Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 05 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

5 Jan 2025, 22:07 वाजता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी

 

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल...हितेश धेंडे नामक तरुणाकडून धमकी...तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी... तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु...धमकी देणारा तरुण श्रीनगर वारली पाडा या ठिकाणी राहणारा असल्याची माहिती

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

5 Jan 2025, 20:30 वाजता

मनोज जरांगेंवर परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल

 

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर परळीत अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय...परभणीत धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जरांगे यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं..याविधनानंतर अनेक जिल्ह्यात मुंडे समर्थक आक्रमक होत मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं.. आंदोलनानंतर परळीत मनोज जरांगेंवर अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आलं आहे... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

5 Jan 2025, 19:29 वाजता

पुण्यातील शिरूर तालुक्यात कोयता गँगची दहशत

 

Pune Koyta Gang : पुण्यातील शिरूर तालुक्यात कोयता गँगची दहशत पसरलीये. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव येथील मनी ट्रान्सफरच्या ग्राहक सेवा केंद्रात घुसून कोयता गँगनं 35 हजारांची रोकड लंपास केलीये.. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी 24 तासाच्या आत या आरोपींना अटक केलीये. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.. 

5 Jan 2025, 18:14 वाजता

बीडमधलं गँगवॉर थांबलं पाहिजे- बजरंग सोनवणे

 

Bajrang Sonawane : बीडमध्ये गँगवॉर सुरु असल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला...बीडमधलं गँगवॉर थांबलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

5 Jan 2025, 17:21 वाजता

सोलापूर बस स्थानकात एसटी बसने घेतला पेट, आगीत बस जळून खाक

 

Solapur Burning Bus : बस स्थानकावर थांबल्या जागी एस टी बसने अचानक घेतला पेट...मोहोळ बस स्थानकात उभ्या असणाऱ्या एसटी बसने घेतला पेट... सांगोल्याहुन हैद्राबादकडे जाणारी बस मोहोळ बसस्थानकात थांबलेली असताना घडली घटना...चालक आणि वाहकांच्या सतर्कतेमुळे पूर्णपणे भरलेल्या बस मधील प्रवाश्यांचा वाचला जीव..एसटी बस मधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे घडला प्रकार...या आगीत सर्व बस जळून खाक झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

 

5 Jan 2025, 16:34 वाजता

'मनोज जरांगेंचा बंदोबस्त करा',लक्ष्मण हाकेंची मागणी

 

Laxamn Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी प्रत्युत्तर दिलंय. कधी, कुठं यायचं ते जरांगेंनी सांगावं, आव्हान हाकेंनी केलंय. काल परभणीच्या सभेत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. देशमुख कुटुंबीयांना त्रास दिला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. समाजाला त्रास झाला तर घरात घुसून मारू, असा इशारा जरांगे यांनी दिला. तर जरांगे चिथावणीखोर वक्तव्य करतायेत. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी हाकेंनी केलीय. 

5 Jan 2025, 14:24 वाजता

जितेंद्र आव्हाडांचे ट्विटरवर गंभीर आरोप

 

Jitendra Awhad Tweet : संतोष देशमुख हत्येप्रकरणी नेमलेल्या SIT मध्ये एक प्रमुख IPS नेमलाय. मात्र, त्यांच्या हाताखाली असलेले अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. PSI महेश विघ्ने यांचे वाल्मिकशी जवळचे संबंध आहेत. तर मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा खास माणूस आहे. ते गेल्या 10 वर्षांपासून बीड LCBमध्ये काम करतात, असाही आरोप आव्हाड यांनी ट्वटरवरून केलाय. 

5 Jan 2025, 13:52 वाजता

बीडमध्ये 4 पोलीस अधिका-यांच्या बदल्या

 

Beed Police Transferred : संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या तपासा दरम्यान पोलीस दलावर वेगवेगळे आरोप होत असताना आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात.. यात देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक वैभव पाटील केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहेत.. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

5 Jan 2025, 12:59 वाजता

मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी-दमानिया

 

Anjali Damania : पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी फोन करुन धमक्या दिल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केलाय. माझे 5 दिवसांचे कॉल रेकॉर्ड तपासा आणि धमक्यांचे फोन करणा-यांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी दमानियांनी केलीये.. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी स्थापन केलेली SIT आणि CID चौकशी केवळ धूळफेक असल्याचंही त्या म्हणाल्यात...  

5 Jan 2025, 12:25 वाजता

लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

 

Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी प्रत्युत्तर दिलंय. कधी, कुठं यायचं ते जरांगेंनी सांगावं, आव्हान हाकेंनी केलंय. काल परभणीच्या सभेत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. देशमुख कुटुंबीयांना त्रास दिला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. समाजाला त्रास झाला तर घरात घुसून मारू, असा इशारा जरांगे यांनी दिला. तर जरांगे चिथावणीखोर वक्तव्य करतायेत. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी हाकेंनी केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -