21 Jul 2024, 12:32 वाजता
संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
Sanjay Raut On Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरेंमुळेच आमच्यासारखे लोक एका निष्ठेने दिसत आहेत.. मात्र आमच्यातून काही नासके आंबे निघाले. असा टोला संजय राऊतानी एकनाथ शिंदेंना लगावलाय.. गुरु म्हणून त्यांनी बाळासाहेबांचा फटो लावू नये असं आवाहनही त्यांनी केलंय.. धर्मवीर चित्रपटावरुनही त्यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केलाय..
21 Jul 2024, 11:31 वाजता
Mumbai Water : मुंबईकरांचा पुढील 5 महिन्यांसाठी पाणीप्रश्न मिटलाय. पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं सात धरणांत 5 लाख 92 हजार 866 दशलक्ष लीटर पाणी जमा झालंय. मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी धरणातून मुंबईला दररोज 3 हजार 850 दशलक्ष लीटरचा पाणीसाठा करावा लागतो. सध्या धरणात 41 टक्के पाणीसाठा जमा झालाय. हा पाणीसाठा लक्षात घेता डिसेंबर महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा जमा झालाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Jul 2024, 10:45 वाजता
Ajit Pawar Birthday Cake : अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हवं हे त्यांच्या असंख्य कार्यकर्ते नेत्यांचं स्वप्न आहे...अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत...त्यांनी सकाळी सांगवी मध्ये अतुल शितोळे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांचा मुलगा आदिराज शितोळे आणि त्याच्या साथीदारांनी दादांसाठी केक आणला...अजित पवार यांचा २२ जुलैला वाढदिवस असल्याने त्यांनी त्यांना केक कापण्याचा आग्रह केला. एरवी अजित पवार केक कापत नाहीत.. पण त्यांनी केक पहिला आणि केक वर लिहलेला मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...हा मजकूर वाचला आणि दादांनी केक ही कापला आणि थोडासा खाल्ला ही....कदाचित मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचा मजकूर त्यांना समाधान देवून गेला असावा..
बातमी पाहा - 'मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...'; दादांच्या केकवर CM पदाची शपथ
21 Jul 2024, 10:17 वाजता
वानराच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी
Kolhapur Monkey : कोल्हापुरात वानरांच्या टोळक्यानं विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय.. राजारामपुरी दहाव्या गल्लीत ही घटना घडलीये... पाटणे हायस्कूल समोर काही मुलं शनिवारी दुपारी खेळत होती. त्याचवेळी शाळेच्या परिसरातील झाडावर बसलेल्या वानरांच्या कळपाने अचानकपणे इथल्या मुलांच्या दिशेने धाव घेतली. शौर्य भोसले हा विद्यार्थी पळून बाजूला जात असताना एका वानराने पाठीमागून त्याच्या अंगावर उडी मारली. शौर्य जोरात रस्त्यावर आढळल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली. नागरिकांनी या वानरांना हुसकवून शौर्याची सुटका केली, पण या मध्ये शौर्य जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वानरांनी विद्यार्थ्यांवर केलेला हा हल्ला CCTV मध्ये चित्रित झाला आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Jul 2024, 09:51 वाजता
भंडाऱ्यात दमदार पावसामुळे नदी, नाले भरले
Bhadara Rain : भंडारा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे गोसेखुर्द पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आलेत. यात 23 दरवाजे एक मीटरने तर 10 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आलेत. त्यामुळे धरणाच्या पलीकडे असलेल्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय. गोसेखुर्द धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढ असल्यानं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
21 Jul 2024, 09:38 वाजता
Pune : लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरलीय. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीमार्फत लोकसभा मतदारसंघांना देण्यात येणाऱ्या आर्थिक निधीमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप खासदार कोल्हे आणि सुप्रिया सुळेंनी केला...बारामती शिरूर ऐवजी मावळला अधिक निधी दिला जात असल्याचा आरोप केला...यावर मावळचे आमदार सुनील शेळकेंनी आक्षेप घेतला. इतकी वर्षे बारामतीला जास्त निधी मिळत होता तेव्हा का बोलला नाहीत असे शेळके म्हणाले. हा वाद घडत असताना शरद पवारांनी निधी वाटपाचा तपशील जाहीर करण्याची मागणी वजा सूचना केली...त्यावर अजित पवार यांनी कुणाला किती निधी देण्यात आला याविषयीची माहिती काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यायत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Jul 2024, 09:17 वाजता
संततधार पावसामुळं वारणा नदीला पूर
Sangli Warna River : सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळतोय....त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडलीये... नदीवरील अनेक छोटे-मोठे बंधारे पाण्याखाली गेलेत...काल पासून वारणा नदीवरील मांगले-सावर्डे पूल पाण्याखाली गेलाय.....त्यामुळे कोल्हापूरच्या शाहूवाडी आणि शिराळा तालुक्याचा संपर्क तुटलाय....वारणा नदीचे पाणी शेतात घुसलंय..उसासह सोयाबीन आणि इतर पिकं पाण्याखाली गेल्याने शेतीचं मोठं नुकसान झालंय....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Jul 2024, 08:51 वाजता
सिटी को-ऑपरेटीव्ह बँकेचा परवाना रद्द
City Cooperative Bank License : तुम्ही जर सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी... भारतीय रिझर्व्ह बँकनं मुंबईतील सिटी को-ऑपरेटीव बँकेचा परवाना रद्द केलाय. सिटी को-ऑपरेटिव्ह बँक ही खासगी बँक आहे. या बँकेकडं पैसा शिल्लक नाही. त्यामुळे भविष्यात बँकेला उत्पन्न मिळणार नाही, असा ठपका भारतीय रिझर्व्ह बँकेनं ठेवलाय. परवाना रद्द होताच बँकेनं आपला व्यवहार बंद केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Jul 2024, 08:38 वाजता
मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं. सरसकट मराठ्यांना कुणबी करा, अशी मागणीही त्यांनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Jul 2024, 07:56 वाजता
राज्यात 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Rain Alert : राज्यासह मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूये.. . मुंबईत 1 ते 20 जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.. कोकणासह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.. रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.त्यामुळं बळीराजादेखील सुखावला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -