15 Dec 2023, 11:07 वाजता
संभाजीनगरात भीषण पाणीटंचाई
Sambhajinagar Water Problem : ऐन हिवाळ्यात छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पाणीटंचाई भेडसावू लागलीय. 93 गावं आणि 7 वाड्या आतापासूनच टँकरवर अवलंबून आहेत. यंदा पाऊस कमी झाल्यानं जिल्ह्यातील भूजल पातळी खालावलीय. जलस्त्रोत कोरडेठाक पडलेत. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झालीय. जिल्ह्यातील 93 गावं आणि वाड्यांना भीषण पाणीटंचाईची समस्या भेडसावतेय. या गावांची तहान भागवण्यासाठी 100 खासगी टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. तर 73 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय. त्यामुळे येणा-या काळात जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार अशी चिन्हे दिसतायत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Dec 2023, 10:59 वाजता
महाबळेश्वरपेक्षा परभणी थंड
Parbhani Temprature : राज्यात कडाक्याच्या थंडीची चाहूल लागलीये.. महत्त्वाचं म्हणजे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षा परभणीत थंडाचा कडाका अधिक आहे.. परभणीत 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये.. यंदाच्या मोसमातलं हे सर्वात कमी तापमान ठरलंय... या गुलाबी थंडीमुळे गहु, हरभरा पिकांना फायदा होणार आहे.. तर दुसरीकडे सातारा आणि महाबळेश्वरमध्येही थंडीचा कडाका वाढलाय.. महाबळेश्वरमध्ये पारा 13 अंशावर तर साता-यात 14 अंशावर पोहोचलाय.. त्यामुळे नागरीकांना उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावं लागतंय... जानेवारीमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं दिलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Dec 2023, 10:05 वाजता
संसद घुसखोरीप्रकरणी सहावा आरोपी अटकेत
Loksabha Security Breach : संसद भवनातील घुसखोरी प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक करण्यात आलीय...मास्टरमाईंड ललित झा सोबत महेश नावाच्या आरोपीला अटक करण्यात आलीय...संसदेत घुसखोरीचा कट रचण्यात ललितसोबत महेशचा हात असल्याचं समोर आलंय...महेश हा आरोपी नीलम कौरच्या संपर्कात होता...मूळचा राजस्थानचा असलेला महेश मजुरी करायचा...गेल्या कित्येक दिवसांपासून तो भगतसिंह फॅनक्लब पेजच्या माध्यमातून नीलमशी संपर्कात होता...घटनेत सहभागी असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Dec 2023, 09:55 वाजता
भाजपचं लोकसभेसाठी मिशन 45
BJP Loksabha Plan : लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात 45 जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपने ठेवलंय.. आणि त्याचसंदर्भात भाजपची रणनिती ठरल्याची माहिती समोर येतेय... राज्यातले काही मंत्री तसंच मोठ्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपने केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं.. त्याचा खूप मोठा परिणाम निकालात पाहायला मिळाला.. तेव्हा हीच रणनिती महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीसाठीही भाजप अवलंबणार असल्याची माहिती आहे.. राज्यात नव्या आणि तरुण चेह-यांना संधी देण्याची भाजपची रणनिती आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Dec 2023, 09:34 वाजता
संसद घुसखोरी प्रकरणी ललितचा मोठा खुलासा
Loksabha Security Breach : संसद भवनातील घुसखोरी प्रकरणी ललित झा यानं मोठा खुलासा केलाय.. घुसखोरी करण्यापूर्वीच ललित आणि महेशनं सर्वांचे मोबाईल जाळून टाकल्याची माहिती ललितनं पोलिसांना दिलीये.. संसद भवनात शिरण्यापूर्वीच सर्व आरोपींनी त्यांचे मोबाईल फोन ललितकडे जमा केले होते... ललितनं संसद भवनाबाहेरील घोषणाबाजीचं चित्रीकरणही केलं. त्यानंतर तो फरार झाला होता.. या सर्व आरोपींचे मोबाईल जाळल्यामुळे ते कोणाच्या संपर्कात होते..त्यांना कोणाची मदत मिळाली होती.. याचा तपास करण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढे उभं राहिलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Dec 2023, 09:16 वाजता
आगामी लोकसभा पार्श्वभूमीवर भाजपची बैठक
Nagpur BJP Meeting : आगामी लोकसभेच्या अनुसंघाने भाजपच्या बैठकांचा धडाका सुरु आहे...उद्या भाजप पदाधिकाऱ्यांची नागपुरात महत्वपूर्ण बैठक होणार आहे...तीन राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले नेते त्याठिकाणी मार्गदर्शन करणार आहे...यासोबतच लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे...या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Dec 2023, 08:57 वाजता
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची घोषणा?
Nagpur Winter Session : विधानसभेत शेतक-यांना आर्थिक मदत घेण्याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे.. अवकाळी पाऊस आणि शेतीचं नुकसान यासंदर्भातल्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सभागृहात उत्तर देणार आहेत... राज्यात अवकाळी पावसामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय... त्यामुळे शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी विरोधकांनी केलीय. यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या पाय-यांवर आंदोलनही केलं होतं.. मुख्यमंत्री शेतक-यांच्या नुकसानभरपाईसोबतच मराठवाडा आणि विदर्भासाठीही पॅकेज घोषीत करणार का याकडेही सर्वांचं लक्ष असेल..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Dec 2023, 08:32 वाजता
नवी मुंबईत 6 कोटींचे ड्रग्ज जप्त
Navi Mumbai Drugs Seized : नवी मुंबईत तब्बल 6 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार शिरढोण इथं सापळा रचून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून त्याच्या इतर 5 साथीदारांचा शोध लागला. त्यानंतर एका बंद कंपनीत आणि फार्महाऊवर ड्रग्ज तयार करण्याचं काम सुरू होतं असं पोलिसांना आढळून आलं. याठिकाणी छापे टाकत 330 लिटर केमिकल्स आणि 25 किलोग्राम पावडर जप्त करण्यात आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Dec 2023, 08:07 वाजता
संसद भवन घुसखोरीचा मास्टरमाईंडला अटक
Loksabha Security Breach : संसद भवनाची सुरक्षा भेदणा-या मास्टरमाइंडला अटक करण्यात आलीये.. ललित झा असं या आरोपीचं नाव आहे.. दिल्लीतील कर्तव्य पथावरुन पोलिसांनी त्याला अटक केली.. संसद भवनात घुसखोरी करण्यापूर्वी सर्व आरोपींनी त्यांचे मोबाईल ललितकडे दिले होते.. संसदेत घुसखोरी केल्यानंतर काही तरुणांनी संसद भवनाच्या बाहेरही रंगीत धुराचे फटाके फोडले त्यांचं चित्रिण करुन ललित झा फरार झाला होता.. त्याला काल पोलिसांनी अटक केलीये.. ललीत झा याला आजच कोर्टात हजर केलं जाणार असून चौकशीसाठी पोलीस त्याचा रिमांड मागणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Dec 2023, 07:44 वाजता
आमदार अपात्रतेबाबत मुदत वाढवून मिळणार?
MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणी मुदत वाढवून देण्याबाबत आज सुप्रीम कोर्टात निर्णय होणार आहे... विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 30 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेयत...मात्र, निकाल वाचन करण्यासाठी वेळ लागणार असून, आणखी 3 आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा असा अर्ज नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टात केलाय...या अर्जावर आज सुप्रीम कोर्ट आदेश देणार आहे...त्यामुळे कोर्ट मुदतवाढ देणार की 30 डिसेंबरच अंतिम तारीख ठेवणार...? याकडे लक्ष लागलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -