Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 03 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
3 Jan 2025, 12:35 वाजता
लातूरमध्ये 7 जानेवारीला चक्काजाम आंदोलन
Latur Protest : मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जातोय. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात 7 तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणारेय.... सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर शहरात एक बैठक पार पडली त्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला. हा चक्काजाम सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आली...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Jan 2025, 11:58 वाजता
'विच्छा माझी पुरी करा'
Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड बीडच्या तुरुंगात आहे. तुरूंगात असूनही त्याच्या मागण्या मात्र वाढत आहेत. स्लीप एपनिया आजार असल्याचा दावा वाल्मिकनं कोर्टात केलाय. त्यासाठी ऑटो सीपॅप मशीन द्यावी, एक मदतनीस द्यावा, अशी मागणी अर्जाद्वारे त्यानं न्यायालयाकडे केलीय.
बातमी पाहा - Walmik Karad ला गंभीर आजार! कोर्टाला म्हणाला, कोठडीत 'ही' मशीन द्या; 24 तास हेल्परही हवा
3 Jan 2025, 11:38 वाजता
दरडग्रस्त तळीये गावात पाणीटंचाई
Raigad Water : महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावात सात वाड्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावतेय. तळीये गावासाटी वरंध धरणातून पाणीपुरवठा केला जाणारेय. मात्र अद्यापही त्याचं काम सुरू झालेलं नाही. त्यामुळे तळीये ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. दरम्यान शासनानं पाण्याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी होतेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Jan 2025, 11:22 वाजता
नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात गोळीबार
Navi Mumbai Firing : नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात गोळीबार झालाय. डीमार्ट जवळ हा गोळीबार झालाय. दोन जणांकडून पाच ते सहा राऊंड फायरिंग करण्यात आलीये. त्यानंतर दोघं जण बाईकवरून फरार झालेत. गोळीबारात एक जण जखमी झालाय. दरम्यान सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरूये.
3 Jan 2025, 11:20 वाजता
जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छताचे प्लॅस्टर कोसळले, 3 विद्यार्थी जखमी
Gondia : गोंदियाच्या साईटोला गावात जिल्हा परिषद शाळेतील छताचे प्लास्टर मुलांवर कोसळल्याची घटना घडलीयं... मुलांवर छताचे प्लास्टर कोसळल्याने 3 विद्यार्थी जखमी झालेत.... त्यामुळे जिल्हा परिषद या कडे लक्ष देत नाही , तो पर्यत मुलांना शाळेत न पाठवण्याची भूमिका पालकांनी घेतलीयं...
3 Jan 2025, 10:59 वाजता
'सामना'तून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Saamana Editorial On Chief Minister Devendra Fadanvis : मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मलईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याचेच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत पोहोचले व त्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले. संपूर्ण देश नवीन वर्षाच्या स्वागतात आणि उत्सवात मग्न असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीमध्ये घालवला. नुसताच घालवला नाही, तर अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन केले. काही प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्या वेळी बोलताना त्यांनी गडचिरोलीच्या विकासाचं नवं पर्व सुरू केल्याचं म्हटलंय.
3 Jan 2025, 09:48 वाजता
धनंजय देशमुख यांचं पोलिसांना पत्र
Beed Dhanajay Deshmukh : मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. धनंजय देशमुख यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलंय... पोलीस ठाण्यातच अरेरावी करण्यात आल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय. बाहेरील लोक थेट कराडच्या पोलीस कोठडीपर्यंत जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तसंच वाल्मीक कराडला मिळत असलेल्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही केलाय. काही पोलीस अधिकारी बाहेरच्या लोकांना मदत करत असून एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी या पत्रातून केलीय....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Jan 2025, 09:37 वाजता
'श्री विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा'
Pandharpur : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघानं केलीय. ही समिती गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे. पंढरपुरात येणा-या वारक-यांना ही समिती सोई-सुविधा देत नाही, असा आरोप मराठा महासंघानं केलाय. समितीवर नव्या व्यक्तींना संधी देण्याची मागणीही या महासंघानं केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Jan 2025, 08:55 वाजता
रायगडमध्ये शिवसेना UBT पक्षात मोठे फेरबदल
Raigad Shivsena UBT : रायगड जिल्ह्यात शिवसेना UBT पक्षात मोठे फेरबदल करण्यात आलेत. दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी नंदू शिर्के यांची निवड करण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर पदाधिकारी बदल प्रक्रियेला सुरूवात झालीय. श्रीवर्धन आणि महाड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी नंदू शिर्के यांना देण्यात आलीय. अनिल नवगणे यांच्या हकालपट्टी नंतर शिर्के यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागलीय. म्हसळ्यातले नंदू शिर्के यापूर्वी उपजिल्हाप्रमुख होते आता त्यांना जिल्हा प्रमुख म्हणून बढती मिळाली.
3 Jan 2025, 08:38 वाजता
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक
Mumbai-Solapur Vande-Bharat Express : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केलीय. दगडफेकीत एक्स्प्रेसच्या सी-11 बोगीची काच फुटलीय.. सोलापूर जिल्ह्यातली जेऊर स्थानकाजवळ दगडफेक झालीय. सुदैवानं यात कोणत्याही प्रवासाला दुखापत झाली नाहीय.. मात्र मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवरील दगडफेकीचं कारण अस्पष्ट आहे.
बातमी पाहा - महाराष्ट्र UP-बिहारच्या मार्गावर? सोलापूरमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेक; कारण...