Pune Police Action on L3 Bar : पुण्याच्या L3 बारवर पोलिसांची कारवाई

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Pune Police Action on L3 Bar : पुण्याच्या L3 बारवर पोलिसांची कारवाई

23 Jun 2024, 19:50 वाजता

पुण्यातील L3 बार सील होण्याची शक्यता, बार मालक, पार्टनर, मॅनेजरसह 5 जण ताब्यात

 

Pune Police Action to L3 Bar : पुणे ड्रग्ज विक्री प्रकरण उजेडात आल्यानंतर आता पोलीस कारवाईला वेग आलाय... फर्ग्युसन रोडवरील L3 बारमधील ड्रग्ज सेवन प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 5 जणांना ताब्यात घेतलंय. त्यामध्ये बार मालक मानस मलिक, बारचे 3 पार्टनर आणि मॅनेजर संतोष कामठे यांचाही समावेश आहे. रवी माहेश्वरी, योगेंद्र आणि शर्मा अशी अन्य तिघांची नावं आहेत. हा L 3 बार सील होण्याची शक्यता आहे.. तिथले सीसीटीव्ही आणि साऊंड सिस्टीम पोलिसांनी जप्त केलीय.. तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं दारूसाठा जप्त केलाय.

 

23 Jun 2024, 19:16 वाजता

पुण्यातील लिक्विड लिझर लाऊंजमध्ये रात्री उशिरा चालणाऱ्या पार्ट्यांत ड्रग्ज विक्री

 

Pune Hotel Drugs : पुण्यातील बारमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय... पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज सेवन सुरू असल्याची नवी माहिती उघड झालीय... पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरील लिक्विड लिझर लाऊंज मधील एक व्हिडिओ व्हायरल झालाय.. या व्हिडिओत काही तरुण बाथरुममध्ये ड्रग्ज सेवन करताना दिसतायत... याठिकाणी अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती, असंही आढळून आलंय... दरम्यान, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

23 Jun 2024, 15:13 वाजता

'पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल', काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा दावा

 

Vishwajeet Kadam : पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून येतील...राज्यात वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजीत कदम यांच्या रुपात मुख्यमंत्री होणार असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय...यावेळी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल असा दावा काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी केलाय...

23 Jun 2024, 14:08 वाजता

'चिखल असला तरी कमळ येऊ देणार नाही', आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

 

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय...मैदानात चिखल आहे, पण इथे कमळ येऊ देणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय...वरळीतील फुटबॉल स्पर्धेच्या उद्धाटनाला आदित्य ठाकरे उपस्थित होते...यावेळी मैदानात चिखल असल्यावरून त्यांनी भाजपला टोला लगावला

23 Jun 2024, 13:42 वाजता

NEET प्रकरणाची CBI करणार चौकशी

 

CBI on NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरणाची आता CBI चौकशी करणारेय. बिहारमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारावर CBI नवीन गुन्हा दाखल करणारे. संपूर्ण प्रकरण आपल्या हातात घेऊन पेपरफुटीची चौकशी करणारेय.

23 Jun 2024, 13:18 वाजता

मुंबईतील बेलासिस उड्डाणपूल उद्यापासून बंद होणार 

 

Mumbai Bellasis Bridge Closed​ : मुंबईतला बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून बंद होणार आहे. मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा हा १३१ वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल आहे. सोमवारपासून पुढील १८ महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे.. या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात येणारेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

23 Jun 2024, 12:17 वाजता

'मुख्यमंत्री शेअर बाजारसारखा शिक्षकांचा भाव लावतात',संजय राऊतांचा गंभीर आरोप

 

Sanjay Raut  CM Shinde : मुख्यमंत्री शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावतात, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केलाय. जळगावच्या सभेत शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता. अंधारे यांची पाठराखण करताना राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराच राऊतांनी शिंदेंना दिलाय. पोलिंग एजेंटच्या याद्यांसोबत खर्चाला 500 रुपये दिले जातात. ही निवडणुकीची प्रक्रिया आहे, असं समर्थन मंत्री गुलाबराव पाटलांनी या पैसे वाटपाचं केलंय.

23 Jun 2024, 12:01 वाजता

'...विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल रुसेल', मनोज जरांगेंचा इशारा

 

Manoj Jarange : मराठा आणि कुणबी हा एकच असून, नोंदी मिळालेल्यांना आरक्षण द्या...अशी मागणी जरांगेंनी केलीय...तर सगेसोयरेसंदर्भात वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका...नाहीतर विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल रुसेल असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय...

23 Jun 2024, 11:26 वाजता

संभाजीनगरात 2 गटात हाणामारी, 4 जण गंभीर जखमी

 

Sambhajinagar Rada : दुचाकींचा धक्का लागल्याने संभाजीनगरात मध्यरात्री प्रचंड राडा झालाय. 2 गटात हाणामारी झाली. राजाबाजार भागातील एका गटाने दोन दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांना बेदम मारहाण केली. यात चौघेही जखमी झाले . तर स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनीही मारहाण करणाऱ्यांवर हल्ला केला. त्यात काही जण जखमी झाले. एकमेकांसमोर आल्याने बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी परिस्थितीवर पहाटेपर्यंत नियंत्रण मिळवले. घटनेची माहिती कळताच दोन्ही गटांतील प्रत्येकी ५० हून अधिक लोक किराणा चावडी भागात जमले. एक जमाव हल्लेखोरांना शोधत होता. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने या भागात बंदोबस्त वाढवला आणि जमावाला पांगवले.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

23 Jun 2024, 11:14 वाजता

पेट्रोल, डिझेल GSTच्या कक्षेत येणार?

 

Nirmala Sitharama : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 53 व्या जीएसटी परिषदेच्या बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी भारतीय रेल्वेच्या अनेक सेवा जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली.. पेट्रोल आणि डिझेल GSTच्या कक्षेत अणण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे मात्र त्यासाठी सर्व राज्यांनी येऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या

बातमीचा व्हिडीओ पाहा-