Sanjay Gaikwad : '...एकनाथ शिंदेंना जीव मारण्याचा कट', शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Sanjay Gaikwad : '...एकनाथ शिंदेंना जीव मारण्याचा कट', शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप

11 Oct 2023, 15:39 वाजता

भारताचा मोस्ट वॉन्टेड पाकिस्तानात दहशतवादी ठार

 

Terrorist Killed in Pathankot : भारताला हवा असणाऱ्या दहशतवाद्याला पाकिस्तानात गोळ्या घालून ठार करण्यात आलंय. जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या शाहिद लतिफ या दहशतवाद्यावर सियालकोटमध्ये गोळीबार करण्यात आला. सात वर्षापूर्वी पठाणकोट वायूदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा तो सूत्रधार होता. तो NIA च्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. एका मशिदीत शाहिदची हत्या करण्यात आलीय. दोन हल्लेखोर मोटारसायकलवरून आले. त्यांनी शाहिदवर गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Oct 2023, 14:11 वाजता

Supriya Sule Live | Marathi News LIVE Today : 'हेडगेवारांच्या नावानं मतं मिळत नाहीत, त्यांना कळलं', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला. 'देशमुखांनी गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलं', 'पालकमंत्री ठरवायला शिंदे दिल्लीत जातात', 'फडणवीस गृहमंत्री होताच नागपुरात गुन्हे वाढतात', 'राज्याची परिस्थिती गंभीर', सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला.

 

11 Oct 2023, 13:20 वाजता

10वी-12वी परीक्षा शुल्कात 10% वाढ

 

SSC-HSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात १० टक्के वाढ करण्यात आलीय.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतलाय..पुढील वर्षीच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेत ही शुल्क वाढ होणारंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2023, 13:18 वाजता

नबाम रेबिया केसचा सुप्रीम कोर्ट पुनर्विचार करण्यास तयार

 

Nabam Rebia Case : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार झालंय...उद्या सात न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाने तेव्हा हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या बेंचकडे जावं अशी विनंती केली होती. एका अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसने विधानसभा अध्यक्षांचे अपात्रतेबाबतचे अधिकार बाध्य होतात की नाहीत याचा फैसला होणार आहे...शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडलं त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असेल...मात्र, यामुळे सत्तासंघर्षाची सुनावणी आता लांबणीवर जाणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2023, 12:17 वाजता

नागपुरात सापडली देवीची मूर्ती?

 

Nagpur : नागपूरच्या समता नगर परिसरात खोदकाम करताना देवीची मूर्ती सापडल्याचा दावा करण्यात आलाय.. देवीचा मुखवटा असलेली मूर्ती आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केलीय.. खोदकामादरम्यान आढळलेली मूर्ती बाहेर काढून लोकांनी पूजा करायलाही सुरुवात केलीय. दर्शनासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याने घटनास्थळी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय.. मूर्तीबाबत अनेक प्रकारचे दावे करण्यात येत असले तरी झी २४ तास या व्हिडिओची कोणतीही पुष्टी करत नाही...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2023, 12:07 वाजता

हमास-इस्रायल युद्धावरील पोस्ट मिया खलिफाला भोवली

 

Mia Khalifa : हमास-इस्रायल युद्धावरील पोस्ट करणं पॉर्नस्टार मिया खलिफाला चांगलंच भोवलंय..मिया खलिफाने पॅलेस्टाईनच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती...त्यानंतर सोशल मीडियावर वेगळचं वॉर सुरू झालं... तिच्या पोस्टमुळे प्लेबॉय कम्युनिटीने मियासोबतचं नातं संपवलंय...तिचं चॅनलही डिलीट केलंय....एवढंच नाही तर कॅनडाचा ब्रॉडकास्टर शापिरोनेही मियाला डीलमधूनही बाहेरचा रस्ता दाखवलाय...शापिरोचा मिया खलिफासोबतचा करार अंतिम टप्प्यात होता...मात्र एका वक्तव्यामुळे तीचं कोट्यवधींचं नुकसान झालंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2023, 10:52 वाजता

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत उद्या सुनावणी

 

Thackeray Vs Shinde : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत उद्याच सुनावणी होणार आहे...विधानसभा अध्यक्षांकडून वेळापत्रकात बदल करण्यात आलाय...ही सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार होती...मात्र, एकदिवस आधीच ही सुनावणी घेतली जाणार आहे...सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या अशी मागणी ठाकरे गटाने केलीय...यावर उद्या दुपारी दोन वाजता विधान भवनात सुनावणी होणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2023, 10:00 वाजता

महादेव अ‍ॅपनंतर लायन बुक ईडीच्या रडारवर

 

Lion Book App on ED's radar : सट्टेबाजी अ‍ॅपचे नवे बॉलिवूड कनेक्शन उघड झालंय...महादेव अ‍ॅपनंतर आता लायन बुक ईडीच्या रडारवर आलंय...लाय बुक अ‍ॅपच्या सक्सेस पार्टीला अभिनेता संजय दत्त, सुनील शेट्टीसह अभिनेत्री डेझी शहा, सोफी चौधरी या कलाकारांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आलीय...महादेव अ‍ॅपनंतर आता हे नवे अ‍ॅप समोर आलं असून, त्यात झालेले व्यवहार, त्यातील बॉलिवूडचा सहभाग या गोष्टींचा तपास आता ईडीच्या अजेंड्यावर आलाय...लायन बुक असं या अ‍ॅपचं नाव असून, महादेव अ‍ॅपप्रमाणेच भारत आणि पाकिस्तानात या अ‍ॅपच्या माध्यमातून सट्टेबाजी चालत असल्याचं समोर आलंय...महादेव अ‍ॅपप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यंत 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलीय...तसेच सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस देखील जारी केलीय...या दोघांनी आणखी काही वेबसाईट आणि अ‍ॅप तयार केल्याचा ईडीला संशय आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2023, 09:55 वाजता

मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टात नवीन याचिका दाखल

 

Maratha Reservation : मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात नवी याचिका दाखल करण्यात आलीय. आरक्षणाचं आश्वासन राज्य सरकार उपोषणकर्त्यांना कशाच्या आधारे देतंय? आरक्षण कसं देणार आहात? याचा आराखडा राज्य सरकारनं कोर्टासमोर सादर करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीय. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केलीय. मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असा सुप्रीम कोर्टाचा निकाल असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन राज्य सरकार आंदोलनकांना का देतंय असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. या याचिकेत राज्य सरकारसह, मुख्य सचिव आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनाही प्रतिवादी करण्यात आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2023, 09:36 वाजता

आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू कशामुळं?

 

Nanded Boy Death : नांदेडच्या माहुर तालुक्यातल्या शासकीय आश्रमशाळेत एका आठ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू झालाय. रोहित मुकाडे असं या मुलाचं नाव आहे. तो दुसरीत शिकत होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. माहुरच्या पांडवलेणी इथल्या आश्रमशाळेत रोहित शिकत होता. काल दुपारी त्याची तब्येत बिघडली. शिक्षक आणि कर्मचा-यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्याला दुस-या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. रोहितचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याच्या चौकशीची मागणी नातेवाईकांनी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -