16 Jun 2024, 11:29 वाजता
संभाजीनगरात UPSCचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
Sambhajinagar UPSC Student Exam Missed : संभाजीनगरात यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेयत...गुगल मॅपमुळे रस्ता चुकल्याने परीक्षा केंद्रावर विद्यार्थी वेळेत पोहोचले नाहीत...त्यामुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेयत...यामुळे इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झालेयत...यूपीएससी परीक्षेसाठी संभाजीनगरातील विवेकानंद कॉलेज या ठिकाणी यूपीएससी परीक्षा पार पडत आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी संभाजीनगर आले आहेत मात्र या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या विवेकानंद कॉलेज हे केंद्र इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यामुळे त्यांनी गुगल मॅप च्या साह्याने परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र गुगल मॅप वर मूळ केंद्रापासून 11 किलोमीटरचे केंद्र दाखवत या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Jun 2024, 11:06 वाजता
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल
Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे खासदार रवींद्र वायकरांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिका-यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय...एम पंडिरकर हे रविंद्र वायकर यांचे नातेवाईक आहेत तर दिनेश गुरव निवडणुक अधिकारी आहेत...अमोल किर्तीकर आणि वायकर यांच्या थेट लढतीत 48 मतांनी वायकरांना विजयी घोषित करण्यात आले...गोरेगाव येथील नेस्को मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान रविंद्र वायकर यांचे नातेवाईक एम. पंडिरकर हे मोबाईल घेऊन आले होते. मतदान केंद्रावर मोबाईन नेण्यास सक्त मनाई असताना त्यांना निवडणुक अधिकारी दिनेश गुरव यांनी मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. हा प्रकार उघडकीस येताच भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वायकरांसह त्यांच्या नातेवाईक आणि निवडणुक अधिका-याविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली...या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांनाही चौकशीसाठी समन्स बजाविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Jun 2024, 10:26 वाजता
छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी...कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी तंबी..सुनावणीला हजर न राहील्यास अटक वॉरंट बजावणार..सुनावणी पुढे ढकलण्याचा अर्ज कोर्टानं फेटाळला
16 Jun 2024, 10:06 वाजता
मध्य रेल्वे, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
Mumbai Mega Block : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येतोय. त्यामुळे आज रेल्वेने प्रवास करत असाल तर वेळापत्रक पाहून बाहेर पडा. सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे. तर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असणारेय. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतोय..
16 Jun 2024, 09:37 वाजता
राज्यात 483 गावांवर दरड कोसळण्याचा धोका
Landslides : यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील 483 गावांवर दरड कोसळण्याचा धोका आहे. ही सर्व ठिकाणं राज्य सरकार निश्चित करून जिल्हा प्रशासानाला कळवले आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे. दरड कोसळून कुणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. तर नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात
16 Jun 2024, 09:04 वाजता
पुण्यातील सिग्नलची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे
Pune Police : पुण्यातील रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे देण्यात आलीये... आतापर्यंत महानगर पालिकेकडे ही जबाबदारी होती.. त्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडल्यानंतर पोलिसांना मनपाकडे चकरा माराव्या लागत होत्य.. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिग्नल यंत्रणेची जबाबदारी पोलिसांकडे सोपवलीये.. यामुळा आता सिग्नल दुरुस्तीसाठी येणारा सर्व निधी पुणे पोलिसांना मिळणार आहे..शहरातील जवळपास 50% सिग्नल सध्या बंद आहेत.. आता हे सगळे सिग्नल सुरु करण्याची जबाबदारी पुणे पोलिसांवर असणार आहे.
16 Jun 2024, 08:31 वाजता
'इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार',खासदार विशाल पाटलांचा जयंत पाटलांना इशारा
Vishal Patil on Jayant Patil : इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार, असा इशारा खासदार विशाल पाटलांनी जयंत पाटलांना दिलंय.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कसबे डिग्रज येथे आयोजित सत्कार समारंभात विशाल पाटलांसह आमदार विश्वजीत कदम उपस्थित होते. यावेळी विश्वजित कदमांनी इस्मालपूर-वाळवा मतदारसंघात 10 पटीने लक्ष देणार असं म्हणत जयंत पाटलांना अप्रत्यक्ष आव्हान दिलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Jun 2024, 08:02 वाजता
कोकणात महायुतीत अंतर्गत संघर्ष
Ratnagiri Banner War : सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतही बॅनर वॉर पाहायला मिळालाय...मंत्री उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचे बॅनर लागलेयत...या बॅनरवर बाप बाप होता है.. झुंड मे तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है अशा आशयाचा मेसेज लिहिण्यात आलाय...कालच सिंधुदुर्गात उदय सामंतांचा फोटो असलेल्या बॅनरवर वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशय लिहिण्यात आला होता...त्यामुळे आता रत्नागिरीतही बॅनर लागले असून...कोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Jun 2024, 07:42 वाजता
'केंद्र सरकार केव्हाही पडू शकते', अमोल कोल्हेंचं सूचक विधान
Amol Kolhe : शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारबाबत सूचक वक्तव्य केलंय...वस्ताद एक डाव राखून ठेवत असतो...केंद्रातील सत्ता गेली असली तरी ती आता पुरतीच गेलीय असं म्हणा...केंद्र सरकार केव्हाही पडू शकतं...असं सूचक विधान अमोल कोल्हेंनी केलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Jun 2024, 07:37 वाजता
मुंबईत पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, विक्रोळीत कंत्राटदाराला 25 हजारांचा दंड
Mumbai Rain : मुंबईत पहिल्याच पावसात 30 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्यात.. गेल्या आठवड्यात रविवारी संध्याकाळनंतर मुंबईत पडलेल्या पावसामुळे तब्बल ३० हून अधिक ठिकाणी पाणी साचल्याचं आढळू आलं..यापैकी नवीन ठिकाणे किती, जुनी किती याचा अभ्यास पालिका प्रशासनाने सुरू केलाय... दरम्यान, रविवारच्या पावसात विक्रोळीतील छोटे नाले साफ न केल्यामुळे पाणी तुंबल्याचे आढळून आल्याने संबंधित कंत्राटदाराला 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला... दरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी येतील त्या ठिकाणापासून 50 मीटर परिसरातील नाले तपासणी करुन तातडीनं उपाय योजना करण्याचे निर्देश मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलेत.