रविवारपासून भारत - बांगलादेश टी20 सीरिज, फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार LIVE?

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध टी 20 सीरिज खेळण्यासाठी उतरणार आहे. पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार असून हा सामना प्रेक्षकांना लाईव्ह कुठे आणि कधी पाहता येईल याबाबत जाणून घेऊयात.

पुजा पवार | Updated: Oct 4, 2024, 04:05 PM IST
रविवारपासून भारत - बांगलादेश टी20 सीरिज, फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार LIVE?   title=
(Photo Credit : Social Media)

IND VS BAN T20 Series : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात काही दिवसांपूर्वी दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात आली होती. या सीरिजमध्ये चेन्नई आणि कानपुर येथील दोनही सामने जिंकून टीम इंडियाने टेस्ट सीरिज 2-0 ने आघाडी घेत जिंकली. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध टी 20 सीरिज खेळण्यासाठी उतरणार आहे. पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार असून हा सामना प्रेक्षकांना लाईव्ह कुठे आणि कधी पाहता येईल याबाबत जाणून घेऊयात.

कधी होणार सामना?

6 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला टी 20 सामना खेळवण्यात येणार आहे.  हा सामना श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम मध्यप्रदेशवर येथे खेळवला जाणार आहे. सीरिजचा दुसरा सामना हा 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. तर 12 ऑक्टोबर रोजी भारत - बांगलादेश टी 20 सीरिजचा तिसरा सामना हा हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. 

फ्रीमध्ये कुठे पाहता येणार लाईव्ह?

भारत विरुद्ध बांगलादेश टी 20 सीरिजच्या सर्व सामन्यांचा लाईव्ह टेलिकास्ट Sports18 Network या टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात येईल. तर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा अँप तसेच वेबसाईटवर पाहू शकता. टी 20 सीरिजचे सामने तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनलवर फ्रीमध्ये पाहू शकता. मात्र ही सुविधा केवळ डीडी फ्री डिश आणि अन्य DTT (Digital Terrestrial Television) उपभोक्त्यांसाठीच उपलब्ध असेल. भारत विरुद्ध बांगलादेश टी 20 सामना डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाणार नाही जो केबल टीव्ही किंवा डीटीएच प्लॅटफॉर्म जसे की डिशटीव्ही, एअरटेल डिजिटल टीव्ही आणि टाटा प्लेवर प्रसारित केला जाईल. तसेच तुम्ही भारत विरुद्ध बांगलादेश पहिला सामना हा स्पोर्ट्स 18 च्या चॅनेलवर तसेच जिओ सिनेमावर सुद्धा पाहू शकता.  

हेही वाचा : एकाच मंडपात एकाच वेळी 4 भावांचं लग्न... T-20 मधील जगातील अव्वल गोलंदाज लग्नबंधनात अडकला

भारताची टीम  :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, रियान पराग, नीतीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंह, हर्षित राणा, मयंक यादव.

बांग्लादेशची टीम :

नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), तंजीद हसन तमीम, परवेज हुसैन इमोन, तौहीद हृदयोय, महमूद उल्लाह, लिटन कुमेर दास, जेकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, शक महेदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन.