Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

12 Oct 2023, 08:50 वाजता

राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

 

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणारेत. टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झालेत. आणि त्याच विषयावर आज ते मुख्यमंत्र्यांना भेटणारेत. दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृह इथं ही भेट होईल. रस्ते चांगले नसतानाही टोल वसुली सुरू आहे तर पैसा जातो कुठे असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय. रस्त्यांच्या स्थितीबाबत एकनाथ शिंदेंनीही याचिका केली होती ती मागे का घेतली असा सवाल त्यांनी केला. तसंच खराब रस्ते, टोल वसुली हे एक रॅकेट आहे असा गंभीर आरोप त्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत काय तोडगा निघतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Oct 2023, 08:47 वाजता

इस्रायलमधील भारतीयांच्या सुटकेसाठी 'ऑपरेशन अजय'

 

India Operation Ajay : इस्रायल आणि हमासमधील युद्ध सहाव्या दिवशीही सुरुय. या युद्धजन्य परिस्थितीत नोकरी, शिक्षण आणि इतर कारणांनी इस्रायलमध्ये असलेले भारतीय नागरिक अडकलेत. त्यांच्या सुटकेसाठी भारतानं 'ऑपरेशन अजय' सुरू केलंय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. इस्रायलमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय आहेत. त्यांच्या सुटकेसाठी विशेष चार्टर विमाने आणि इतर व्यवस्था करण्यात येतेय. परदेशात राहणा-या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Oct 2023, 08:36 वाजता

इस्रायलमध्ये आपत्कालीन सरकारची स्थापना

 

Israel Emergency Government : दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी इस्रायलमध्ये आपत्कालीन सरकारची स्थापना करण्यात आलीय...इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि नॅशनल युनिटी पक्षाचे नेते बेनी गँट्झ यांच्यात करार झालाय...या आपत्कालीन सरकारमध्ये नेतन्याहू, गँट्झ आणि संरक्षणमंत्री गॅलंट अशा तिघांचं मंत्रिमंडळ असणार आहे...या आपत्कालीन सरकारला विरोधकांनीही पाठिंबा दिलाय...सरकार स्थापन झाल्यानंतर नेतन्याहू कॅबिनेटने जगाच्या नकाशावरून हमासचं नाव मिटवण्याची शपथ घेतलीय...या युद्धात आतापर्यंत जवळपास 3 हजार जणांचा मृत्यू झालाय...ओलीस असलेल्यांच्या सुटकेसाठी इस्रायली फोर्सने अमेरिकेची मदत घेतलीय...तसंच अमेरिकेनं मदतीसाठी कमांडोही पाठवलेय...हे कमांडो गाझामध्ये ओलीत ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी स्पेशल ऑपरेशनसाठी काम करणार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Oct 2023, 07:46 वाजता

बिहारमध्ये रेल्वे दुर्घटना, 4 जणांचा मृत्यू, 100 जखमी

 

Bihar Train Accident : बिहारच्या बक्सरमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडलीय...नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे 23 डबे रूळावरून घसरलेयत... या रेल्वे दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय...तर 100 प्रवासी जखमी झालेयत...जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत...घसरलेले डबे रेल्वे ट्रॅकवरून हटवण्याचं काम सुरू असून, ही घटना कशी घडली...? याचा तपास केला जातोय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Oct 2023, 07:42 वाजता

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी

 

MLA Disqalification : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आजच विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी होणार आहे... राहुल नार्वेकरांकडून वेळापत्रकात बदल करण्यात आलाय...ही सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार होती...मात्र, एकदिवस आधीच ही सुनावणी घेतली जाणार आहे...सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या अशी मागणी ठाकरे गटाने केलीय...यावर आज दुपारी दोन वाजता विधान भवनात सुनावणी होणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Oct 2023, 07:39 वाजता

सत्तासंघर्षातील कळीच्या मुद्द्यावर घटनापीठात सुनावणी

 

Thackeray Vs Shinde : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार झालंय...आज सात न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या बेंचकडे जावं अशी विनंती केली होती...एका अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसने विधानसभा अध्यक्षांचे अपात्रतेबाबतचे अधिकार बाध्य होतात की नाहीत याचा फैसला होणार आहे... ही सुनावणी दीर्घकाळ चालण्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे गटाला फायदा होणार नसला तरी संभाव्य निकाल भविष्यातील राजकारणासाठी उपयुक्त ठरेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय...शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडलं त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असेल...मात्र, यामुळे आमदार अपात्र, शिवसेना पक्ष, चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर जाणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -