Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 06 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

6 Jul 2024, 22:40 वाजता

'लवकरच सगेसोयरेबाबत अधीसूचना निघणार', चंद्रकांत पाटलांची माहिती

 

Chandrakant Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे लवकरच सगे सोयरेबाबत अधीसूचना निघणार आहे...मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिलीये...तर ओबीसी आरक्षणाला यामुळे धक्का लागणार नसल्याचा दावाही पाटलांनी केलाय...2017 सालीच मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी रक्त संबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची गरज नसल्याचा कायदा केला असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितलं....दोन्ही समाजांना एकत्र बसवून कोणत्याही समाजाचं नुकसान होणार नाही यासाठीच सोमवारची बैठक असल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलंय...

6 Jul 2024, 22:05 वाजता

'महिलांना खटाखट नाही, पटापट लाभ', मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

 

Eknath Shinde : महायुतीच्या मेळाव्यात लाडकी बहीण योजनेवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला... विधिमंडळात योजनेवर टीका करणारेच शाखाशाखांवर आणि गावोगावी फॉर्म वाटत आहेत, असा टोला शिंदे-फडणवीसांनी लगावला... सावत्र भावांपासून सावध राहा, असा इशारा फडणवीसांनी दिला. तर महिलांना खटाखट नाही, तर पटापट लाभ देऊ, अशा शब्दांत शिंदेंनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 Jul 2024, 21:02 वाजता

'महायुतीची बदनामी करणाऱ्यांची खैर नाही', अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

 

Ajit Pawar : महायुतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वपक्षीय कार्यकर्त्यांना तंबी दिली.. तर देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या प्रवक्त्यांनाच खडसावलं... तिकीट मिळालं नाही तर महायुतीच्या विरोधात बोलू नका... महायुतीची बदनामी करणा-यांवर कारवाई केला जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला... तर महायुतीत विसंवाद निर्माण होईल अशी वक्तव्यं करू नका, अशा शब्दांत फडणवीसांनी वाचाळवीर प्रवक्त्यांना ठणकावलं.

6 Jul 2024, 20:01 वाजता

बारामतीत तुकोबांच्या पालखीत सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार आमनेसामने 

 

Supriya Sule : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार आज तुकोबांच्या पालखीत आमनेसामने आल्या... संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये विसावला. या सोहळ्याच्या स्वागतासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या दोघीही उपस्थित होत्या. पालखी सोहळा विसावल्यानंतर समाज आरती होते. यावेळी सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना हात दाखवून त्यांचं लक्ष वेधलं... आरतीला या तुम्ही... असं म्हणत त्यांना बोलावलं... यावेळी आरतीला सुप्रिया सुळेंची आई प्रतिभा पवार या देखील उपस्थित होत्या. लोकसभा निवडणुकीत नणंद-भावजयी एकमेकींच्या विरोधात लढल्या होत्या... मात्र वारीमध्ये एकत्र येताना राजकारण आणि कुटुंब वेगळं असल्याचं दोघींनीही दाखवून दिलं...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 Jul 2024, 19:12 वाजता

रविकांत तुपकर विधानसभेच्या 6 जागा लढवणार

 

Ravikant Tupkar : बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभेच्या 6 जागा लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. स्वतः तुपकर निवडणूक लढवणार असून, जिल्ह्यातील 6 विधानसभेत ते स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. तसंच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. विशेष म्हणजे राजू शेट्टी यांच्या सोबत या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच इतर कोणत्याही पक्षाची ऑफर आल्यास कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

6 Jul 2024, 18:19 वाजता

'आरक्षण छगन भुजबळांची मक्तेदारी नाही', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना टोला

 

Manoj Jarange : आरक्षण ही छगन भुजबळची मक्तेदारी नाही.. भुजबळचं ऐकून मराठ्यांवर अन्याय कराल तर 288 पैकी एकही सरकारचा उमेदवार निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.. हिंगोलीतील शिवनेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीला सुरूवात झाली... ओबीसींचा जो नेता मराठ्यांच्या विरोधात काम करेल, त्याला पाडायचं म्हणजे पाडायचंच असं आवाहनही त्यांनी केलं... तू कितीही पैसे वाट, तुला पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता दिला. 

6 Jul 2024, 17:32 वाजता

पुण्यात पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

 

Pune Police Recruitment : पुण्यात पोलीस भरतीदरम्यान चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू झालाय..शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवरची घटना... तुषार भालके असं मृत तरुणाचं नाव... तुषार मूळचा संगमनेर तालुक्यातील कोठे गावचा रहिवासी आहे...

 

6 Jul 2024, 17:06 वाजता

रायगडमध्ये पावसाळी पर्यटनावर प्रतिबंध

 

Raigad Restrictions on Monsoon Picnic​ : लोणावळा, खालापूर येथील दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटनावर प्रतिबंध लावण्यात आलेत...माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाट, सिक्रेट पॉइंट, देवकूंड धबधब्यावर प्रतिबंध करण्यात आलाय...या ठिकाणी दारू पिणे, खोल पाण्यात उतरणे, पाण्याच्या मोठ्या झोताखाली बसणे यावर निर्बंध लावण्यात आलेत....धबधबे, दरी, धोकादायक वळणे या ठिकाणी सेल्फी काढणे, अतिवेगाने वाहने चालवणे यावर निर्बंध लागू केलेत....माणगावचे प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी हे आदेश जारी केलेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 Jul 2024, 16:19 वाजता

23 जुलैला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार

 

Central Government Budget 2024 : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरु होत आहे. 22 जुलै ते 12 ऑगस्ट असा केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यक्राळ असणार आहे. तर 23 जुलैला लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाईल. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ही माहिती दिली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 Jul 2024, 15:31 वाजता

'सत्याचा विजय झालाय', खासदार रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया

 

Ravindra Waikar : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय...कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय...मुंबई मनपाकडून गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...तर सत्याचा विजय झालाय अशी प्रतिक्रिया वायकरांनी दिलीय...