5 Jan 2025, 11:46 वाजता
13 बांगलादेशी नागरिकांना अटक
Ghatkopar Bangladesh People Arrest : मुंबईच्या घाटकोपरमध्ये पोलिसांनी आज तब्बल १३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. हे सर्व १३ आरोपी नालासोपाराच्या अचोले भागात अनधिकृतपणे राहत होते. गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसानी मोहम्मद अली अहमद मिया शेख या बांगलादेशी आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती. यात मिळालेल्या माहितीच्या आधार ही कारवाई करण्यात आली.बांगलादेशी अनधिकृतपणे भारताच्या सीमा ओलांडून पश्चिम बंगाल मार्गने भारतात आले.त्यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात बांगलादेशींची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Jan 2025, 11:40 वाजता
बीडमधील पोलीस खातं बरखास्त करा - संजय राऊत
Sanjay Raut : बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय...अन्यायाविरोधात आवाज उठवल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय. आका आजही मंत्रिमंडळात बसलेत अशी टीकाही त्यांनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Jan 2025, 11:26 वाजता
पंढरपुरात दर्शन नावाखाली भाविकांची लूट?
Pandharpur Devotees Looted : पंढरपुरात झटपट दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. श्री विठ्ठल रुक्मिणीचे झटपट दर्शन करून देण्यासाठी खाजगी एंजटनं भाविकाकडून 11 हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पालघर जिल्ह्यातील भाविक दर्शनास आल्यानंतर चिंतामणी उत्पात या खाजगी एजंटनं झटपट दर्शन करून देण्यासाठी तब्बल 11 हजार रुपये घेतले. पोलिसांना संशय आल्याने चौकशी केली असता प्रकार उघड झाला. यानंतर चिंतामणी उत्पात वर गुन्हा दाखल झालाय. हा एजंट मंदिरात कोणाच्या संपर्कात राहून दर्शन घडवतो, हे मात्र गुलदस्त्यात आहे. समितीकडून त्याचा शोध घेण्याची गरज आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Jan 2025, 11:11 वाजता
सुरेश धस यांच्या वक्तव्याबाबत मिटकरींची नाराजी
Amol Mitkari On Suresh Dhas : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही ट्विट केलंय. यातून सुरेश धस यांच्या वक्तव्याबाबत मिटकरींनी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Jan 2025, 11:08 वाजता
सुरेश धस यांना आवर घाला - सूरज चव्हाण
Suraj Chavan On Suresh Dhas : सुरेश धस यांना आवर घाला, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केलीय. भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांना काल परभणीतल्या सभेतून प्रश्न विचारल्यानंतर, सूरज चव्हाण आक्रमक झालेत. सुरेश धस महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप चव्हाणांनी केलाय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून, धस यांनी अजित पवारांचे चिमटे काढले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आक्रमक झालेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Jan 2025, 10:33 वाजता
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मला नको - छगन भुजबळ
Chhagan Bhujbal On Dhanajay Munde : धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद मला नको. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिलीये. तसंच मुंडेंचा राजीनामा घ्या, अशी मागणी करत नाही, असं भुजबळ म्हणालेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Jan 2025, 10:24 वाजता
राज्यात थंडीचा कडाका वाढला
State Cold : राज्यात थंडीचा कडाका वाढलाय.. धुळ्यात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये.. तर निफाडमद्येही पारा 10 अंशावर गेलाय.. पुढील तीन दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Jan 2025, 09:20 वाजता
मेट्रो रेल्वेसेवेनं गाठला 1000 किमी लांबीचा टप्पा
Metro Service : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जनतेला नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि नमो भारत रेल्वे सेवेची ची भेट दिलीये.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो रेल्वे सेवेने 1 हजार किलोमीटर लांबीचा ऐतिहासिक टप्पा गाठलाय. 2002 मध्ये माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्लीत आधुनिक मेट्रो रेल्वे सेवेचा प्रारंभ केला होता.. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशभरातील 1000 किलोमीटरच्या ऐतिहासिक टप्यापर्यंत विस्तारलीये.. या नव्या विक्रमासह भारतात जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो सेवेचे जाळं निर्माण झालंय..
5 Jan 2025, 08:47 वाजता
माणिकराव कोकाटेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी माजी मंत्री छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय. ज्यांना जिथं जायचंय ते तिथं जाऊ शकतात. पक्षाने भुजबळांचे खूप लाड केलेत. अजून किती लाड करायचे, अशी बोचरी टीका कोकाटींनी केलाय.
5 Jan 2025, 08:10 वाजता
नागपुरात 3 वाघ, एका बिबट्याचा मृत्यू
Nagpur Tiger, Leopard Death : नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झालाय.. H5N1या व्हायरसमुळे या वाघांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून देण्यात आलाय.. H5N1मुळे वाघाचा मृत्यू झाल्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जातंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -