Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 03 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
3 Jan 2025, 08:30 वाजता
नाशिक शहर आणि परिसरात पुन्हा थंडीचं पुनरागमन
Nashik Cold : नाशिक शहर आणि परिसरात गेल्या पंधरवड्यापासून थंडीचा कडाका गायब झाला होता. मात्र नववर्षाला प्रारंभ होताच शहरात थंडीचं पुनरागमन झालं. बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झाला. आजपासून पुढील पाच ते सहा दिवस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगावसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. उत्तरेतील थंडी आता महाराष्ट्राकडे सरकली असून गारवा निर्माण झालेला जाणवतोय..
3 Jan 2025, 08:28 वाजता
देशात काँग्रेसचं 'जय बापू, जय भीम, जय संविधान' अभियान
Congress Campaign : देशात आजपासून काँग्रेस 'जय बापू, जय भीम, जय संविधान' अभियान राबवणारेय. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात येणारेय, अशी माहिती काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी दिलीय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ असलेल्या मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी या अभियानाचा समारोप होणारेय.