Sanjay Gaikwad : '...एकनाथ शिंदेंना जीव मारण्याचा कट', शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Sanjay Gaikwad : '...एकनाथ शिंदेंना जीव मारण्याचा कट', शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप

11 Oct 2023, 08:40 वाजता

तलाठी भरती परीक्षेचा 15 डिसेंबरला निकाल

 

Talathi Exam : तलाठी भरती परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर ठरलीये.. 15 डिसेंबरला तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचं भूमी अभिलेख विभागानं ठरवलंय.. या सर्व उत्तिर्ण उमेदवाराना नव्या वर्षात 15 ऑगस्टला नियुक्तिपत्र देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीनं नियोजन करण्यात आलंय.. तलाठी भरती परीक्षेनंतर उत्तरतालिकांवरील हरकती घेण्याची मूदत 8 ऑक्टोबरला संपली. या हरतकी टीसीएस कंपनी कडून एकत्र केल्या जात आहेत. यातील योग्य हरकतींचं 3 नोव्हेंबरपर्यंत निराकरण केलं जाणार आहे. ही सर्व प्रक्रीया पार पडल्यानंतर 15 डिसेंबरला परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2023, 08:11 वाजता

लेझर शोविरोधात ग्राहक पंचायतीची हायकोर्टात धाव

 

Grahak Panchayat In High Court : मिरवणुकीत घातक लेझर बीमच्या विरोधात ग्राहक पंचायतीने मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीये. गणेशोत्सवात डीजे आणि लेझर बीममुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यासंदर्भात राज्य शासन जोपर्यंत नियमावली विकसित करत नाही आणि त्याची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी धोकादायक लेझर बीम विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी आणावी, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2023, 07:47 वाजता

ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा

 

High Court On Sarpanch Reservation : राज्यातल्या दोन हजारांवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. कारण सध्या असलेल्या आरक्षणानुसारच ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.. राज्यभरातल्या सरपंचपदाचे आरक्षण नव्याने निश्चित करा आणि हे आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाऊ देऊ नका असे आदेशही हायकोर्टाने दिलेत.. नागपूर जिल्ह्यात सरपंचपदाचं आरक्षण 50 टक्क्यांवर केल्याने हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. त्यावर हायकोर्टाने हा निर्णय दिला.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2023, 07:44 वाजता

महायुतीत समित्यांचं वाटप ठरलं

 

Mahayuti Formula : सरकारमधील तीन पक्षांमध्ये महामंडळ, विधिमंडळ समिती वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालाय...भाजपला 50% तर शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी 25% जागा मिळणार आहेत...काल झालेल्या बैठकीत समित्यांचे अध्यक्ष, सदस्यांची नावं निश्चित झाली असून विधिमंडळ समिती अध्यक्षांची यादी अध्यक्षांकडे देण्यात आलीय...समित्यांच्या सदस्यांमध्ये फक्त सत्तारूढ पक्षाच्या आमदारांचा समावेश न करता विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही स्थान देण्याची भूमिका घेण्यात आलीय...तसंच समिती आणि महामंडळांचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आता महायुती निवडणुकांच्या तयारीला लागलीय...मविआच्या वज्रमूठ सभेप्रमाणे महायुतीचे संयुक्त मेळावे घेतले जाणार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा -