22 Dec 2024, 14:23 वाजता
फडणवीस, शिंदेंसोबत अर्थसंकल्प तयार करणार- अजित पवार
Ajit Pawar : येत्या 3 मार्चला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. यात अर्थसंकल्प सादर केला जाणार असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना विश्वासात घेऊन तो तयार करणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. बारामतीत ते बोलत होते. सोमवारी आपण खात्याचा कारभार स्वीकारणार, असंही ते म्हणाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 13:36 वाजता
'छगन भुजबळ 20 वर्ष मंत्री होते',माणिकराव कोकाटेंनी भुजबळांना डिवचलं
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : भुजबळांनी नाराज व्हायचं कारण नाही-कोकाटे...भुजबळ 20 वर्ष मंत्री होते... माणिकराव कोकाटेंनी छगन भुजबळांना डिवचलं... भुजबळांनी समजून घेतलं पाहिजे-कोकाटे
22 Dec 2024, 12:55 वाजता
छगन भुजबळांची सर्व पक्षांना आणि राज्याला गरज- गुलाबराव पाटील
Gulabrao Patil On Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची सर्व पक्षांना आणि राज्याला गरज आहे. त्यामुळे त्यांची लवकरच नाराजी दूर करतील, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय. छगन भुजबळ ओबीसींचे मोठे नेते आहेत, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 12:21 वाजता
शहापूर गोळीबारातील जखमी दिनेश चौधरींचा मृत्यू
Shapur Crime : शहापुरात काल रात्री झालेल्या गोळीबारात जखमी ज्वेलरचा मृत्यू झालाय.... काल रात्री शहापूर शहरातील बाजारपेठेत महालक्ष्मी ज्वेलर्सवर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता..यात दिनेश चौधरी याच्या पाठीला गोळी लागली... त्याला उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आलं होतं.. मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झालाय... मोटारसायकलवरुन आलेले हे दोन्ही हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झालेत.. या घटनेमुळे शहापूर तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय..
22 Dec 2024, 11:36 वाजता
कुर्ल्यातील बस अपघातानंतर प्रशासनाला जाग
Best Bus : कुर्ल्यातील बेस्ट अपघातानंतर बेस्ट प्रशासनाला जाग...भाडेतत्त्वावरील बसेसना स्पीड लॉक लावणार...भाडेतत्त्वावरील गाड्यांना प्रतितास 50 किमीची वेगमर्यादा...वाहन चालकांसाठीही मार्गदर्शन तत्व जाहीर
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 11:19 वाजता
'संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार',संजय शिरसाटांचा दावा
Sanjay Sirsat : 'संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार'... संजय शिरसाटांचा पालकमंत्रिपदावर दावा...भाजपचीही पालकमंत्रिपदाची मागणी... संभाजीनगर पालकमंत्रिपद कोणाला? भाजप की शिवसेना?
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 10:49 वाजता
2 दिवसांत पालकमंत्रिपदाची यादी जाहीर होऊ शकते- शंभूराज देसाई
Shambhuraj Desai : मंत्र्यांचं खातेवाटप झाल्यानंतर आता लवकरच पालकमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.. दोन दिवसात पालकमंत्रिपदाची यादी जाहीर होऊ शकते, असा दावा पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंनी केलाय. पालकमंत्रिपदासंदर्भात तिन्ही नेते निर्णय घेतील, असं ते म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 10:24 वाजता
विजय मिळवूनही लाजत फिरतोय- दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil : विजय मिळवूनही लाजत फिरतोय तर विरोधातले पराभव होऊनही पाटलांसारखं फिरतात, अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप वळसे पाटलांनी दिलीय. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचनाही वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्यात.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 09:48 वाजता
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या कंपनीत संचालक',अंजली दमानियांचा आरोप
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकारावरून अंजली दमानियांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कंपनीत संचालक आहेत, असा आरोप अंजली दमानियांनी केलाय. यासंदर्भात अंजली दमानियांनी ट्विटवर व्हिडिओ शेअर केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 09:02 वाजता
कर्जतमध्ये बंदूक रोखून दहशत माजवण्याचा प्रयत्न
Raigad : रायगडमध्ये बंदुकीचा धाक दाखवत तरुणावर गोळ्या झाडण्याची धमकी देण्यात आलीय. हा प्रकार कर्जतच्या साकोळमध्ये घडलाय. नारळाची वाडी इथं एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टर संजू जगदीश मोहिते यांना आरोपी शोएब बुबरे यांनी बंदुकीचा धाक दाखवत 30 हजार रुपयांची खंडणी मागितली. धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शोएब बुबरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस तपास करीत आहेत.