Vidhan Parishad Overall Result : विधान परिषद निवडणुकीत महायुतीची सरशी

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 12 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Vidhan Parishad Overall Result : विधान परिषद निवडणुकीत महायुतीची सरशी

12 Jul 2024, 22:42 वाजता

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी 

 

Vidhan Parishad Overall Result : आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी.. विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल समोर आलाय.. या निवडणुकीत महायुतीची सरशी झालीय. तर मविआला मात्र धक्का बसलाय. महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत.. तर मविआचे तीनपैकी दोनच उमेदवार विजयी झाले.. शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का बसलाय.. भाजपच्या पाचही उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला.. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचाही विजय झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

12 Jul 2024, 16:24 वाजता

विधान परिषदेसाठी सर्व 274 आमदारांनी बजावला मतदान हक्क

 

Vidhan Parishad Voting : विधान परिषदेसाठी सर्व 274 आमदारांचं मतदान पूर्ण...11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात... 274 आमदारांनी बजावला मतदान हक्क.. संध्याकाळी पाच वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार.. निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं लक्ष.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

12 Jul 2024, 14:39 वाजता

भाजप आमदार मेघना बोर्डिकरांचा व्हिडिओ व्हायरल

 

Meghna Bordikar : भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत. हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत.

बातमी पाहा - नेमका प्रकार काय? भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; विधानसभेतील VIDEO व्हायरल

12 Jul 2024, 14:35 वाजता

भाजप आमदार गणपत गायकवाडांनी बजावला मतदानाचा हक्क

 

Ganpat Gaikwad : अखेर भाजप आमदार गणपत गायकवाडांनी मतदान केलंय...केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर गायकवाडांनी मतदान केलं...गायकवाड हे जेलमध्ये शिक्षा भोगत असल्याने त्यांना मतदान करायला देऊ नये अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती....

12 Jul 2024, 14:18 वाजता

पूजा खेडकरांच्या बंगल्यावर कारवाई होण्याची शक्यता

 

Pune IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या बंगल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.. पुण्यातील बाणेरमध्ये पूजा खेडकरांचा ओम दिप नावाचा कोट्यवधींचा बंगला आहे.. या बंगल्याचा काही भाग अनधिकृत आहे.. पुणे महानगर पालिकेकडून बंगल्याच्या अनधिकृत भागावर कारवाई होण्याची शक्यता आहे.. 

12 Jul 2024, 14:16 वाजता

संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची विधानभवनात भेट

 

Sanjay Raut & Chandrakant Patil : जुने मित्र विधान भवनात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं...ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांची विधानभवनात गळाभेट झाली...यावेळी तुम्हाला पाहून पुन्हा इथे आलो असं चंद्रकांत पाटील राऊतांना म्हणाले...त्यावेळी आपण एकत्र यायलाच पाहिजे असं राऊतांनी पाटलांवर टोलेबाजी केली...

12 Jul 2024, 13:22 वाजता

मुंबई एअरपोर्टवर सीमाशुल्क विभागाची धडक कारवाई

 

Mumbai Airport Gold Seized : मुंबई विमातळावर सीमाशुल्क विभागाने धडक कारवाई सुरू केलीये....गेल्या 8 दिवसांत सीमाशुल्क विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 16 किलो सोनं पकडलंय..या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 10 कोटी 8 लाख रुपये आहे....यामध्ये एका व्यक्तीने पेनाच्या  रिफिल्समधून सोनं लपवून आणलं होतं...तर एकाने कुकीजच्या बॉक्समध्ये सोन लपवलं होतं...सोन्याचे दागिने, बार, पावडर, पेस्ट अशा विविध प्रकारे सीमाशुल्क विभागाने सोन्याची तस्करी पकडलीये...2 प्रवाशांकडून बँकाँकमधून आणलेलं ४८ लाखांचं परकीय चलनही जप्त करण्यात आलंय.... दुबई, जेद्दा आणि शारजामधून मुंबईत दाखल झालेल्या 19 भारतीय नागरिकांना या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलीये...

12 Jul 2024, 12:40 वाजता

नवी मुंबईत जलसमाधी आंदोलन

 

Navi Mumbai Protest : नवी मुंबईमध्ये विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन सुरु केलंय.. जल समाधी घेण्यासाठी प्रकल्पग्रस्थ  ओवळे खाडीत उतरलेत...सिडको आणि राज्य शासनाला कंटाळून प्रकल्पग्रस्तांचे हे आंदोलन सुरु आहे.. प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि रोजगार मिळावा, भरावामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन तात्काळ करावे आणि संपादित जमिनीची नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात येतंय.. पोलिसांकडून या प्रकल्पग्रस्ताची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत

12 Jul 2024, 11:13 वाजता

पूजा खेडकरांच्या आईचा 'मुळशी पॅटर्न'

 

IAS Pooja Khedkar Mother : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलंय. हातात रिव्हॉल्वर आणि बाउन्सर घेऊन जमिनीच्या वादा दरम्यानचा हा व्हायरल व्हिडिओ आहे. खेडकर कुटुंबानं पुण्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केलीय त्याच ठिकाणचा हा व्हायरल व्हिडिओ आहे. त्यात मनोरमा खेडकर या बाऊन्सर आणि हातात पिस्तूल घेऊन शेतक-यासोबत वाद घालताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Jul 2024, 11:07 वाजता

NEET Paper Leak Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार एन गंगाधरच्या सीबीआय चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. गंगाधरच्या बँक खात्यातून लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याचा CBIला संशय आहे. त्यामुळे गंगाधर आणि त्याच्या पत्नीच्या नावानं असलेले सर्व बँकेतील माहीती गोळा करून त्याची सखोल चौकशी CBI करत आहे. तर गंगाधरच्या मोबाईलमध्ये असलेले नंबर हे कोडवर्डमध्ये असल्याचं CBI तपासात समोर आलंय. 6 हजार पेक्षा अधिक मेसेजेस सीबीआयनं हस्तगत केलेत. संजय जाधव, जलील पठाण, याच्या चौकशीत दिलेली माहिती गंगाधरकडून क्रॉस चेक केली जात असल्याचीही माहिती आता समोर येतीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -