23 Oct 2023, 18:39 वाजता
मविआचं मराठवाड्यात जागावाटपाचं सूत्र ठरलं?
Maharashtra Politics : मविआचं मराठवाड्यातल्या जागावाटपाचं सूत्र ठरल्याचं कळतंय. ठाकरे गट, शऱद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस मराठवाड्यातल्या आठ लोकसभा निवडणुका लढवणार आहेत. यामध्ये बीड आणि हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गट, नांदेड आणि लातूर काँग्रेस, तर परभणी, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जागा ठाकरे गट लढवणार आहे. फक्त जालना लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बोलणी सुरू आहे. जालन्याच्या जागेवरून बीडबाबतही बदल होईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
23 Oct 2023, 18:14 वाजता
जुनी पेन्शन योजना लागू होणार?
Old Pension : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी आक्रमक झालेले असताना सरकारने आता नवीन पर्याय शोधल्याचा माहिती सूत्रांनी दिलीय...कर्मचा-याला निवृत्तीवेळीच्या वेतनाच्या 30 ते 35% पेन्शन दरमहा देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे...लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी घोषणेची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय...कर्मचा-यांना सामाजिक सुरक्षितता देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे...असं असलं तरी सध्या वेतनातून होणारी कपात कायम राहणार आहे...त्यामुळे सरकारचा हा निर्णय शासकीय कर्मचा-यांना मान्य होणार का...? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
23 Oct 2023, 17:39 वाजता
आमदार अपात्रतेचं नवं वेळापत्रक दसऱ्यानंतर
MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणीचं नवं वेळापत्रक दस-यानंतर तयार होणाराय.. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याच आठवड्यात महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफांसोबत चर्चा करणार आहेत. दस-यानंत ते दिल्ली दौ-यावर जाणार आहेत. तिथं ते अॅडव्होकेट जनरल तुषार मेहतांची भेट घेणार आहेत... या दोघा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून सुनावणीचं नवं वेळापत्रक तयार केलं जाणाराय... येत्या ३० ऑक्टोबरला याबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणाराय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
23 Oct 2023, 17:04 वाजता
मोखाड्यात ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश
Drugs Seized in Mokhada : सोलापूर, नाशिक, संभाजीनगरनंतर आता पालघर जिल्ह्यातही ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. पालघरच्या मोखाडा तालुक्यातील ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आलाय. या कारखान्यावर मिरा भाईंदर गुन्हे शाखेनं कारवाई केलीय. कारवाईत कोट्यवधी रुपयांचं साहित्य जप्त केलंय. एका फार्म हाऊसमध्ये हा कारखाना चालू असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला वसईमधून अटक केलीय. मात्र याचे धागेदोरे तपासण्याचे काम सुरूय. या कारवाईबाबत गोपनीयता पाळण्यात आलीय.दरम्यान स्थानिक पोलिसांकडे या धाडीसंदर्भात कुठलीही माहिती नाही.
23 Oct 2023, 16:15 वाजता
पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोला मान्यता
Pune Metro : आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. राज्य सरकारने पिंपरी मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास मंजुरी दिलीय. मेट्रो पिंपरी ऐवजी निगडीपासून असावी अशी आग्रही मागणी होती. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आलीय. त्यामुळे मेट्रोचा निगडी पर्यंतचा प्रवास सुरू होईल. मेट्रो निगडीपर्यंत जाणार असल्यानं शहरातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणारंय.
23 Oct 2023, 14:41 वाजता
मराठा आरक्षणासाठी वेळ लागू शकतो - गिरीश महाजन
Girish Mahajan : मराठा आरक्षणासाठी वेळ लागू शकतो असं मोठं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय. टिकणारं मराठा आरक्षण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तेव्हा हातघाईवर येऊ नका असा सबुरीचा सल्ला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे पाटील यांना दिलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
23 Oct 2023, 14:39 वाजता
विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारला इशारा
Vijay Wadettiwar : तीन पिढ्यांचा पुरावा असल्याशिवाय सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही... सरकारनं धाडस केल्यास न्यायालयीन लढाई लढणार असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
23 Oct 2023, 14:08 वाजता
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'आम्ही दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही','फडणवीसांनी दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही','जरांगेच्या मागणीवर शिंदे समिती काम करतेय','ओबीसी समाजामध्ये 350 जाती','चव्हाण मुख्यमंत्री असताना 16 टक्के आरक्षण','52 % आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्याचा प्रयत्न','सगळ्या समाजनं 2 अपत्यांनंतर थांबलं पाहिजे','मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नाही','गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे', उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान.
23 Oct 2023, 13:56 वाजता
ड्रग्जमाफिया ललित पाटीलला 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
Lalit Patil : ड्रग्जमाफिया ललित पाटीलला 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. ड्रग्जमाफिया ललित पाटीलसह इतर आरोपींना अटक केल्यानंतर आज पोलीस कोठडी संपली होती. त्यानंतर ललित पाटीलला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
23 Oct 2023, 13:47 वाजता
अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ
Madha Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माढ्यातल्या सभेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला... एका कार्यकर्त्याने अजित पवारांना काळं कापडही दाखवलं.. तसंच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली... माढातल्या पिंपळनेरमध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम होता.. मात्र मराठा क्रांती मोर्चाने अजित पवारांच्या या दौ-याला विरोध केला होता.. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याचं आवाहन केलंय. त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसतायत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -