Pune Car Accident Case : पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला दणका

मराठी बातम्या, झी 24 तास, मराठी ब्रेकिंग न्यूज, ताज्या मराठी बातम्या, महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, राजकीय, सामाजिक, क्रीडा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, महाराष्ट्र बातम्या, महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राष्ट्रवादी zee 24 taas, zee 24 taas marathi news, marathi news, marathi news today, Live marathi news  

Pune Car Accident Case : पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला दणका

30 May 2024, 08:26 वाजता

मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून 3 दिवसांचा जम्बो ब्लॉक

 

Central Railway Megablock :  मध्य रेल्वेवर उद्यापासून 3 दिवसांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. कारण या ब्लॉकदरम्यान तब्बल 930 लोकल फे-या तसंच 72 मेल एक्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.. काही गाड्या शॉर्ट टर्मिनस केल्या जाणार आहेत... CSMTआणि ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मचं विस्तारिकरण केलं जाणार आहे. त्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय.. या ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊनये म्हणून सरकारी आणि खासगी कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम देण्यांच आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 May 2024, 08:21 वाजता

पुणे अपघात प्रकरणी दोषींना सोडणार नाही - फडणवीस

 

Devendra Fadanvis : पुणे अपघात प्रकरणी कुणालाही सोडणार नाही...इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा पर्दाफाश करणार...असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय...पुणे अपघात प्रकरणी योग्य तपास सुरू असून, दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती फडणवीसांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -