिंदे गटानं घेतलाय.. गेल्यावर्षी बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता. मात्र मेट्रोच्या कामामुळं यंदा दसरा मेळाव्यासाठी क्रॉस मैदानाची जागा निश्चित करण्यात आलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Oct 2023, 17:38 वाजता

संभाजीनगरमध्ये 300 वर्ष जुन्या भांड्यांवर जातीचा उल्लेख

 

Kunbi Certificate  : संभाजीनगरमध्ये शिंदे समितीची बैठक झाल्यानंतर नागरिकांनी कुणबी जातीचे पुरावे असल्यास ते द्यावे असं आवाहन केलं होतं, त्यानुसार संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात लोक पुरावे घेऊन येतायेत. कुणी जुने कागद आणतायेत तर कुणी निजामकाली दस्तऐवज सादर करतायेत..संभाजीनगरच्या बेगमपुरात भागात राहणा-या लोकांनी चक्क 300 वर्ष जुनी भांडी पुरावे म्हणून आणली आहेत, त्यावेळी भांड्यावर जात लिहिण्याची पद्धत होती असा त्यांचा दावा आहे. त्या भांड्यांवर जातही लिहण्यात आलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Oct 2023, 17:08 वाजता

उद्धव ठाकरेंविरोधात असे आरोप सहन करणार-  चंद्रकांत खैरे 

 

Chandrakant Khaire : उद्धव ठाकरेंविरोधात असे आरोप सहन करणार नसल्याचा इशारा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलाय. एकनाथ शिंदेचं असले कटकारस्थानं करत फिरतात असा पलटवार त्यांनी केलाय. तर गायकवाडांचा आरोप खोटा असल्याचं आमदार संजय पाडवी यांनीही म्हटलंय.

 

11 Oct 2023, 16:49 वाजता

Z+सुरक्षा देऊ नका, ठाकरेंनी सांगितलं- शंभूराज देसाई

 

Shambhuraj Desai : एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट आखण्यात आला होता, या संजय गायकवाडांच्या आरोपांना तत्कालिन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दुजोरा दिलाय... शिंदेंना Z+ सुरक्षा देण्याबाबत बैठक झाली... मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. अशाप्रकारे Z+ सुरक्षा देता येणार नाही, असं ठाकरेंनी सांगितलं, अशी माहिती देसाईंनी झी २४ तासशी बोलताना दिली...

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

11 Oct 2023, 15:57 वाजता

एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट- संजय गायकवाड 

 

Sanjay Gaikwad :  एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट आखण्यात आला होता  असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे खासदार संजय गायकवाड यांनी केलाय. शिंदे बाहेर पडले नसते तर शिंदेंचा घात झाला असता. शिंदेंना ठाकरेंनी Z+ सुरक्षा का नाकारली? असा सवाल खासदार संजय गायकवाड यांचा सवाल.

बातमीचा व्हिडीओ पाहा-