Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

15 Dec 2023, 22:30 वाजता

'TDR लॉबीची सुपारी घेऊन धारावी मोर्चा', उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप 

 

Devendra Fadnavis : धारावी पुनर्विकासाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं शनिवारी काढलेल्या मोर्चावरून देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्ला चढवला... टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन हा मोर्चा काढला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला... धारावी विकासाबाबत ठाकरेंची भूमिका दुटप्पी आहे. ठाकरेंच्या काळात ठरलेल्या अटी आणि शर्तींनुसारच विकासकाची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला.

15 Dec 2023, 21:53 वाजता

धारावी पुनर्विकासाविरोधात उद्या शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा

 

Mumbai Police Permission Granted to Thackeray Group March : शिवसेना ठाकरे गटाच्या उद्या होणाऱ्या धारावी बचाव मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलीय. दुपारी ४ वाजता धारावी टी जंक्शनमधून हा मोर्चा सुरू होईल. हा मोर्चा अदानींच्या बीकेसीमधल्या कार्यालयावर धडक देणार आहे. धारावीचा पुनर्विकास अदानींना दिल्याविरोधात ठाकरे गट हा मोर्चा काढणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15 Dec 2023, 20:35 वाजता

आमदार अपात्रताप्रकरणी 10 जानेवारीला ऐतिहासिक निकाल?

 

MLA Disqualification : आमदार अपात्रतेबाबत विधानसभाअध्यक्ष ऐतिहासिक निकाल देणार अशी सूत्रांची माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष 10 जानेवारीच निकाल देतील अशीही माहिती आहे. सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना निकाल देण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलीय... विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निकाल देण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली होती..निकालाचं लेखन करण्यासाठी वेळ लागणार असून, आणखी 3 आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा असा अर्ज नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टात केला होता.. यावरच सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ दिलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15 Dec 2023, 20:16 वाजता

रायगडमध्ये एमडी ड्रग्जप्रकरणी धडक कारवाई

 

Raigad MD Drugs Seized Update​ : रायगडच्या खोपोलीत MD ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. खोपोलीतील ढेकू MIDCतील एका कंपनीवर छापा टाकून पोलिसांनी MD ड्रग्ज बनवणारा कारखान्याचा भांडाफोड केला. यात आतापर्यंत सव्वातीनशे कोटी रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारखान्यात तयार होणारं MD ड्रग्ज परदेशातही पाठवलं जात होतं. ड्रग्जचा परदेशात पुरवठा करण्यासाठी कस्टम क्लिअरींग एजंट म्हणून काम पाहणा-या देवराज गडकर या आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आलीये. तर अटकेतील एकूण आरोपींची संख्या 4 झाली आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15 Dec 2023, 19:05 वाजता

'5 वेळा पक्ष बदलणारे काय निकाल देणार?', संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका

 

Sanjay Raut : आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना अजून किती मुदतवाढ हवीय...? अध्यक्षांनीच 5 वेळा पक्षांतर केलंय...5 वेळा पक्ष बदलणारे काय निकाल देणार?...असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय...विधानसभा अध्यक्षांनी कोर्टाकडे मुदतवाढ मागितल्यावरून राऊतांनी टीका केलीय..

15 Dec 2023, 18:33 वाजता

'...मी ठाण्यातून निवडणूक लढायला तयार', आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना आव्हान

 

Aaditya Thackeray on Eknath Shinde : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलंय.. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि माझ्याविरोधात वरळीतून लढावं नाहीतर मी त्यांच्याविरोधात ठाण्यातून लढायला तयार आहे असं आदित्य ठाकरे म्हणालेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15 Dec 2023, 18:12 वाजता

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार

 

Hardik Pandya Mumbai Indians Captain : नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सनं नव्या कर्णधाराची घोषणा केलीय. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनपदी हार्दिक पांड्याची वर्णी लागलीय. मुंबई इंडियन्सनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हार्दिक पांड्याच्या नावाची घोषणा केलीय. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन केल्यानंतर रोहित शर्माचं काय? असा सवालही उपस्थित होतोय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15 Dec 2023, 17:43 वाजता

आदित्य ठाकरेंसाठी काकी शर्मिला ठाकरे मैदानात

 

Sharmila Thackeray on Aaditya Thackeray : दिशा सालियान एसआयटी चौकशी प्रकरणी शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतलीय...आदित्य असं काही करेल असं वाटत नाही असं मोठं विधान शर्मिला ठाकरेंनी केलंय...दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आलेयत...या प्रकरणी त्यांची एसआयटी चौकशी होणार आहे...त्यामुळे या प्रकरणात आदित्य असं काही करेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया काकी शर्मिला ठाकरेंनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15 Dec 2023, 17:05 वाजता

'ललित पाटीलची पोलीस कोठडीच घेतलीच नव्हती', देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

 

Devendra Fadnavis on Lalit Patil Case : ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा मुद्दाही आज विधानसभेत गाजला.. '9 महिने ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयात कसा होता असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला. तेव्हा ललित पाटीलची पोलीस कोठडीच घेण्यात आली नव्हती असा खुलासा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तत्कालिन आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पत्र लिहिल्यानंतरही कोठडीसाठी परवानगी देण्यात आली नाही अशी माहितीही फडणवीसांनी दिली... ललित पाटील हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिक विभाग प्रमुख होते असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15 Dec 2023, 16:28 वाजता

सुधाकर बडगुजरप्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

 

Nashik Police on Action Mode : नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ नितेश राणे नितेश राणेंनी दाखवल्यानंतर नाशिकची क्राईम ब्रँच ऍक्टिव्ह झाली आहे. दाऊदच्या हस्तकांसोबत सुधाकर बडगुजर पार्टी करत असल्याचे पुरावे नितेश राणेनी विधानसभेत दाखवले होते.. त्यानंतर पोलिसांनी बडगुजर यांच्या कार्यालयातील त्यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेतले आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-