Pune Car Accident Case : पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला दणका

मराठी बातम्या, झी 24 तास, मराठी ब्रेकिंग न्यूज, ताज्या मराठी बातम्या, महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, राजकीय, सामाजिक, क्रीडा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, महाराष्ट्र बातम्या, महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राष्ट्रवादी zee 24 taas, zee 24 taas marathi news, marathi news, marathi news today, Live marathi news  

Pune Car Accident Case : पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला दणका

30 May 2024, 12:36 वाजता

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा

 

Eknath Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या परदेश दौ-यावरून टोमणा लगावलाय...व्हिडीओ ट्विट करत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय...परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा...शेत पिकाची दुनिया न्यारी, वसे जिथे विठूरायाची पंढरी म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय...शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळगावी गेलेयत...यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून त्यांनी शेतीची पाहणी केली...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 May 2024, 12:16 वाजता

मनुस्मृतीवरुन राजकारण तापलं

 

Devendra Fadanvis, Chagan Bhujbal On Jitendra Awhad : कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोकाचा विचार नसताना इंडिया आघाडी आणि आव्हाडांकडून खोटं बोलून नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय...असं फडणवीसांनी म्हटलंय...तर मनुस्मृतीचा चंचू प्रवेश अभ्यासात नको...मनुस्मृतीवर फोकस कमी व्हावा म्हणून आव्हाड करू नका असं म्हणत भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 May 2024, 12:13 वाजता

शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना बजावणार नोटीस

 

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.. एक्साईज मंत्री शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना नोटीस बजावणार आहेत. पुणे कार अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी एक्साईज विभाग आणि शंभूराज देसाईंवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल घेत शंभूराज देसाई त्यांना नोटीस बजावणार आहेत. तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडेही तक्रार करणार आहेत. कालच शंभूराज देसाईंनी संजय राऊतांना कोर्टाकडून नोटीस बजावली होती.. राऊतांपाठोपाठ आता ते धंगेकरांनाही नोटीस बजावणार आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 May 2024, 11:35 वाजता

सरकार टेंडर आणि टक्केवारीत व्यस्त - वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar : राज्यात दुष्काळ असताना सरकार टेंडर आणि टक्केवारीत व्यस्त आहे...दुष्काळग्रस्तांकडे आणि शेतक-यांकडे पाहायला सरकारला वेळ नाही, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय...आचारसंहिता असल्याचं कारण सांगत दुष्काळग्रस्तांकडे सरकार दुर्लक्ष करतंय...तर दुसरीकडे निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन 25 हजार कोटींचं टेंडर काढल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय...हे सरकार टेंडर आणि टक्केवारीतच व्यस्त असून, दुष्काळग्रस्त आणि शेतक-यांना मूर्ख बनवत असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 May 2024, 11:28 वाजता

मान्सून केरळमध्ये दाखल

 

Monsoon Update : मान्सूनची वाट पाहणा-यांची प्रतीक्षा आता संपलीय. मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. हवामान विभागानं यासंदर्भात माहिती दिलीय. केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावलीय. ईशान्य भारताच्या बहुतांश भागात मान्सून पुढे सरकलाय. 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात बरसणार असल्याचंही हवामान विभागानं म्हटलंय. 

30 May 2024, 09:48 वाजता

पब आणि बारचं CCTV नियंत्रण एक्साईज विभागाकडे

 

Pune : पब, बार आणि रेस्टॉरंटमधील सीसीटीव्हीचे नियंत्रण आता थेट राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या हातात असणार आहे...या ठिकाणी अल्पवयीन मुलांना होणाऱ्या मद्यविक्रीला आळा घालण्याबरोबरच वेळेच्या मर्यादेचे पालन होते की नाही... त्याचप्रमाणे मद्यविक्री बाबतच्या नियमावलीचे उल्लंघन तर होत नाही ना...? हे पाहण्यासाठी ही उपाययोजना अंमलात आणली जाणार आहे...कल्याणी नगर अपघातानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला होता...त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यावर कार्यवाही करणार आहे...पब आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही यंत्रणा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मोबाईलशी जोडली जाणार आहे...त्यामुळे त्या ठिकाणी काय चाललंय हे त्यांना मोबाईलवर पाहता येणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 May 2024, 09:13 वाजता

भुसावळमध्ये पूर्व वैमनस्यातून 2 जणांवर गोळीबार

 

Bhusaval Firing : भुसावळ शहर दुहेरी हत्याकांडानं हादरलंय.. भुसावळमध्ये दोघांवर गोळीबार करण्यात आलाय.. या गोळीबारात माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू झालाय.. जुन्या वादातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. सातारा रोडवरील मरीमाता मंदिर परिसरात रात्री १०च्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला.. मृतांमध्ये संतोष बारसे या माजी नगरसेवकाचा तसंच सुनील राखुंडे या सामाजीक कार्यकर्त्याचा समावेश आहे... गोळीबार करुन हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर शहरात तणावपूर्व शांतता पसरली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.. दरम्यान भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांनी रात्री जिल्हा रुग्णालयाला भेट दिली.. मात्र मृतांच्या नातेवाईकांना संताप  व्यक्त करत त्यांना धक्काबुक्की केली...

बातमीचा व्हिडीओ पाहा

30 May 2024, 09:10 वाजता

चासकमान धरणातील पाणीपातळी खालवली

 

Khed Chaskaman Dam : पुण्यातील चासकमान धरणातील पाणीपातळी खालावली आहे. धरणात केवळ अर्धा टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावरती अवलंबून असलेल्या खेड,शिरूर भागातील पिकं पाण्याअभावी करपू लागली आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनलाय. 

30 May 2024, 08:32 वाजता

मुंबईत आजपासून 5 टक्के पाणीकपात

 

Mumbai Water : मुंबईत आजपासून 5 टक्के पाणीकपात करण्यात येणारेय. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये साठा कमी झाल्यानं निर्णय घेण्यात आलाय. अप्पर वैतरणा धरणात वापरातील पाणीसाठा शून्य टक्के झालाय तर इतर 6 धरणांमध्ये केवळ 8 टक्के साठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होऊन उपयुक्त साठ्यात सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात लागू राहणारेय. मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन बीएमसीनं केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 May 2024, 08:29 वाजता

बारामतीत एक दिवसाआड पाणीपुरवठा

 

Baramati Water : आता बारामतीकरांवर देखील पाणी कपातीचे संकट ओढावलंय..बारामती नगरपरिषदेनं शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतलाय... नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाले असल्यानं उपलब्ध पाणीसाठा मर्यादीत आहे. त्यामुळे पर्यायाने बारामती शहरासाठी पाणी पुरवठा एक दिवसाआड केला जाणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितलंय…निरा डावा कालव्याचे पुढील आवर्तन मिळेपर्यत हा एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा -