Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 20 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

20 Jul 2024, 22:31 वाजता

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन

 

Dilip Patil : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते कोल्हापुरात आले असता पुन्हा त्रास सुरु झाल्यामुळे उपचारासाठी त्यांना पुण्याला नेलं जात होतं. मात्र वाटेतच त्यांचं निधन झालं. मराठा आरक्षण आणि EWS संदर्भात दिलीप पाटील यांनी न्यायालयीन लढाई लढली होती. तसंच मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईचे ते प्रमुख याचिकाकर्ते होते. 

20 Jul 2024, 20:15 वाजता

'अदानी स्पर्धक उद्योगपती लाभासाठी आरोप?',राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

 

Rahul Shewale on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर शिंदे पक्षाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. अदानी यांना स्पर्धक असलेल्या उद्योगपतीला फायदा व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद होती का असा सवाल त्यांनी केला. तसंच नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे पक्षाला निधी संकलनासाठी मंजुरी दिली आहे. त्यासाठी पत्रकार परिषदेतून आरोप केले गेले का असा प्रश्नही शेवाळेंनी यावेळी उपस्थित केला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

20 Jul 2024, 18:27 वाजता

'मराठा आरक्षण झुलवत ठेवलं जाणार', प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

 

Prakash Ambedkar : मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्व राजकीय पक्ष विधानसभेपर्यंत झुलवत ठेवतील, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी केलीय. मराठा आरक्षणाबाबत राजकीय पक्षांची काय भूमिका आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना पत्र लिहिले होते. मात्र कोणीही उत्तर न दिल्यामुळं आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

20 Jul 2024, 17:54 वाजता

ठाकरे गटाचं शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024 

 

Uddhav Thackeray : मुंबईत झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना नवी मोहीम दिलीय. 'शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024' असं या मोहिमेचं नाव असून यामध्ये विविध काम करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना देण्यात आलंय. तसेच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून संपर्कप्रमुखांकडून इच्छुक उमेदवारांची नावे देखील मागवण्यात आलंय...

20 Jul 2024, 17:12 वाजता

मनोरमा खेडकरांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

 

Manorama Khedkar : मनोरमा खेडकरांना 2 दिवसांची पोलीस कोठडी....शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी कारवाई

 

20 Jul 2024, 16:14 वाजता

पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार आमनेसामने 

 

Sharad Pawar- Ajit Pawar : पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार आमने सामने आले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीसाठी दोघे एकत्र आले. पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतेय. खासदार शरद पवार यांच्यासह, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हेही यामध्ये उपस्थित आहेत. पुण्यातील विधान भवनामध्ये ही बैठक सुरु आहे. 

20 Jul 2024, 15:51 वाजता

पोलीस अधिकारी विजय कोठावळे वादात, गुन्हेगारासोबत पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस

 

Nashik Police : नाशिकमधील वणी पोलीस ठाण्यातच पोलीस अधिका-यानी दारू तस्कर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमांसोबत वाढदिवस साजरा केला..विजय कोठावळे असे अधिकाऱ्याचे नाव असून ते पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे.. अवैध धंदेचालकांनी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करत पोलिसांसोबत असलेले सबंध उघड केलंय...त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीसांचा कारभाराच सध्या वादात ठरतोय...

20 Jul 2024, 15:03 वाजता

'पुढील 41 दिवसात आचार संहिता लागेल, जोमाने कामाला लागा', उद्धव ठाकरेंचे निर्देश

 

Uddhav Thackeray :  शिवसेना UBT पक्षाची सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली.....पुढील 41 दिवसात आचार संहिता लागेल, त्यामुळे जोमाने करा, उद्धव ठाकरे यांचे निर्देश...4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचे विधानसभा संपर्कप्रमुखांना निर्देश....या भगवा सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची...आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील 4 महिन्यात पंधरा दिवसातून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात आढावा घेण्याचे उद्धव ठाकरे यांचे संपर्कप्रमुखांना निर्देश 

20 Jul 2024, 13:23 वाजता

NEETपेपरफुटी प्रकरणी CBI तपासात अनेक खुलासे

 

Neet Paper Leak Update : लातूर NEET पेपरफुटी प्रकरणात आत्तापर्यंत CBIच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. सुरुवातीला इराण्णा कोगलवार याला नांदेड एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं यावेळी इराण्णाने एटीएसची दिशाभूल केल्याचं समोर आलंय. इराण्णाच्या मुलीचे गुण वाढवण्यासाठी गंगाधर आणि  इराण्णाला यांच्यात 15 लाखांचा सौदा ठरला होता. यात एक लाख रुपये ऍडव्हान्स देण्याचे ठरलं होतं दोघे 2023 पासून संपर्कात होते असं  सीबीआय चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्राने दिली आहे. आरोपी जाधव आणि पठाण यांच्यातील महत्त्वाचा दुवा हा इराण्णा असल्याचा संशय सीबीआयला आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Jul 2024, 12:46 वाजता

Raigad Rain : रायगडच्या रोहा आणि परिसरात पावसाचा जोर वाढलाय.. कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडलीये.. कुंदलिकेची इशारा पातळी 23 मीटर, सध्याची पाणी पातळी 23.65 मीटर एवढी झालीये.. जिल्ह्यातील इतर नद्याही दुथडीभरुन वाहत आहेत.. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -