Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 03 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
3 Jan 2025, 19:21 वाजता
बच्चू कडू यांचा तडकाफडकी राजीनामा
Bacchu Kadu's Resignation : बच्चू कडू यांनी राजीनामा दिला आहे. दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा बच्चू कडू यांनी राजीनामा दिला आहे. दिव्यांग कल्याण अभियानासाठी सरकारकडून निधीबाबत उदासीन वागणूक दिली जात असल्यानं, आपण राजीनामा देत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Jan 2025, 19:04 वाजता
अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं - बजरंग सोनावणे
Bajrang Sonawane : बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवारांनी घ्यावं अशी मागणी, राष्ट्रवादी SPचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. अजित पवार पालकमंत्री झाले तर त्यांना बीडमध्ये काय सुरू आहे याची माहिती मिळेल असं बजरंग सोनावणे म्हणाले. तर अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यास जिल्हा सरळ करु शकतात अशी प्रतिक्रिया, भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. दरम्यान राष्ट्रवादीने बीडचं पालकमंत्रिपद गेलं तर पालकमंत्री कोण करायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Jan 2025, 18:08 वाजता
उद्धव ठाकरेंची आढावा बैठक, बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
Uddhav Thackeray's Meeting : उद्धव ठाकरेंनी उपनगरातील उपविभाग प्रमुखांची बैठक घेतलीये.. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ही बैठक घेतलीये..या बैठकीत उद्धव ठाकरेंनी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केलीये...तसेच उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत... मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील वॉर्डनिहाय आरक्षणानुसार इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागा..तसेच महापालिका निवडणुकीत मतदारसंख्या वाढवणे आणि मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी उपविभाग प्रमुखांना बैठकीत केल्या आहेत.
3 Jan 2025, 16:43 वाजता
घरात पोलिसांची गुप्तपणे पाळत - जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या घरात सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत घुसले गोपनीय पोलीस.. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत, जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला सवाल.. पत्रकार परिषद सुरू असताना आव्हाड भडकले. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर वॉच ठेवावा आव्हाडांचा संताप.. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना का घुसलात? आव्हाडांचा गोपनीय पोलिसांना सवाल.
3 Jan 2025, 15:31 वाजता
राजन साळवी यांचे पक्ष बदलाचे संकेत
Rajan Salvi : योग्यवेळी योग्य निर्णय घेईन असं विधान राजन साळवी यांनी केलंय.. माझ्या पराभवाला वरिष्ठ कारणीभूत याचा शोध घेतला गेला पाहिजे असं विधान करत राजन साळवी यांनी दिले पक्ष बदलाचे संकेत.
3 Jan 2025, 14:25 वाजता
नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंचं स्मारक पूर्ण करणार-फडणवीस
Satara Devendra Fadanvis : नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंचं स्मारक पूर्ण करणार, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. स्मारकासाठी 10 एकर जमिनीचं अधिग्रहण करा, अशा सूचना फडणवीसांनी जिल्हाधिका-यांना दिल्यात.
3 Jan 2025, 14:09 वाजता
राजकारण आणि खेळात कधी काय घडेल सांगू शकत नाही - गोगावले
Bharat Gogawale On Devendra Fadanvis : सामनातल्या फडणवीसांच्या कौतुकाबाबत भरत गोगावले यांनीही प्रतिक्रिया दिलीय...राजकारण आणि खेळ या दोघांमध्ये कधी काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही असं गोगावले म्हणालेत
3 Jan 2025, 13:30 वाजता
भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे - लक्ष्मण हाके
Laxman Hake On Chhagan Bhujbal : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्या, अशी मागणी केलीय. आम्हाला जन्माने ओबीसी असलेले मंत्री नकोत तर ओबीसीसाठी काम करणारे मंत्री हवेत, असं हाकेंनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांनी भुजबळांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी हाकेंनी केलीय.
3 Jan 2025, 13:18 वाजता
उत्तम जानकरांचे मोहित कंबोज यांच्यावर आरोप
Uttam Jankar On Mohit Kamboj : राज्यातील विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून झाला होता आता त्याचा थेट संबंध मोहित कंबोज यांच्याशी लावण्यात येतोय. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केलेत आहे. मोहित कंबोज यांच्यावर राज्यातील ईव्हीएम मशीनची सगळी जबाबदारी होती आणि त्यांनी ती पार पाडल्याचं दावा जानकर यांनी केला. त्यामुळे जानकर यांनी आणखी एका नव्या विषयाला तोंड फोडलंय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Jan 2025, 13:12 वाजता
कुठल्याही आरोपीला VIP ट्रीटमेंट देऊ नका - सुळे
Pune Supriya Sule : वाल्मिक कराडला मिळत असलेल्या व्हिआयपी ट्रीटमेंटबाबत सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीय. कुठल्याही व्यक्तीला व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये आणि परभणी, बीड घटनेत पारदर्शकपणे न्याय मिळावा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय