Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

21 Jul 2024, 21:28 वाजता

महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जतमधील कॉलेज आणि शाळांना सुट्टी

 

Holiday announced for schools in Raigad : रायगड जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांमधल्या शाळा आणि कॉलेजेसना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलीय.. महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जत या 4 तालुक्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेस उद्या बंद राहणार आहेत.. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश दिले आहेत.. रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलाय. त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर केलीय.

 

21 Jul 2024, 20:31 वाजता

'डर्टी डझन आता भाजपमध्ये मंत्री', सुप्रिया सुळेंची अमित शाहांवर टीका

 

Supriya Sule on Amit Shah : अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा, खासदार सुप्रिया सुळे यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपने आरोप केलेले डर्टी डझन आज त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री असल्याकडे लक्ष वेधत, सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांच्या टीकेचा समाचार घेतला. त्याचवेळी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं सांगत, अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं. 

21 Jul 2024, 19:47 वाजता

चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती, उद्या  अंगणवाड्यांसह कॉलेज आणि  शाळांना सुट्टी

 

Chandrapur Rain : चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. यावर खबरदारीचा उपाय म्हणून उद्या जिल्ह्यातील अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनानं दिलाय.
तर गडचिरोली जिल्ह्यालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. तसंच उद्या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर खबरदारीसाठी उद्या जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिका-यांनी सुट्टी जाहीर केली आहे. 

21 Jul 2024, 18:01 वाजता

'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार', अजित पवारांची घोषणा

 

Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे.. राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुती आहे.. मात्र लोकसभा आणि विधानसभा जरी महायुती म्हणून लढत असू तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा अजित पवारांनी केलीय.. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका महायुतीतले घटक पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं दिसतंय..

21 Jul 2024, 17:24 वाजता

'उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते', अमित शाहांची टीका

 

Amit Shah on Uddhav Thackeray : पुण्यातून अमित शाहांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींवर जहरी टीका केलीय... स्वत:ला बाळासाहेबांचे वारस सांगणारे उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले असा घणाघात अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केला.. तर भ्रष्ट्राचाराचे सर्वात मोठे सूत्रधार शरद पवार असल्याची टीकाही अमित शाहांनी केलीय.. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचलमध्ये खटाखट पैसा द्या असं म्हणत अमित शाहांनी राहुल गांधींनाही टोला लगावलाय...

21 Jul 2024, 16:19 वाजता

'मैदानात उतरा ठोकून काढा', फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश

 

Devendra Fadnavis : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने कंबर कसलीय...विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी थेट फडणवीसांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेयत...ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करा...मैदानात उतरा ठोकून काढा...पण अट एकच आहे...हीट विकेट होऊ नका...तुम्ही सगळे मैदानात उतरले पाहिजेत, असा आदेशच फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेयत...

21 Jul 2024, 14:48 वाजता

Sanjay Raut On Amit Shah : केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्यापेक्षा मणिपूरकडे लक्ष घालावं...राज्यातल्या निवडणुकीवर दबाव टाकण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव टाका...राज्यात गृहमंत्रीच काय ट्रम्प, पुतीन यांना बोलावलं तरी राज्यात मविआचच सरकार येईल असा घणाघात राऊतांनी अमित शाहांवर केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Jul 2024, 13:37 वाजता

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

 

Mumbai Rain : मुंबईत पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.. तर काही भागात अतिमुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आलाय... दरम्यान आज पौर्णिमा असल्यामुळे समुद्रालाही मोठी भरती आहे.. त्यामुळे मुंबीतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीये.. 

21 Jul 2024, 13:12 वाजता

नवी मुंबईत मुसळधार पाऊस

 

Navi Mumbai Rain : नवी मुंबईतही मुसळधार पावसाला सुरुवात झालीये.. दिघा ते बेलापूर दरम्यान मुसळदार पाऊस सुरु आहे.. या पावसामुळे शहरांतील सखल  भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीये.. त्यामुळे नवी मुंबईतही रस्ते वाहतूक मंदावलीये. 

21 Jul 2024, 12:35 वाजता

भाजप नेत्यांची शरद पवारांवर टीका

 

Radhakrishna vikhe patil & Sundhir Mungantiwar on Sharad Pawar : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुधीर मुनगंटीवारांनी पवारांवर टीका केलीय...शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले पण, आरक्षण देऊ शकले नाही...जरांगेंचे गैरसमज दूर करू असं विखे पाटलांनी म्हटलंय...तर जरांगे पवारांचे उमेदवार पाडू असं कधी बोलतायत याचीच वाट बघतोय असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय...