लग्न झालेल्या पुरुषाचा वाघाचं डॉगी व्हायला वेळ लागत नाही? बाई गं चित्रपटातील गाणं प्रदर्शित

Bai Ga Movies New Song :  तुम्हाला वेड लावायला 'बाई गं' चित्रपटातील आणखी एक गाणं 'वाघाचा डॉगी' प्रदर्शित! 

दिक्षा पाटील | Updated: Jul 3, 2024, 08:12 AM IST
लग्न झालेल्या पुरुषाचा वाघाचं डॉगी व्हायला वेळ लागत नाही? बाई गं चित्रपटातील गाणं प्रदर्शित  title=
(Photo Credit : Social Media)

Bai Ga Movies New Song : प्रत्येक कपलची लव्ह स्टोरी खास असते पण जेव्हा त्या लव्ह स्टोरीमध्ये एखादी बायको रुसते तेव्हा नवऱ्याला दिवसात पण तारे दिसतात यात काही शंका नाही. 'वाघाचा डॉगी' या गाण्यात सुद्धा अभिनेता स्वप्नील जोशीची हालत अशीच काहीशी झाली आहे. लग्ना नंतरच्या रुसवा रुसवी नंतर एकाद्या नवऱ्याची कशी तरा होते हे या गाण्यात आपण पाहू शकतो. बसल्या जागी तो बिचारा पूर्णपणे फसलाय. 'वाघाचा डॉगी' या गाण्यात परदेशातल्या मुली चक्क मराठी गाण्यावर आपले पाय थिरकवताना दिसत आहे. गाण्याचं म्युजिक इतकं कमालीचं आहे कि प्रेक्षकांना वेड लावेल इतकच नव्हे तर या गाण्याचं हूक्सटेप सुद्धा फार युनिक आहे. 

नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, असच काही घडलय स्वप्नील जोशी सोबत। वर्तमान आयुष्यात तरी त्याला बायकोचं मन काही कळालं नाही, मागच्या 5 जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा तो कसा पूर्ण करतो आता हे येत्या 12 जुलैला आपल्याला 'बाई गं' हा चित्रपट पाहिल्यानंतर समजेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या भन्नाट चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीझ झालाय ट्रेलर मध्ये आपण स्वप्नीलची तारेवरची कसरत पाहू शकतो. कॉमेडी आणि भावनेने भरपूर असा हा ट्रेलर असून यात शेवटी स्वप्नील ला बाईच्या मनाला समजायला बाई चं रूप घ्यावं लागतंय। आता या चित्रपटाचा शेवट नक्की काय असेल हे पाहणं रोमांचक ठरणार आहे। या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे. 'बाई गं' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' हा चित्रपट 12 जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.