Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 06 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

6 Jan 2025, 22:09 वाजता

'वाल्मिक कराड परळीचा डॉन पेक्षा डॉन', टू द पॉईंट मुलाखतीत सुरेश धसांचा दावा 

 

Suresh Dhas on Walmik Karad : 'वाल्मिक पंकजा, धनंजय मुंडेंपेक्षा मोठा होऊ लागला होता'...'वाल्मिक कराड परळीचा डॉन पेक्षा डॉन'...'वाल्मिक कराड हा डॉनपेक्षाही मोठा होता'...धनंजय मुंडे वाल्मिक कराडचंच ऐकत होते'...'वाल्मिक समर्थकांची संख्या खूपच वाढली'... टू द पॉईंट मुलाखतीत सुरेश धस यांचा दावा 

6 Jan 2025, 21:49 वाजता

वाल्मिक कराडला ईडीची नोटीस पूर्वीच आली होती- सुरेश धस

 

Suresh Dhas on Walmik Karad : वाल्मिक कराडची 1500 कोटींची संपत्ती'... 'वाल्मिक कराडला ईडीची नोटीस पूर्वीच आली होती'... टू द पॉईंट मुलाखतीत सुरेश धसांचा दावा... '2-4 महिन्यापूर्वी वाल्मिकला ईडीची नोटीस आली'... 'वाल्मिक दिवसाला कोट्यवधीची वसुली करत होता'..वाल्मिकच्या बायकोच्या नावे कोट्यवधीची संपत्ती...ईडीची नोटीस आली मग कारवाई का झाली नाही?.. वाल्मिकला ईडीपासून वाचवणारा कोण?

6 Jan 2025, 20:29 वाजता

संभाजीनगरमध्ये चुलत भावाकडून बहिणीची हत्या

 

Chhatrapati Sambhajinagar Crime : संभाजीनगरमध्ये चुलत भावाकडून बहिणीची हत्या...200 फूट डोंगरावरून मुलीला ढकललं... चुलत भावाला पोलिसांकडून अटक... प्रेम प्रकरणातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती...खावडा डोंगरावरून ढकलून दिल्यानं मुलीचा मृत्यू...पोलिसांकडून अधिक तपास सुरु

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

6 Jan 2025, 19:06 वाजता

...तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही- सूत्र

 

Ajit Pawar on Dhananjay Munde :  बीड प्रकरणात ,जोपर्यंत पुरावा नाही,तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही... खात्रीलायक सूत्रांची माहिती...न्यायालयीन चौकशी, एसआयटी व सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही...तिन्ही चौकशी मध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई करणार...उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धनंजय मुंडेंसंदर्भात भूमिका

6 Jan 2025, 18:34 वाजता

'दिल्लीच्या इंडिया गेटचं नाव बदला',भाजपची पंतप्रधान मोदींकडे मागणी

 

Change India Gate Name : दिल्लीच्या इंडिया गेटचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आलीये... भाजप अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी इंडिया गेटच नाव बदलून भारत माता द्वार करण्याची मागणी मोदींकडे केलीये.. पंतप्रधान मोदींना जमाल सिद्दीकी यांनी पत्र लिहून इंडिया गेटचं नाव बदलून भारत माता द्वार करण्याची मागणी पत्रातून केलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

6 Jan 2025, 17:42 वाजता

संतोष देशमुख हत्या प्रकरण, 3 आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

 

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी...जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदार यांना पोलीस कोठडी

6 Jan 2025, 17:19 वाजता

कैलास फडचा पिस्तूल परवाना रद्द, हवेत गोळीबार करणं भोवलं

 

Kailas Phad : पिस्तुलातून हवेत गोळीबार करणं अखेर कैलास फड याला भोवलंय. कैलस फडसह इतर दोघांचे पिस्तूल लायन्स रद्द करण्यात आलंय. कैलास फडचा हवेत गोळीबार केल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनानं फडवर कारवाई केलीय. याबाबतचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी त्यांच्या सोशल मीडियावरही पोस्ट केला होता. यानंतर जर कुणी अशा पद्धतीनं समाज माध्यमांवर दहशत निर्माण केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

6 Jan 2025, 16:43 वाजता

दादरमध्ये टोरेस ज्वेलर्स कंपनीकडून फसवणूक

 

Torres Jewelers : दादरमध्ये टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीने कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय... कालपासून दादरमधील हे दुकान बंद झाल्याने नागरिकांनी दुकानासमोर मोठी गर्दी केलीये..
भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार असल्याची गुंतवणूकदारांना आश्वासन देण्यात आलं होतं.. गेल्या महिन्यापर्यंत अनेक नागरिकांचे पैसे परतफेड देखील करण्यात आली..तसेच भरलेल्या रकमेच्या सिक्युरिटीसाठी टोरेस कंपनीने डायमंड हिरा देखील दिला..मात्र हा डायमंड हिरा खोटा असून त्याची बाजारभाव किंमत फक्त 500 रुपये इतकीच असल्याचं समोर आलं आहे...या टोरेस कंपनीत लोकांनी 10 लाख तसेच जास्तीत जास्त 50 लाखपर्यंत गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे...

 

6 Jan 2025, 16:08 वाजता

धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला

 

Dhananjay Munde Meets Ajit Pawar : धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला...मंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात दाखल...धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू...बीड प्रकरणी धनंजय मुंडे अजित पवार यांच्यामध्ये चर्चा 

6 Jan 2025, 15:53 वाजता

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, 9 सुरक्षा जवान शहीद 

 

Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला...हल्ल्यात 9 सुरक्षा जवान शहीद झाल्याची माहिती... छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा हल्ला