Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 20 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

20 Jul 2024, 12:35 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : मुंबईतील ग्रँड रोड येथे म्हाडाच्या इमारतीची बाल्कनी कोसळली

ग्रँट रोड स्टेशनजवळच्या चार मजली म्हाडा इमारतीची बाल्कनी कोसळली. काही लोक ढिगा-याखाली सापडल्याची माहिती समोर येतेय.रूबिनिस्सा मंझिल असं इमारतीचे नाव असून म्हाडाने धोकादायक असल्याची नोटीस दिली होती. आज सकाळी ११ वाजताची घटना. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू

20 Jul 2024, 12:19 वाजता

नागपूरला मुसळधार पावसानं झोडपलं

 

Nagpur Rain : राज्याची उपराजधानी नागपूरला पावसानं झोडपून काढलंय.. नागपरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय.. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं अनेक नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय.. 

20 Jul 2024, 11:51 वाजता

अतुल बेनके आणि शरद पवारांची भेट

 

Atul Benke Meet Sharad Pawar : अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतलीय...त्यामुळं आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा रंगलेली आहे. खासदार अमोल कोल्हेंच्या घरी ही भेट घडली...याला शरद पवारांनी ही दुजोरा दिलाय...ज्यांनी लोकसभेत आमचं काम केलं ते आमचे आहेत असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्ष प्रवेशावर सूतोवाच केलंय...तर बेनकेंनी भेट घेतली म्हणून काय झालं?...त्यांनाच विचारा असं म्हणत अजित पवारांनी बोलणं टाळलंय...

20 Jul 2024, 10:55 वाजता

UPSC अध्यक्ष मनोज सोनींचा राजीनामा-सूत्र

 

UPSC : UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...वैयक्तिक कारणास्तव  UPSCच्या अध्यक्षाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय...कार्यकाळ संपण्यापूर्वीच मनोज सोनींनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलंय...मात्र, UPSCअध्यक्षांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिलीय...

20 Jul 2024, 10:50 वाजता

Maharashtra Breaking News Live Update: मनोरमा खेडकर यांना आज कोर्टात हजर केले जाणार

मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. मुळशीतील शेतकऱ्यांना हातात पिस्तूल घेत धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मनोरमा खेडकर या पूजा खेडकर यांच्या आई

 

 

 

20 Jul 2024, 10:02 वाजता

Amravati Rain : अमरावतीतील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस पडलाय...चांदुर बाजार तालुक्यातील माधान, ब्राह्मणवाडा थंडी, सोनोरी गावातील रस्त्याला नदीचे स्वरूप आलंय...अनेक गावातील नदी नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी गावात शिरलंय...त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झालंय...शेती पिकांचेही नुकसान झालं असून, जमिनी खरडून गेल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Jul 2024, 09:41 वाजता

JNPT : नवी मुंबईतल्या JNPT बंदरात कंटेनर्सच्या रांगा लागल्यात.. जवळपास 7 हजार 500 कंटेनर्स निर्यातीच्या प्रतीक्षेत आहेत.. मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे कंटेनर्सची नोंदणी रखडली...कंटेनर गेटमध्ये सोडण्यासाठी अर्ध्या तासाऐवजी 13ते 14 तास लागत आहेत.. तसंच गुजरात ते केरळपर्यंत अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झालाय.. त्यामुळे मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस  सुरु आहे.. याचा फटका JNPTतील भाजीपाल्याच्या कंटेनर्सला बसतोय.. कंटेनर्स बंदरातच रखडल्यानं इंधनासाठी तब्बल 3 कोटी रुपये जादा खर्च होतोय.. ही परिस्थीती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील अशी माहिती देण्यात आलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Jul 2024, 09:22 वाजता

येवल्यात हिट अँड रनची घटना, 3 गंभीर जखमी

 

Nashik Hit And Run : येवल्यात हिट अँड रनची घटना. शुक्रवारी संभाजीनगर महामार्गावर अंदरसुल काळमाथा जवळ स्विफ्ट कारने दुचाकीवरील तिघांना पाठीमागून जोरात धडक दिली .या धडकेत मोटरसायकल वरील तीन जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून कारचालक पळून जात होता. मात्र कोटमगाव इथे काही तरुणांनी कार चालकाला अडवलं.मात्र कार मधील दोनजण फरार झाले असून जमावाने कारचालकाला चोप दिला. 

20 Jul 2024, 09:16 वाजता

15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

 

Rain Alert : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतय.. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीये...हवामान विभागाने 2 जिल्हयांत रेड तर 9 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Jul 2024, 08:26 वाजता

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

 

Vidharbha Rain : विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय...चंद्रपूरला रेड अलर्ट तर नागपूर,वर्धा, अमरावती आणि गडचिरोली येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय...नागपुरात पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढलाय...बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, विदर्भात आज दमदार पावसाची शक्यता आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा -