Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 05 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

5 Jan 2025, 08:04 वाजता

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

 

Railway Megablock : अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिनही मार्गांवर दुरुस्तीची कामं असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणारेय. हार्बर रेल्वे मार्गावर  पनवेल-वाशी अप आणि डाऊन असा मेगाब्लॉक असणार आहे सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत हा  मेगाब्लॉक घेण्यात येणारेय. मध्य रेल्वेचा माटुंगा-मुलुंड अप-डाऊन धीम्या मार्गावर  सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक असणार आहेत. तर पश्चिम रेल्वेचा चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणारेय.

बातमी पाहा - Mumbai News: नव्या वर्षाचा पहिलाच रविवार मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारा; आज...

5 Jan 2025, 08:01 वाजता

पुण्यात आज जनआक्रोश मोर्चा

 

Pune Janakrosh Morcha : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यात आज जनआक्रोश मोर्चा आयोजीत करण्यात आलाय. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणा-या मोर्चाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -