Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

LIVE Updates on June 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

24 Jun 2024, 22:31 वाजता

'महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट द्या', कंगना रनौतच्या मागणीने खळबळ

 

Kangana Ranaut : भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्रा कंगना रणौतने आपल्या मागणीने खळबळ उडवून दिलीय... खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात दाखल झाली.. आणि महाराष्ट्र सदनातल्या मुख्यमंत्र्यांच्या सूट म्हणजे दालनाची थेट मागणी केली. महाराष्ट्र सदनातल्या इतर रुम छोट्या असल्याने मुख्यमंत्र्यांचा सुट द्यावा अशी मागणी तीने केली. त्यासाठी महाराष्ट्र सदनातूनच महाराष्ट्रातला एका बड्या नेत्याला फोन करुन खटपटही केली.. मात्र मुख्यमंत्र्यांचा सुट देता येत नसल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सदनने दिलंय. त्यामुळे महाराष्ट्र सदनात राहण्याचा निर्णय कंगना रनौत बदलणार असल्याची चर्चा आहगे.. 

24 Jun 2024, 20:42 वाजता

के. पी. पाटील यांना दणका, बिद्रीचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प रद्द

 

K. P. Patil : माजी आमदार के पी पाटील यांच्या बिद्री सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प रद्द करण्यात आलाय. इथेनॉल निर्मिती आणि विक्री परवाना रद्द केल्यानं, कोल्हापुरातील या कारखान्याचं तब्बल 130 कोटींचं नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. महायुतीची साथ सोडून के पी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्यानं ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दुपारी कारखान्याचे चेअरमन के पी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर, लगेचच राज्य उत्पादन शुल्क विभागानी ही कारवाई केली. याआधी राज्य उत्पादन शुल्क विभागानं या कारखान्यावर धाडही टाकली होती. इथेनॉल प्रकल्पात अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवत तो रद्द केल्याचं कारण सांगितलं जातंय. 

24 Jun 2024, 19:31 वाजता

 देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर

 

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौ-यावर आहेत.. फडणवीस आणि बावनकुळे आज दिल्लीत भाजप पक्ष श्रेष्ठींच्या भेटी घेणार आहेत.. विधान परिषदेच्या निवडणुकीवर तसंच मंत्रिमंडळाच्या विस्तारावर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.. तसंच आगामी विधानसबेच्या निवडणुकीच्या ब्ल्यू प्रिंटवरही चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Jun 2024, 18:23 वाजता

'नवीन चेहऱ्यांना संधी देणार',शरद पवारांचं मोठं वक्तव्य

 

Sharad Pawar : अजित पवारांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय. तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नवीन चेह-यांना संधी दिली जाणार आहे.मुंबईमध्ये अध्यक्ष शरद पवार यांनी ही माहिती दिली. सोडून गेलेल्या आमदारांच्या जागी नवीन चेहरे दिले जाणार आहेत. तसंच नवीन चेह-यांना संधीबाबत पक्षात सकारात्मक वातावरण असल्याचंही पवार म्हणाले. पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेह-यांना संधी देऊ असं त्यांनी सांगितलं. 

24 Jun 2024, 18:00 वाजता

पुणे L3 बार प्रकरण, 8 आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी

 

Pune L3 Bar Drug Case : पुण्यातील L3 बार प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. L3 बार ड्रग्ज विक्री प्रकरणी 8 आरोपींना सत्र न्यायालयानं 29 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणातला 1 आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेली पुण्यनगरी ड्रग्ज फॅक्टरी होत चालली आहे का, असा प्रश्न यामुळे विचारला जातोय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 Jun 2024, 17:13 वाजता

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना प्रोटोकॉल देण्यास नकार

 

Ujjwal Nikam : अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना प्रोटोकॉल देण्यास नकार देण्यात आला. राजशिष्टाचार विभागानं उज्ज्वल निकम यांना प्रोटोकॉल द्यायला नकार दर्शवला. निकम यांची 10 जूनला सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीला काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Jun 2024, 16:38 वाजता

'मी पालकमंत्री असताना असं घडत नव्हतं', चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

 

Chandrakant Patil Vs Suraj Chavan : पुणे ड्रग्ज प्रकरणावरून आता दादा विरुद्ध दादा वाद रंगलाय... मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा चिंताजनक गोष्टी घडत नव्हत्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय.. त्यांचा रोख विद्यमान पालकमंत्री अजित पवारांवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटानंही त्यावर तिखट पलटवार केलाय... अंमली पदार्थांना उत्तेजन चंद्रकांत पाटील यांच्याच काळात मिळालं. उलट अजित पवारांमुळे अवैध छुपे धंदे उघडकीस आले असा पलटवार अमोल मिटकरींनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 Jun 2024, 16:11 वाजता

कशेडी बोगद्यात अनेक ठिकाणी गळती

 

Kashedi Bogda : खेडमधील कशेडी बोगद्यातली गळती वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यामुळे कशेडी बोगद्यातून प्रवास करताना पावसाचा अनुभव येतो. यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या तज्ज्ञांकडून पाहणी केली जाणार आहे. 2 किलोमीटर लांबीचा कशेडी बोगदा 2 महिन्यापूर्वी वाहतुकीस खुला झालाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाकरे पक्षानं आंदोलनाचा इशारा दिलाय. 

24 Jun 2024, 15:25 वाजता

भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीत मीडियाला घेऊन जाणारी बोट नदीत तुटली

 

Bhandara Wainganga River :  भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीत बोट तुटली... मीडियाला घेउन जाणारी बोट नदीत तुटली...बचाव पथक वेळेवर पोहोचल्यानं अनर्थ टळला..

24 Jun 2024, 15:09 वाजता

नाशिक शिक्षक मतदारसंघात तक्रार

 

Nashik Teachers Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षकांना पैठणी, सफारीचे कापड आणि नथ वाटप करणा-यांची चौकशी होणाराय...सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आलीय...विभागीय आयुक्त कार्यालयाने मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात त्वरीत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिलेयत...नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. बुधवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीच्या आदेशाने वाटप करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-