Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

12 Oct 2023, 20:24 वाजता

भूषण पाटील बनवायचा आठवड्याला 50 किलो ड्रग्ज

 

Pune Sassoon Drug Case : पुणे ससून ड्रग्स प्रकरणातील आरोपी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे आठवड्याला 50 किलो एमडी ड्रग्स बनवत होते अशी माहिती समोर येतेय.. नाशिक मधील कारखान्यात दर महिन्याला २०० किलो एम डी ड्रग्सचा साठा तयार होत होता.. प्रत्येक ५० किलो एम डी ड्रग्स तयार करण्यासाठी एक आठवडा लागत होता.. एक किलो एम डी चा बाजार भाव १ कोटी रुपये आहे.. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे दोघेही मिळून नाशिकमधला कारखाना सांभाळत होते.. अभिषेक बलकवडे हा स्वतः केमिकल इंजिनियर असून एम डी ड्रग्स कसे बनवायचे याचे ज्ञान त्याला होते.. 

12 Oct 2023, 19:04 वाजता

सर्व आदिवासी आमदार राजीनामे देणार- नरहरी झिरवळ

 

Narhari Zirwal : धनगर समाजाला आदिवासीत आरक्षण देण्याविरोधात आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत. थेट आमदारकीचाच राजीनामा देण्याचा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिलाय. सर्व आदिवासी आमदार आपापल्या पक्षप्रमुखांकडे राजीनामे देणार असल्याची माहिती झिरवळांनी दिलीय. थेट आमच्या सर्टिफिकेटवरच घाला घालायला निघाल्यामुळे सर्व आदिवासी आमदार एकत्र राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एक मेंढरू सत्तेत गेलं म्हणून धनगर आरक्षण मागत असल्याचा टोला त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावलाय. 

12 Oct 2023, 18:14 वाजता

Sunil Tatkare Live | Marathi News LIVE Today : 'राऊतांनीच सांगितलं भाजपसोबत जायला ठाकरेंना विचार', 'भाजपसोबत जायचा ठाकरेंचा विचार होता?', 'पंतप्रधान भेटीवेळी ठाकरेंचा भाजपसोबत जायचा विचार', अजित गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मोठा गौप्यस्फोट..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 Oct 2023, 17:53 वाजता

समता परिषद बैठकीत मनोज जरांगेंवर निशाणा?

 

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : समता परिषदेच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळांच्या निशाण्यावर मनोज जरांगे पाटील. १०० एकरात शेती साफ करुन मैदान करताय, 7 कोटी रुपये जमा देखील केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून ? असा सवाल छगन भुजबळांनी केलाय. या सभेतून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणार आहेत. हे कदापी मान्य नाही. आपला मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध आहे. आपणही मोठे कार्यक्रम करायला हवेत,  आपण 54 टक्के आहोत म्हणजेच 7 कोटी आपण आहोत. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले म्हणजे ओबीसी श्रीमंत झाला असं नाही अजुनही झोपडपट्टीत ओबीसी समाज राहत आहेअसं विधान छगन भुजबळांनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

12 Oct 2023, 17:09 वाजता

दांडियाच्या ठिकाणी रुग्णवाहिका बंधनकारक

 

Dandia Ground : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत.दांडियात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार आहे. दांडिया खेळताना लोकं देहभान हरपून नाचतात मात्र अशाचवेळी हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना अनेकदा घडल्यात. अशी घटना घडल्यास दांडियाप्रेमींना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी आता आयोजकांनी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

12 Oct 2023, 16:50 वाजता

केटी सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे मागितले पैसे

 

Mumbai University : मुंबई विद्यापीठात राहिलेली केटी सोडवून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.. तशी लेखी तक्रार सुद्धा या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केलीय. पैसे मागणा-या कर्मचाऱ्यावर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनातचा इशारा ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून करण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

12 Oct 2023, 16:31 वाजता

राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

 

Raj Thackeray Meets CM Shinde : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचलेत. सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होतेय. टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झालेत. आणि त्याच विषयावर आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. रस्त्यांच्या स्थितीबाबत एकनाथ शिंदेंनीही याचिका केली होती ती मागे का घेतली असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत काय तोडगा निघतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

12 Oct 2023, 15:58 वाजता

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर

 

MLA  Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू झालीय... याबाबतच्या सर्व ३४ याचिका एकत्रित करून सुनावणी घ्या, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे वकील अॅड. कामत यांनी केलीय... ठाकरे गटानं यासंदर्भात ५ मुद्दे अध्यक्षांसमोर मांडले. उलटतपासणी आणि वेळकाढूपणा न करता अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटानं केलं. तर एकत्रित सुनावणी घ्यायला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केलाय... दरम्यान, प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल, असं मत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी व्यक्त केलंय...

12 Oct 2023, 15:33 वाजता

पंतप्रधान मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर

 

PM Modi on his visit to Mumbai on Saturday : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर. आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या अधिवेशनाला पंतप्रधान उपस्थित राहणार. ऑलम्पिक समितीचे अधिवेशन मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 14 ते 17 ऑक्टोबरला पार पडणार. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ व्या अधिवेशनाचे स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार. 40 वर्षानंतर दुसऱ्यांदा भारताला यजमानपद भूषवण्याची संधी मिळत आहे 

12 Oct 2023, 14:09 वाजता

Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'सरकार कुठल्या आधारावर आरक्षण देणार माहीत नाही','जयंतराव पाटील राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष''आमच्या चिन्हावर निवडून आले, भाजपसोबत गेले','भुजबळ राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले', 'राष्ट्रवादीमध्ये फूट नाही', 'भाजपचं सरकार नको ही जनतेमध्ये भावना आहे', 'बावनकुळेंना मागच्या निवडणुकीत तिकीट मिळालं नाही', 'तिकीट मिळत नाही त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणार?' शरद पवार यांचं विधान.