22 Dec 2024, 10:49 वाजता
2 दिवसांत पालकमंत्रिपदाची यादी जाहीर होऊ शकते- शंभूराज देसाई
Shambhuraj Desai : मंत्र्यांचं खातेवाटप झाल्यानंतर आता लवकरच पालकमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.. दोन दिवसात पालकमंत्रिपदाची यादी जाहीर होऊ शकते, असा दावा पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंनी केलाय. पालकमंत्रिपदासंदर्भात तिन्ही नेते निर्णय घेतील, असं ते म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 10:24 वाजता
विजय मिळवूनही लाजत फिरतोय- दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil : विजय मिळवूनही लाजत फिरतोय तर विरोधातले पराभव होऊनही पाटलांसारखं फिरतात, अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप वळसे पाटलांनी दिलीय. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचनाही वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्यात.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 09:48 वाजता
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या कंपनीत संचालक',अंजली दमानियांचा आरोप
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकारावरून अंजली दमानियांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कंपनीत संचालक आहेत, असा आरोप अंजली दमानियांनी केलाय. यासंदर्भात अंजली दमानियांनी ट्विटवर व्हिडिओ शेअर केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 09:02 वाजता
कर्जतमध्ये बंदूक रोखून दहशत माजवण्याचा प्रयत्न
Raigad : रायगडमध्ये बंदुकीचा धाक दाखवत तरुणावर गोळ्या झाडण्याची धमकी देण्यात आलीय. हा प्रकार कर्जतच्या साकोळमध्ये घडलाय. नारळाची वाडी इथं एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टर संजू जगदीश मोहिते यांना आरोपी शोएब बुबरे यांनी बंदुकीचा धाक दाखवत 30 हजार रुपयांची खंडणी मागितली. धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शोएब बुबरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस तपास करीत आहेत.
22 Dec 2024, 08:08 वाजता
शरद पवार आज भीमथडी यात्रेला भेट देणार
Sharad Pawar : शरद पवार आज भीमथडी यात्रेला भेट देणार आहेत.. पुण्यातील पुणे कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर इथं 18वी भीमथडी यात्रा भरलीये.. या यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण कला, संस्कृतीचं दर्शन घडतं.. सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत ही यात्रा सुरु असते.. या यात्रेतून ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन मिळतं.. आज या यात्रेला शरद पवार भेट देणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 07:42 वाजता
नाशिकमध्ये गळ्यात नायलॉन मांजा अडकल्यानं शिक्षक गंभीर जखमी
Nashik : नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने शिक्षक गंभीर जखमी झालाय... दुचाकीवरून जात असताना अचानक शिक्षकाच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला... यावेळी हा मांजा पकडण्याच्या नादात शिक्षकाचा तोल गेल्याने, शिक्षक दुचाकीवरून खाली पडला.. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झालीयं... मात्र या घटनेमुळे बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री शहरात अद्याप सुरूच असल्याचं समोर आलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Dec 2024, 07:35 वाजता
मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या बसला आग
A running bus caught fire on the Mumbai-Goa highway : मुंबई गोवा महामार्गावर धावत्या खासगी बसला भीषण आग लागली. आगीत बससह प्रवाशांचे साहित्य जळून खाक झालेत. ही बस मुंबईतील जोगेश्वरीहून मालवणकडं जात होते. बसमध्ये 34 प्रवासी होते. कोलाडमधील कोकण रेल्वे पुलाजवळ बसच्या मागील बाजूस स्फोट झाला आणि बसनं पेट घेतला. तातडीनं प्रवाशांना खाली उतरवण्यात आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बातमीचा व्हिडीओ पाहा-