Pune Car Accident Case : पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला दणका

मराठी बातम्या, झी 24 तास, मराठी ब्रेकिंग न्यूज, ताज्या मराठी बातम्या, महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, राजकीय, सामाजिक, क्रीडा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, महाराष्ट्र बातम्या, महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राष्ट्रवादी zee 24 taas, zee 24 taas marathi news, marathi news, marathi news today, Live marathi news  

Pune Car Accident Case : पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला दणका

30 May 2024, 22:39 वाजता

आरोपी विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील MPG क्लबचा बार सील

 

Pune Car Accident Case :  पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिला आहे. महाबळेश्वरमधील MPG क्लबचा बार सील करण्यात आलाय. जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली गेली. विशाल अग्रवालच्या साता-यातील बेकायदा हॉटेलबाबत तक्रारी आल्यानंतर, तिथला बार सील केला गेला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

30 May 2024, 21:32 वाजता

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल इंजिनिअर मनोज संघु याला अटक

 

Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग दूर्घटना प्रकरणी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात मनोज संघु नावाच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला SITने अटक केली. भावेश भिंडेनंतरची ही दुसरी अटक आहे. मुंबई महानगरपालिकेची मान्यता असलेला मनोज संघु स्ट्रक्चरल इंजिनिअर आहे. त्यानंच दुर्घटनाग्रस्त होर्डिंगला स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं होतं. या दुर्घटनेत 17 लोकांचा मृत्यू झाला, तर 74 जण जखमी झालेत. 

 

30 May 2024, 19:22 वाजता

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 6 जुलैऐवजी 21 जुलैला होणार

 

MPSC Exam Date Change : बातमी राज्यातल्या तरुणांसाठी महत्त्वाची... MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा तारखेत बदल... 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द... 6 जुलैऐवजी 21 जुलैला होणार परीक्षा... 31 मे ते 7 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार असल्याची स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची घोषणा.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

30 May 2024, 18:29 वाजता

जितेंद्र आव्हाडांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

 

BJP on Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप राज्यभर आक्रमक झालंय. मुंबईत मंत्रालयाजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलं. यावेळी आव्हाडांच्या प्रतिमेला चप्पल, बुट मारो आंदोलन केलं. ठाण्यातही भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. कोपरी परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या फोटोला जोडे मारले. आव्हाडांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केलीय. नवी मुंबईतही आव्हाडांचा निषेध करण्यात आलाय. त्यांना अटक करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. नाशिकमध्ये शालिमार इथल्या आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आव्हाडांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नागपुरातल्या संविधान चौकात भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चानं निषेध आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी आव्हाडांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी थांबवलं असता आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.  कोल्हापूरच्या बिंदू चौकात आव्हाडांच्या पुतळ्याला जोड्यांचा प्रसाद दिला.. तसंच बिंदू चौकात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेकही घातला.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

30 May 2024, 18:11 वाजता

आरोपी डॉ. तावरे, डॉ. हळनोर, शिपाई घटकांबळेला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

 

Pune Blood Sample Case : पुणे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरफार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना 5 जून पर्यंत म्हणजे 7 दिवस पोलीस कोठडी देण्यात आलीय.. कोर्टातल्या सुनावणीत धक्कादायक खुलासाही समोर आलाय.. मुलाचे रक्त सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी घेतले.. मात्र महिलेचे रक्त मुख्य वैद्यकीय अधिका-याच्या खोलीत घेतले होते.. महिलेच्या रक्ताचे नमुने जिथे घेतले तिथे सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे आता ती महिला कोण होती याचे सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

30 May 2024, 17:32 वाजता

आरोपी डॉ. तावरे, डॉ. हळनोर, शिपाई घटकांबळेला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

 

Pune Blood Sample Case : पुणे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरफार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना 5 जून पर्यंत म्हणजे 7 दिवस पोलीस कोठडी देण्यात आलीय.. कोर्टातल्या सुनावणीत धक्कादायक खुलासाही समोर आलाय.. मुलाचे रक्त सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी घेतले.. मात्र महिलेचे रक्त मुख्य वैद्यकीय अधिका-याच्या खोलीत घेतले होते.. महिलेच्या रक्ताचे नमुने जिथे घेतले तिथे सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे आता ती महिला कोण होती याचे सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत.

 

30 May 2024, 16:38 वाजता

पुणे रक्त नमुना फेरफार, आरोपी डॉ. तावरे, डॉ. हळनोर, शिपाई घटकांबळेला कोर्टात नेलं.

 

Pune Blood Sample Case : पुणे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरफार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना कोर्टात नेण्यात आलं आहे. या प्रकरणातील तिघा आरोपींची पोलीस कोठडी आज संपतेय. त्यामुळे त्यांना आता पुन्हा कोर्टात हजर केलं जातंय. 

 

30 May 2024, 14:14 वाजता

भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

 

Bhandara Sunstroke : भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय.... भास्कर तरारे असं मृत व्यक्तीचं नाव आहे.. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते... मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. भंडा-यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताचे एकूण 5 रुग्ण उपचार घेत आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 May 2024, 13:47 वाजता

बोगस बियाणं जप्त

 

Akola Seeds : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात बोगस बियाणे जप्त करण्यात आलेत.. उमरगा गावात कृषी विभागानं ही कारवाई केलीये.. या कारवाईदरम्यान कपाशीची 47 पाकिटं बियाणं जप्त केलीत.. या बियाण्यांची किंमत 75 हजार 200 रुपये एवढी आहे.. एका शेतातील मोडकळीस आलेल्या घरातून बियाण्यांचा हा साठा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलाय

30 May 2024, 13:21 वाजता

अजित पवारांचं चॅलेंज अंजली दमानियांनी स्वीकारलं

 

Anjali Damania On Ajit Pawar : पुणे अपघातानंतर पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी मल्टिपल कॉल्स केले...अजित पवारांनी आयुक्तांना फोन कशासाठी केले होते हे आयुक्तांनी उघड करावे...आयुक्तांना फोन आरोपीला वाचवण्यासाठी होता की त्याच्या अटकेसाठी होता...? असा सवाल विचारत अग्रवाल कुटुंबीयांशी त्यांचे काय संबंध आहेत ते लवकरच समोर येईल...दोन दिवसांत सगळे पुरावे बाहेर काढणार असा इशारा अंजली दमानियांनी दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -