Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 06 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

6 Jan 2025, 09:49 वाजता

वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात 70 जनावरांना विषबाधा

 

Wardha Cow : वर्ध्यातील आर्वी तालुक्यात 70 जनावरांना विषबाधा झालीये. सावळापूर शिवारात ही घटना घडलीय. यात आतापर्यंत 11 जनावरांचा मृत्यू झालाय. तर 59 जनावरांवर पशुवैद्यकीय अधिका-यांकडून उपचार सुरूयेत. कपाशीची बोंड खाल्ल्यानं विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारण स्पष्ट होणारेय.

6 Jan 2025, 09:10 वाजता

सुषमा अंधारेंचा सुजय विखेंवर निशाणा

 

Sushma Andhare On Sujay Vikhe Patil : सुषमा अंधारे यांनी सुजय विखे पाटलांवर निशाणा साधलाय. शिर्डीच्या साई संस्थानमध्ये मोफत भोजन बंद करा. त्यावरील पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करा, अशी मागणी सुजय विखे पाटलांनी केली होती. यावरून सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात. आपल्या संस्थेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देता का? असा सवाल अंधारेंनी सुजय विखे पाटलांना केलाय. चौथी ते पाचवीच्या मुलांकडून दीड लाख रुपयांची फीस घेता, यावेळी तुमचा समाजकार्याचा दृष्टिकोन कुठे जातो?, असं पत्र सुषमा अंधारेंनी विखे पाटलांना लिहिलंय.

 

6 Jan 2025, 08:02 वाजता

कोकणातील केशर आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल

 

Navi Mumbai APMC Mango : कोकणातील केशर आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल झालीय. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये आंब्याची पहिली पेटी दाखल झालीय. देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्या आंबा बागेतील ही 5 डझनची पहिली पेटी आहे. यावर्षीच्या आंबा हंगामातील पहिली केशर आंबा पेटी आहे.

6 Jan 2025, 07:52 वाजता

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे बुजवले

 

Bhiwandi Zee 24 Taas Impact : मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा-खडवली बायपास जवळ नवीन उड्डाण पूलाच्या निर्मितीचं  काम सुरू असून बाह्यवळण रस्ते तयार केलेतं. मात्र या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे  सततची वाहतूक कोंडी होऊन धुळीचे साम्राज्य पसरतंय. वाहन चालकांसह नागरीकांना याचा त्रास सहन करवा लागत होता. तसेच पूलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, वाहतूक धिम्या गतीने सुरू असून सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरीक आणि वाहन चालक हैराण झाले होते. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याबाबींकडे लक्ष केंद्रित करून बाह्यवळण रस्ते दुरुस्ती करुन धुळीची समस्या सोडवावी या संदर्भाची बातमी झी २४ तासने दाखवली होती.त्याची दखल घेत तातडीने रस्त्यावर डांबर घालण्यात आलं.आणि उड्डाणपुलाच्या कामालाही गती आलीय.