6 Jan 2025, 14:52 वाजता
मुंबईत ताज हॉटेलबाहेर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या
Mumbai same Number Plate : मुंबईत एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या.. दोन्ही गाड्याचं मॉडेलही एकच.. मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू, ताज हॉटेल परिसरात मिळाल्या एकात नंबर प्लेटच्या दोन गाड्या.. दोन्ही नंबर प्लेट टुरिस्ट पसिंगच्या.. ताज हॉटेल जवळ गाड्या सापडल्याने पोलीस सतर्क. दोन्ही वाहनांना चालकांसह कुलाबा पोलीस ठाण्यात आणण्यात आल.
6 Jan 2025, 14:27 वाजता
ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही - भुजबळांनी जरांगेंना सुनावले
Bhujbal on Jarange : ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना सुनावले.. जरांगेंनी कायदा हातात घेण्याची गरज नाही, जरांगेंचं बोलणं योग्य नसल्याचं छगन भुजबळ यांचं विधान. परभणीच्या सभेत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. देशमुख कुटुंबीयांना त्रास दिला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. समाजाला त्रास झाला तर घरात घुसून मारू, असा इशारा जरांगे यांनी दिला होता.
6 Jan 2025, 14:10 वाजता
धनंजय मुंडेंचा राजीनामा सध्या मागणं योग्य नाही - भुजबळ
Bhujbal on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं मला वाटतं नाही...आका-काका जे कोणी असतील जर दोषी आढळले तर कारवाई करण्यात यावी मात्र चौकशीआधीच त्यांनी राजीनामा का द्यावा असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.... देशमुख हत्येचं प्रकरण गंभीर आहे...त्याची कसून चौकशी व्हायला हवी...आणि चौकशीनंतर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर मुख्यमंत्री कारवाई करतील असं वक्तव्य आणि मागणी भुजबळांनी केलीय. मात्र कुणावरही अन्याय होऊ नये, असं म्हणत मुंडेंची बाजू जणू भुजबळांनी मांडली.
6 Jan 2025, 12:34 वाजता
मतं दिली म्हणजे मालक झाले का? - अजित पवार
Ajit Pawar & Chandrashekar Bawankule : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या सभेत कार्यकर्त्यावर संतापले. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक झाले का?, मला सालगडी केलंय का?, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. एका कार्यक्रमात नागरिक अजित पवारांना कामासंदर्भात निवेदन देत होते. यावेळी एका कार्यकर्त्यानं अनेक कामे झाले नसल्याचे म्हटले. यावर अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय. तर जनताच मालक आहे, असा चिमटा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना काढलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा - .
6 Jan 2025, 12:22 वाजता
बीडमध्ये मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल
Manoj Jarange : धनंजय मुंडेंच्या विरोधात परभणीत केलेल्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांच्यावर बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. परळीपाठोपाठ आता बीडमध्ये जरांगेवर गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकांनी काल दुपारपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. अखेर पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी ओबीसी बांधवांनी केलीय. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Jan 2025, 12:08 वाजता
तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत अचानक बदल
Tuljabhawani Temple : तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत अचानक बदल झालाय. आता भाविकांना गाभा-यातून दर्शन घेता येणारेय नाहीये. मंदिराच्या गाभा-याचं काम सुरू असल्यानं दर्शनाची व्यवस्था बदलण्यात आलीये. मात्र अगोदर सूचना न देताच मंदिर संस्थांनी गाभा-यातलं दर्शन बंद केल्यानं भाविकांमध्ये नाराजी आहे. भाविकांना सध्या खिडकीतूनच दर्शन घेता येणारेय. तर मंगळवारी पहाटेपर्यंत दर्शन पूर्ववत होण्याची अपेक्षा भाविकांना आहे.
6 Jan 2025, 12:06 वाजता
शरद पवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
Sharad Pawar Letter To Devendra Fadanvis : शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं आहे. लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत, त्यांना राज्य शासनानं योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावं, अशी मागणी निवेदनाद्वारे शरद पवारांनी केली आहे. याचीच माहिती त्यांनी ट्वीट करूनही दिली आहे. गुंड प्रवृत्तीची पाळंमुळं खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. त्यासाठी ते सातत्यानं शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे या लोकप्रतिनिधींना सरकारनं संरक्षण द्यावं, असं पवारांनी पत्रात म्हटलंय.
6 Jan 2025, 11:14 वाजता
वाघिणीची वाट रोखणं पडलं महाग
Nagpur : नागपूरमधील वाघिणीची वाट रोखल्याप्रकरणी तीन महिन्यांचं निलंबन करण्यात आलंय चार जिप्सी चालक आणि गाईडचं तीन महिन्यांसाटी निलंबन करण्यात आलंय. आधी एका आठवड्यांसाठी निलंबन करण्यात आलं होतं.. मात्र त्या वाढ करून तीन महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलंय.. नागपूरमधील उमरेड पवनी कऱ्हांडला अभरण्यातील F2 वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांची वाट जिप्सी चालक, पर्यटकांनी रोखली होती.. त्यानंतर प्रशासनानं कारवाई केलीय. तसेच जिप्सी चालकांना 25 हजार रुपये दंड, तर गाईड यांना प्रत्येकी हजार रुपये दंड लावण्यात आला
6 Jan 2025, 10:09 वाजता
बीडमध्ये संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा
Beed Protest : बीडमध्ये आज संविधान बचाव जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. सर्व दलित संघटनां या मोर्चामध्ये सहभागी होणारेत. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याचा आरोप करत पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य करणारे अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणारेय. परभणीमध्ये महिलांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावे, देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्यावेत, शासकीय नोकरीतील रिक्त असलेल्या राखीव जागा भराव्यात याही मागण्या या मोर्चातून केल्या जाणारेत.
6 Jan 2025, 09:51 वाजता
धाराशिवमध्ये 11 जानेवारीला सर्वपक्षीय मूकमोर्चा
Dharahiv Morcha : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये जिल्ह्यात सर्वपक्षीय मूकमोर्चा निघणारेय. 11 जानेवारीला धाराशिव शहरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मनोज जरांगे पाटील या मोर्चात सहभागी होणारेत. या मोर्चाची तयारी सुरू आहे.