Student Bus Pass at School : शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 16 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Student Bus Pass at School : शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा

16 Jun 2024, 21:24 वाजता

'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' मोहिमेअंतर्गत एसटीचा पास थेट विद्यार्थ्यांच्या शाळेत

 

Student Bus Pass at School : शाळा - महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी आहे. 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' या विशेष मोहिमेंतर्गत एसटीचा पास थेट विद्यार्थ्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहे. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी विद्यार्थिनींचा एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहण्याचा त्रास वाचणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

16 Jun 2024, 20:47 वाजता

अभिनेता सलमानला व्हिडिओतून धमकी देणाऱ्याला राजस्थानमधून अटक

 

Salman Khan Threat : अभिनेता सलमान खानला व्हिडिओ पोस्ट करत धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय... राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील बोर्डा गावातून त्याला अटक करण्यात आलीये.. बिश्नोई गँगच्या नावाने सलमानला धमकी देण्यात आली होती... बनवारीलाल गुजर ट्वेंटीफाईव्ह या यू ट्यूब चॅनलवरून सलमानला धमकी देण्यात आली होती.. सलमान खान कुठे जातो याचीही माहिती व्हिडिओत देण्यात आली होती.. व्हिडिओत लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

16 Jun 2024, 19:56 वाजता

आत्महत्या थांबवा, नाहीतर राजकारण सोडेन.. पंकजा मुंडेंचं समर्थकांना भावनिक आवाहन

 

Pankaja Munde on Suicide : आत्महत्या थांबवा, नाहीतर राजकारण सोडेन, असं भावनिक आवाहन बीडमधील भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केलंय.. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. चिंचेवाडी येथील आत्महत्याग्रस्त वायबसे कुटुंबाला पंकजा मुंडेंनी भेट दिली. वायबसे कुटुंबाचा आक्रोश पाहून पंकजा मुंडेंनाही अश्रू अनावर झाले.. आत्महत्या करू नका, नाहीतर राजकारण सोडेन, असं भावनिक आवाहन त्यांनी यावेळी समर्थकांना केलं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

16 Jun 2024, 18:38 वाजता

EVM हॅक करणं अशक्य आहे.. ईव्हीएमसाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते- वंदना सूर्यवंशी

 

Election Commission on EVM : ईव्हीएम हॅक करणं अशक्य आहे.. ईव्हीएमसाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलंय.. वंदना सूर्यवंशी या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी आहेत.. तसंच चुकीची बातमी दिल्याबाबत एका वृतपत्राला नोटीस पाठवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

16 Jun 2024, 14:11 वाजता

'400पारनंतर भारत हिंदू राष्ट्र झालं असतं', टी राजांचं वादग्रस्त वक्तव्य

 

T. Raja Singh : भिवंडीतील धर्मसभेत हैदराबादमधील भाजप आमदार टी राजांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.. 400पारनंतर भारत हिंदू राष्ट्र झालं असतं असं टी राजा म्हणालेत.. त्यांच्या या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16 Jun 2024, 13:59 वाजता

'मनुष्य, AIकडून EVM हॅक करण्याचा धोका', एलन मस्क यांनी व्यक्त केली चिंता

 

Elon Musk on EVM : स्पेस एक्सचे CEO एलन मस्क यांनीदेखील EVM संदर्भात चिंता व्यक्त केलीय. EVM वापरणं बंद केलं पाहिजे असं मस्क म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडालीय. मनुष्य, आणि AI कडून EVM हॅक करण्याचा धोका असल्याचं मस्क म्हणालेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16 Jun 2024, 13:38 वाजता

'EVM हा एक ब्लॅक बॉक्स', राहुल गांधींची  EVMवरून टीका

 

Rahul Gandhi on EVM : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्ही ईव्हीएमवरून निशाणा साधलाय...EVM हा एक ब्लॅक बॉक्स आहे, EVM तपासाची कुणालाही परवानगी नाही, आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जातेय...जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसते तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.असं राहुल गांधींनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16 Jun 2024, 13:07 वाजता

कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती

 

Sangli Zilla Parishad School : कन्नड भाषिक शाळेमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती केल्याचा प्रकार सांगलीतील जत तालुक्यात उघडकीस आलाय.. जत तालुक्यातील 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी केलाय.. विशेष म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलीये. आता हे मराठी भाषिक शिक्षक कन्नड विद्यार्थ्यांना कसे शिकवतील असा सवाल आमदार विक्रम सावंत यांनी उपस्थीत केलाय.. जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे कन्नड विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16 Jun 2024, 12:34 वाजता

BJP आमदारांची पुण्यात भरणार कार्यशाळा

 

BJP : लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अलर्ट मोडवर आलंय. पुण्यात भाजपच्या आमदारांची कार्यशाळा भरणारेय. संघाकडून महत्त्वाच्या आमदारांना प्रशिक्षित करुन विधानसभेचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रानं दिलीय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या आठवड्यातच ही कार्यशाळा भरणारेय. 

16 Jun 2024, 12:13 वाजता

'मोदी-शाहा जेडीयू, टीडीपी पक्ष फोडतील', संजय राऊतांचा गंभीर आरोप

 

Chandrababu Naidu : खासदार संजय राऊतांनी मोदी-शाहांवर गंभीर आरोप केलाय...भाजपचा लोकसभा अध्यक्ष झाल्यास मोदी शाहा हे नितीशकुमार आणि चंद्राबाबूंचा पक्ष फोडतील असा आरोप राऊतांनी केलाय...चंद्राबांबूना लोकसभा अध्यक्षपद हवंय, त्यांनी उमेदवार दिल्यास आम्ही चर्चा करून पाठिंबा देऊ असंही राऊतांनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-