Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

LIVE Updates on June 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

24 Jun 2024, 10:26 वाजता

उद्या कोल्हापूर बंदची हाक

 

Kolhapur : उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलीय...शहर हद्दवाढ आणि सर्किट बेंच प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलीय...कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यातच आज मध्यरात्रीपासून रिक्षा आणि टॅक्सी देखील बंद ठेवण्यात येणार आहे...वाहनांसाठी पासिंग विलंब शुल्क आकारणी रद्द करावी यासाठी आज मध्यरात्रीपासून कोल्हापूर रिक्षा टॅक्सी वाहनधारक समितीतर्फे देखील आंदोलन छेडण्यात आलंय...उद्या गनिमी काव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळे फासण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 10:23 वाजता

दापोली-जामगे रस्ता खचला

 

Ratnagiri Road Close : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जामगे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ता खचलाय...डोंगरातून येणा-या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास 150 मीटर खचल्याने रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद करण्यात आलाय...जामगे रस्ता डोंगरातील मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पावसाच्या ठिकठिकाणी धोकादायक बनलाय. त्यामुळे प्रशासन पर्यायी मार्गाच्या शोधात आहे. परंतु संभाव्य धोका लक्षात घेता हा मुख्य रस्ता अनिश्चित काळासाठी काळासाठी बंद करण्यात आलाय...सध्या दापोली खेड राज्य मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून जामगे शिवतर रोडचा वापर केला जातोय...रस्ता खचल्याने दापोली प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 10:20 वाजता

ड्रग्ज प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल

 

Pune Drugs Update : पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी आता कारवाईला वेग आलाय...पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बारमालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल केलाय...एकूण चार कलम लावण्यात आलीय...कालच बारच्या टॉयलेटमध्ये ड्रग्जचं सेवन करतानाचा प्रकार उघडकीस आला होता...त्याप्रकरणी कारवाई करण्यात आलीय...आज दुपारी आठही जणांना कोर्टात हजर केलं जाणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 09:11 वाजता

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला जखमी

 

Hyderabad Dog Attack : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला तब्बल 15 भटक्या कुत्र्यांनी घेरून तिच्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय...धक्कादायक बाब म्हणजे महिला या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करत होती...मात्र, सगळे कुत्रे महिलेच्या अंगावर धावून जात होते...महिलेला खाली पाडून तिचा चावा घेण्याचा प्रयत्न केला...अखेर या महिलेनं कशीबशी या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून प्राण वाचवले...हा धक्कादायक व्हिडिओ हैदराबादच्या मणिकोंडा येथील चित्रपुरी हिल्समध्ये घडलीय...यापूर्वी याच परिसरात भटक्या कुत्र्यांनी या महिलेच्या मुलावरही हल्ला केला होता...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 09:07 वाजता

टी-20 वर्ल्ड कप - भारत वि. ऑस्ट्रेलिया मॅच

 

T-20 World Cup India Vs Australia Match : टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा थरार रंगणाराय.... सुपर 8 मध्ये अफगाणिस्ताननं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं आव्हान धोक्यात आलंय. आजच्या मॅचमध्ये कांगारूंची करो या मरोची स्थिती आहे. स्पर्धेत विराट-रोहित या ओपनर जोडीला दरमादर ओपनिंग करता आली नाही. त्यामुळे त्यांच्या खेळीकडं भारतीयांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, गेल्या वन-डे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी आज रोहित सेना मैदानात उतरणारेय. मात्र, आजच्या मॅचवर पावसाचं सावट आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 09:02 वाजता

राज्यात पुढील 8 दिवस पावसाचे

 

IMD Rain Alert : राज्यातील पुढील 8 दिवस मोसमी पावसाचे असणारेत. कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. मुंबईसह पश्चिम किनारपट्टी आणि कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर असणारेय. पुढील चार दिवस मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 08:22 वाजता

मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक

 

Mumbai MNS Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे नेते आणि पदाधिका-यांची आज बैठक होणार आहे...विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असून, मनसेकडून विधानसभेसाठी राज्यभरात उमेदवारांची चाचपणी केली जातेय...त्याबाबत आज बैठकीत चर्चा होण्याची शक्यताय...त्यामुळे मनसे विधानसभेला महायुतीतून लढणार की वेगळे लढणार याकडे लक्ष लागलंय...सकाळी 10 वाजता वांद्रे मधील MIG क्लब इथे बैठक होणार असून, या बैठकीला राज्यभरातील मनसेचे प्रमुख नेते, सरचिटणीस, तसेच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 07:56 वाजता

सूर्यकांता पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार?

 

Suryakanta Patil : माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय. त्यांनी नुकताच भाजप पक्षाला रामराम ठोकलाय. सूर्यकांता पाटील यांचा आजच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यताय. शरद पवार मुंबईत असल्याने दुपारनंतर पक्ष कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची शक्यताय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 07:51 वाजता

कोंडेश्वर धबधब्यावर तरुणांची स्टंटबाजी

 

Badlapur Kondeshwar Dam : बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर अतिउत्साही तरुण स्टंट करताना दिसतायत. त्यात लहान मुलांचाही समावेश असल्याचं समोर येतं. उत्साही पर्यटक कोंडेश्वर धबधब्यावर जातात आणि आपल्या जीवाला मुकतात. गेल्या 5 वर्षांत याच धबधब्यावरील कुंडात पाण्याचा अंदाज येत नसल्यानं 70हून अधिक तरूणांनी आपला जीव गमावलाय. त्यामुळे पर्यंटकांनो, धबधब्यावर जात असाल तर जरा जपून...स्वत:ची काळजी घेऊनच मौजमजा करा.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 07:26 वाजता

NEET घोटाळ्याचा लातूर पॅटर्न?

 

Latur NEET Connections : NEET परीक्षेतल्या घोटाळ्यावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. आता NEET घोटाळ्याचं लातूर कनेक्शन उघड झालंय. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांसह अन्य दोघांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नवीन पेपरफुटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यातल्या एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. नांदेडच्या एटीएस पथकानं शनिवारी 2 जिल्हा परिषद शिक्षकांना लातूरमधून चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं होतं.  अखेर आता काल रात्री उशीरा या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय तुकाराम जाधव, जलील उमरखान पठाण, ईरन्ना मष्णाजी कोनगलवार आणि गंगाधर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -