Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

12 Oct 2023, 14:03 वाजता

Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'भाजपसोबत जाण्याचा काहींचा आग्रह होता','सुळेंना अध्यक्ष करावं हा भुजबळांचा आग्रह होता','भुजबळांनी कबूल केलं की ते खोटं बोलले','सुप्रियांचं ते स्वप्न, मात्र ती घडणारी गोष्ट नाही','भाजप फोडाफोडी करून सत्तेत येते','महाराष्ट्रात फोडाफोडी करून सरकार पाडलं','बहुतांश राज्यात भाजप सत्तेवर नाही',
'70 टक्के  राज्यांमध्ये भाजप सत्तेवर नाही','अजित पवार मुख्यमंत्री होणार ते फक्त स्वप्न', शरद पवार यांचं वक्तव्य.

12 Oct 2023, 13:55 वाजता

Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'प्रकाश आंबेडकरांबद्दल ठाकरेंची चर्चा झाली', 'भाजपविरोधात जेवढे एकत्र येतील, त्यांना घ्यावं', 'इंडियाचं राज्य यावं यासाठी आमचे प्रयत्न', 'शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचं सरकार यावं', 'भुजबळांनीही सांगितलं भाजपबरोबर जायचं नव्हतं', शरद पवार यांची माहिती.

12 Oct 2023, 13:14 वाजता

राज्यात 5 हजार कोटींचा साखर घोटाळा- राजू शेट्टी

 

Raju Shetti : राज्यात पाच हजार कोटींचा साखर घोटाळा झाल्याचा दावा राजू शेट्टींनी केलाय...राज्यातील साखर कारखाने अतिरिक्त साखर जीएसटी न भरताच विकत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय...कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्याचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांनी हा आरोप केलाय...कारखानदार साखरेची रिकव्हरी कमी दाखवतात, त्यामुळे निर्माण झालेली अतिरिक्त साखर जीएसटी न भरताच स्थानिक बाजारपेठात विकली जाते असा आरोप त्यांनी एका पत्रकातून केलाय...सहा महिन्यांपूर्वी स्टिंग ऑपरेशनमध्ये जीएसटी न भरलेली 10 टन साखर पकडल्याचाही दावा त्यांनी केलाय...याबाबत राज्याचे साखर आयुक्त, मुख्यमंत्री आणि जीएसटी कमिश्नर यांच्याकडे तक्रार शेट्टींनी केलीय..

12 Oct 2023, 12:57 वाजता

Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'देशात खासगीकरण वाढू लागलंय','सरकारनं शासकीय शाळा दत्तक देण्यास सुरुवात केली','नाशिकमध्ये एका शाळेत गौतमीचा कार्यक्रम', कंत्राटी भरतीवरून शरद पवार यांचा सरकारवर निशाणा.

12 Oct 2023, 12:33 वाजता

शिवाजी पार्कवर ठाकरेंचा दसरा मेळावा

 

Thackeray Group Dasara Melava : शिवाजी पार्कवर यंदाही दस-याच्या मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणारेय. ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आलीय. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिलीय. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निकाला निघालाय. 24 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणारेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Oct 2023, 12:23 वाजता

कोल्हापुरात अन्न आणि औषध विभागाची मोठी कारवाई

 

Kolhapur FDA Raid : कोल्हापूरात अन्न व औषध विभागाने मोठी कारवाई केलीय. स्टेशन रोड इथल्या कोरगावकर कंपाउंड परिसरातील जवाहर प्रोडक्टसवर छापा टाकून खाद्यपदार्थ जप्त केलेत. पदार्थांच्या पाकिटावर तारीख न टाकता विक्री सुरू होती. फरसाण, केळीचे चिप्स, फिंगर चिप्स जप्त करून अशुद्ध तेलाचा मोठा साठाही जप्त केलाय. सुमारे 30 हजारांचा पदार्थ आणि मुद्देमाल केला जप्त केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Oct 2023, 11:50 वाजता

कंत्राटी भरतीवरुन सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल

 

Supriya Sule : कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सवाल विचारलाय...सगळ्याच नोक-या कंत्राटी झाल्या तर आरक्षणाचं काय?...कंत्राटी भरतीतून भ्रष्टाचार केला जातोय असा गंभीर आरोप सुळेंनी केलाय...तसंच वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा सरकारला दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Oct 2023, 11:47 वाजता

आता कॉपी करणाऱ्यांची खैर नाही

 

Exam : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतलाय...सामूहिक कॉपीसह परीक्षेत गैरप्रकारांना चाप बसविण्यासाठी विद्यार्थ्यांची सरमिसळ पद्धतीने बैठक व्यवस्था केली जाणाराय...राज्यात एकाच वेळी इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात...यात मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार घडतात...त्यामुळे तालुका आणि मोठ्या शहरांत परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या सरमिसळ पद्धतीने बैठक व्यवस्था करून कॉपी टाळण्याचा प्रयत्न आहे...यावेळी दोन किंवा जास्त केंद्र असलेल्या ठिकाणीच ही पद्धत असणार आहे...यामुळे परीक्षेत कॉपी रोखणं शक्य होणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Oct 2023, 11:17 वाजता

नवाब मलिकांना आणखी 3 महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर

 

Nawab Malik : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. मलिकांना कोर्टानं आणखी तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय. वैद्यकीय कारणास्तव जामीन वाढवून द्यावा अशी विनंती मलिकांनी कोर्टाकडे केली होती.. कोर्टांन त्यांची विनंती मान्य केलीये...मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मलिकांना 2 महिन्यांचा जामीन मंजूर झाला होता... त्याला आता दोन आठवडे बाकी होते... मात्र त्याआधीच मलिकांनी जामीन मंजूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Oct 2023, 10:35 वाजता

मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलीस भरती

 

Mumbai Police Contract Recruitment : मुंबईत आता 3 हजार कंत्राटी पोलीस भरती केली जाणार आहे...गृहखात्याने हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय...आगामी नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या मदतीला आता तीन हजार कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने गृहखात्याने हा निर्णय घेतलाय. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांतून कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यासाठी किंवा भरती प्रक्रियेपर्यंत ही पोलीस भरती केली जाणार आहे.  विशेष म्हणजे या पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटींचा निधी राखीव करण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -