Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

23 Oct 2023, 12:49 वाजता

महिला मतांसाठी 'कमल मित्र'

 

BJP Planning For Election : मुंबईतील महिला मतांसाठी भाजपचं कमल मित्र' सरसावलंय...प्रत्येक वॉर्डमध्ये भाजपची किमान एक महिला कार्यकर्ती कमल मित्र' म्हणून काम करणार आहे...भाजप मुंबई महिला मोर्चाकडून यासाठी एका महिला प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आलीय...कमल मित्र महिलांपर्यंत केंद्र आणि राज्याच्या योजना पोहचवणार आहेत...महिलांसाठी सरकारने जाहीर केलेल्या योजना, एसटीमध्ये 50 टक्के सवलत, मातृ वंदना, लेक लाडकी योजना अशा विविध योजनांची माहिती महिलांना दिली जाणार आहे...यासाठी भाजपकडून कमल मित्रला विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय...आगामी निवडणुकांत महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Oct 2023, 11:56 वाजता

राज्य सरकारच्या जाहिरातीवर संजय राऊतांचा निशाणा

 

Sanjay Raut On State Government : राज्य सरकारने केलेल्या जाहिरातीवरुन संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलंय. मराठा तरुण आत्महत्या करतोय. मात्र सरकार जाहिरातीत दंग असल्याची टीका राऊतांनी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Oct 2023, 11:54 वाजता

राज्य सरकारची मराठा आरक्षणावर पुन्हा जाहिरात

 

State Government Advertisement : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला मनोज जरांगेंनी दिलेल्या डेडलाईनची मुदत 24 तासांनी संपणार आहे... मात्र त्याआधीच राज्य सरकारने मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध केलीय. मराठा आरक्षणाचं वचन पूर्ण करण्याचं धोरण आखल्याची माहिती या जाहिरातीतून देण्यात आलीय.. मराठा समाजाच्या हक्काचे आणि संविधानाच्या चौकटीत तसंच न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार बांधील असल्याचं आश्वासन या जाहिरातीत दिलंय.. कालही EWS आरक्षणाचा मराठा समाजाला मोठा फायदा झाला अशी जाहिरात राज्य सरकारने दिली होती. मात्र मराठ्यांसाठी जे आरक्षण मागितलंय तेच द्या अशी मागणी मनोजर जरांगे पाटील यांनी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Oct 2023, 10:22 वाजता

मुंबईत 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा

 

October Heat : मुंबईत ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा महिन्याच्या अखेरपर्यंत बसणारेय. हवामान विभागानं असा अंदाज वर्तवलाय. समुद्रावरून येणारे वारे शहरात दुपारनंतर वाहत असल्यामुळे तापमानात वाढ झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागानं दिलीय. आज तापमानाचा पारा 37 अंशापर्यंत राहण्याची शक्यताय. त्यानंतर आठवडाभर मुंबईत 35 अंशावर तापमान कायम राहणारेय.  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Oct 2023, 10:19 वाजता

मुंबई लोकलमध्ये महिला सुरक्षा ऐरणीवर

 

Mumbai Local Women Safety : मुंबई लोकलने प्रवास करणा-या महिलांची सुरक्षा धोक्यात आलीय...लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात एक तरुण नशा करत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय...हा तरुण महिलांच्या डब्ब्यात दरवाज्यात उभं राहून नशा करत होता...त्याच्या हातामध्ये रुमाल दिसतोय...अंगाला लावायचा बाम, तसेच व्हाईटनरची बाटली फोडून तो रुमालाने ओढून नशा करतोय...हा सगळा प्रकार सुरू असताना डब्यातील महिला घाबरल्याचं व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय...मात्र, यावेळी डब्यात पोलीस नव्हते का...? हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ते समजू शकलेलं नाही...या नशेबाजाला पकडून कठोर कारवाईची मागणी केली जातेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Oct 2023, 10:16 वाजता

अमली पदार्थाविरोधात मुंबई पोलीस आक्रमक

 

Mumbai Police : अमली पदार्थ निर्मिती, पुरवठयाचं प्रकरण सध्या राज्यभर गाजतंय. सातत्यानं राज्यभरात अमली पदार्थ सापडल्याची चर्चाही होतेय. मात्र मुंबई पोलिसांनी गेल्या 2 वर्षांत अमली पदार्थाविरोधात मोठ्या कारवाया केल्यायत. मुंबई पोलिसांनी 2 हजार 635 किलो एमडी जप्त केलंय. त्याची किंमत 5 हजार कोटींहूनही अधिक आहे. नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये एमडी निर्मिती करणारा प्रत्येक एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने अशा एकूण 6 कारखान्यांवर छापे टाकून ते सील करण्यात आलेत. मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांमध्ये एमडी तस्करी आणि विक्रीबाबत जवळपास पाचशे गुन्ह्यांची नोंद केलीय. त्यात 718 आरोपींना अटकही करण्यात आलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Oct 2023, 09:22 वाजता

संजय राऊतांना मालेगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश

 

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेयत...मंत्री दादा भुसेंवर गैरव्यवहाराचे आरोप करणं राऊतांना भोवलंय...दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी जमा केलेल्या शेअर्समध्ये 178 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप राऊतांनी केला होता...यावर भुसेंनी नोटीस पाठवून आरोपाबाबत पुरावे तसेच माफी मागण्यास सांगितलं...मात्र राऊत यांनी कुठलाही खुलासा न केल्याने राऊतांविरोधात खासगी फौजदारी गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेयत...यामुळे राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहणार की वकिलांमार्फत आपलं म्हणणं मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Oct 2023, 09:20 वाजता

वानखेडे स्टेडियमवर उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा

 

Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरचा भव्यदिव्य पुतळा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणार आहे.. 1 नोव्हेंबरला भव्यदिव्य कार्यक्रमात वानखेडे स्टेडियवर सचिनच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाईल.. अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी 14 फुटांचा ब्राँझपासून बनवलेला सचिनचा हा पुतळा तयार केलाय.. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिनचे आपल्या करिअरमधले अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले. याच स्टेडियमवर सचिन सचिन असा फॅन्सचा जयघोष ऐकायला मिळाला. याच स्टेडियमवर सचिनने त्याच्या करिअरमधला सर्वोच्च क्षण अनुभवला होता.. 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप भारताने जिंकला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेटर्सनी सचिनला खांद्यावर मिरवत वानखेडेला फेरी मारली होती.. सचिनने आपल्या करिअरची अखेरची मॅचही याच स्टेडियमवर खेळली.. आणि आता लवकरच याच स्टेडियमवर आपल्या लाडक्या सचिनचा पुतळा उभा राहणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Oct 2023, 08:46 वाजता

नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा

 

Nana Patole : सरकारने दिलेल्या EWS जाहिरातीवरून नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधलाय...EWS ची जाहीरात म्हणजे सरकारी पैशांची उधळपट्टी आहे...दहा वर्षात भाजप सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत, ते आता काय सोडवणार...जाहिरात देवून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का...? असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Oct 2023, 08:03 वाजता

शरद पवार आणि अजित पवार आज माढ्यात

 

Sharad Pawar Vs Ajit Pawar : दौंडनतर शरद पवार आणि अजित पवारही आज माढ्यात आहेत.. दोघांच्याही कार्यक्रमाची वेळ ही दहाचीच आहे.. तेव्हा अचूक राजकीय टायमिंग कोण साधणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, माळशिरसचे उत्तम जानकर, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासारखे अनेक मातब्बर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत गेले आहेत. शरद पवार 2009 मध्ये माढा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र आज माढ्यात शरद पवार गटाची अवस्था दयनिय झाल्याचं दिसून येतंय. तेव्हा शरद पवारांनीच पुन्हा माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी केलाय.  तेव्हा माढा लोकसभा मतदारसंघावर शरद पवारांनी लक्ष केंद्रीत केलंय. सुप्रिया सुळे तसंच शरद पवारांनीही माढ्यात दौरे वाढवले आहेत.. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कोणता नवा डाव टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -