Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

15 Dec 2023, 15:19 वाजता

'जेलमध्ये असलेला सलीम कुत्ता बाहेर कसा?', सुधाकर बडगुजरांचा सवाल

 

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत असल्याचे फोटोच नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले.. बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता हा ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करत होता असा आरोप नितेश राणेंनी केला.. सुधाकर बडगुजर यांचा राजकीय गॉडफादर कोण आहे. बडगुजर कोणाच्या संपर्कात असतात याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी विधानसभेत केली...तर व्हिडिओमध्ये मॉर्फिंग करण्यात आलंय असं प्रत्युत्तर सुधाकर बडगुजर यांनी दिलंय. जेलमध्ये असलेला सलीम कुत्ता बाहेर कसा? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. 

15 Dec 2023, 14:44 वाजता

आमदार अपात्रताप्रकरणी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ 

 

MLA Disqualification : आमदार अपात्रता निकाल प्रकरणी सर्वात मोठी बातमी... सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निकाल देण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे... विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निकाल देण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली होती.. सुप्रीम कोर्टानेच हा निर्णय दिला होता.. त्याचसाठी हिवाळी अधिवेशन सुरु असतानाही नार्वेकरांनी अपात्रता सुनावणी ओव्हरटाईम करत पार पाडली.. मात्र, निकाल लेखन करण्यासाठी वेळ लागणार असून, आणखी 3 आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा असा अर्ज नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टात केला होता.. यावरच आता सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निकालासाठी मुदतवाढ दिलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15 Dec 2023, 13:41 वाजता

सॅमसंग अँड्रॉईड 11,12,13,14 व्हर्जन्सवर सायबर हल्ला?

 

Samsung Android Phone : सॅमसंगच्या ज्या स्मार्ट फोनमध्ये अँड्रोईड ११, १२, १३ आणि १४ ही चार व्हर्जन आहेत. त्यांचे मोबाईल फोन सायबर हल्ल्यांचे बळी ठरु शकतात असा इशारा कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अर्थात सीईआरटी इन या केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या समितीनं दिलाय. सीईआरटीने नुकत्याच केलेल्या संशोधनातून सॅमसंगचे काही विशिष्ट मोबाईल हँकिंगचे बळी ठरु शकतात, असं समोर आलंय. असे सायबर हल्ले टाळायाचे असतील तर सॅमसंग फोन धारकांनी त्यांच्या फोनचं सॉफ्टवेअर तात्काळ अपडेट करुन घ्यावे असंही सीईआरटीने म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Dec 2023, 13:33 वाजता

बडगुजरप्रकरणी SIT चौकशी करणार - फडणवीस

 

Devendra Fadanvis : नितेश राणेंनी विधानसभेत केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.. देशद्रोह्यांसोबत पार्टी झोडल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Dec 2023, 13:29 वाजता

बडगुजरचा राजकीय गॉडफादर कोण? - नितेश राणे

 

Nitesh Rane : ठाकरे गटाचे नेते मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत असल्याचे फोटोच नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले.. बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता हा ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करत होता असा आरोप नितेश राणेंनी केला.. सुधाकर बडगुजर यांचा राजकीय गॉडफादर कोण आहे.  बडगुजर कोणाच्या संपर्कात असतात याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी विधानसभेत केली...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Dec 2023, 12:50 वाजता

आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

 

Aaditya Thackeray On Eknath Shinde : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलंय.. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि माझ्याविरोधात वरळीतून लढावं नाहीतर मी त्यांच्याविरोधात ठाण्यातून लढायला तयार आहे असं आदित्य ठाकरे म्हणालेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Dec 2023, 12:46 वाजता

मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये कलगीतुरा

 

Manoj Jarange Vs Chagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मनोज जरांगे आणि भुजबळांमध्ये आज पुन्हा कलगीतुरा रंगला... जरांगे महापुरुषांचा अपमान करतात असा आरोप भुजबळांनी केला होता... त्यावर उत्तर देताना जरांगेंनी भुजबळांवर जहरी टीका केली.. तर भुजबळांनीही जरांगेंच्या टीकेवर पलटवार केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Dec 2023, 12:44 वाजता

फडणवीसांवरील टीका सहन करणार नाही - नितेश राणे

 

Nitesh Rane Vs Manoj Jarange : उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नका अशा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी जरांगे पाटलांना दिलाय. टीका केल्यास गाठ मराठ्यांशी असल्याचं जरांगेंनी लक्षात ठेवावं असं सुनावलंय. तर फडणवीस नितेश राणेंना बोलायला लावत असल्याचा पलटवार जरांगेंनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Dec 2023, 12:16 वाजता

संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आक्रमक

 

Sambhajiraje On Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे अ‍ॅक्शन मोडवर आलेत. त्यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलावलीय. त्यासाठी नितीन गडकरी, शरद पवार, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय. 18 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्र सदनात ही बैठक बोलावलीय. महाराष्ट्रात ऐरणीवर असलेला मराठा आरक्षण विषयावर सर्व खासदारांनी एकमतानं संसदेत आवाज उठवावा यासाठी राज्यातल्या सर्व खासदारांची संयुक्त बैठक बोलावलीय. आता या बैठकीला कोण उपस्थित राहतं याकडे लक्ष असेल.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Dec 2023, 11:23 वाजता

राणा दाम्पत्य दोषमुक्त होणार?

 

Navneet Rana & Ravi Rana : राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर येतेय.. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्य दोषमुक्त होणार का याचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे.. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता. याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती.. मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली... राणा दाम्पत्याने दोषमुक्त करण्याची मागणी केलीय. तेव्हा न्यायाधीश राहुल रोकडे याप्रकरणाचा निकाल 18 डिसेंबरला देणार आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा -