'खेळतात कमी बोलतात जास्त' दिग्गज खेळाडू बाबर आझमवर भडकला, कोहलीबद्दल म्हणाला...'

Younis Khan on Babar Azam: . बाबरला जेव्हा टीमची कॅप्टन्सी दिली होती, तेव्हा तो सर्वोत्तम बॅट्समन होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे तो म्हणाला.

Pravin Dabholkar | Updated: Sep 16, 2024, 11:06 AM IST
'खेळतात कमी बोलतात जास्त' दिग्गज खेळाडू बाबर आझमवर भडकला, कोहलीबद्दल म्हणाला...' title=
दिग्गज खेळाडू बाबर आझमवर भडकला

Younis Khan on Babar Azam: कधीकाळी पाकिस्तानी टीमचा दबदबा असायचा. शोएब अख्तर, वकार यूनिस, इंजमाम उल हक, शाहीद आफ्रीदी अशा खेळाडुंचा भरणा होता. पण मागच्या काही वर्षात पाकिस्तान टीमला आपला करिश्मा दाखवता आला नाहीय. खराब प्रदर्शनामुळे पाकिस्तानी टीमवर वारंवार टीका केली जातेय. आता पाकिस्तानी टीमचा माजी कॅप्टन यूनिस खानने आपल्या टीमच्या खेळाडुंना आरसा दाखवलाय. यूनिस खानने स्टार खेळाडू बाबर आझमवर निशाणा साधलाय. यामध्ये त्याने टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचा उल्लेख केलाय. कराची प्रिमियर लीगच्या पत्रकार परिषदेदरम्यान युनिस खान बोलत होता.

बाबर आझमने विराट कोहलीकडून शिकायला हवे,असे विधान यूनिस खानने बाबर आझमला उद्देशून केले आहे. बाबरला जेव्हा टीमची कॅप्टन्सी दिली होती, तेव्हा तो सर्वोत्तम बॅट्समन होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे त्याला स्वत:बद्दल विचार करायला हवा, असा सल्ला युनिस खानने दिला आहे. 

भविष्यात काय मिळवायचंय? याचा विचार करायला हवा 

बाबर आझमने कमी वयात खूप काही मिळवलंय. पण आपल्याला भविष्यात काय मिळवायचंय? हे त्याला आता समजायला हवे.कॅप्टन्सी करणं खूप छोटी गोष्ट आहे. तुम्हाला टीमचं भलं पाहायचंय. तुमचा परफॉर्मन्स वेळोवेळी सुधारायला हवा. देशासाठी पुन्हा खेळण्याची संधी मिळेल अथवा नाही मिळणार, ही गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायला हवी, असे युनिसने म्हटले. 

कोहलीचा उल्लेख कसा आला?

बाबर आझमला खडे बोल सुनावताना युनिस खानने विराट कोहलीचा उल्लेख केला. विराट कोहलीला पाहा. त्याने स्वत:हून कॅप्टन्सी सोडली आणि आपल्या बॅटींगवर लक्ष केंद्रीत केले.  यानंतर त्याने आपल्या बॅटींगचा स्तर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. तो सलग वेगळे रेकॉर्ड बनवत गेला. त्यामुळे कॅप्टन्सी टिकवणं नव्हे तर देशासाठी खेळणं ही खेळाडुची प्राथमिकता असावी, हे यातून बाबरने शिकायला हवं, असे युनिसने म्हटले. 

सोशल मीडियात विधान करण्यापेक्षा खेळावर लक्ष द्यायला हवे

पाकिस्तानी टीमचे खेळाडू सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. ते सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर आपली वेगवेगळी विधाने शेअर करुन चर्चेत येत असतात. युनिस खानने अशा प्लेयर्सनादेखील चांगली समज दिली आहे. या खेळाडुंनी आपल्या प्रदर्शनावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवे. आपल्या फिटनेसमध्ये सुधारणा आणली पाहिजे. सोशल मीडियाचा जितका कमीत कमी उपयोग करायला हवा.