Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 26 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

26 Jun 2024, 22:29 वाजता

'ड्रग्ज, होर्डिंग, निधीवरून सरकारला घेरा', उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना

 

Uddhav Thackeray : उद्यापासून सुरु होणा-या अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या सूचना, उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना केल्या आहेत. तसंच ड्रग्ज, होर्डिंग आणि सत्ताधारी आमदारांना अधिकचा निधी यावरुन सरकारला घेरण्याचे आदेश त्यांनी आमदारांना दिलेत. तर शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दररोज प्रश्न विचारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. आपण स्वतः अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याची ग्वाही त्यांनी आमदारांना दिली. अधिवेशन पार्श्वभूमीवर आयोजित आमदार बैठकीत उद्धव यांनी या सूचना केल्या. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

26 Jun 2024, 21:31 वाजता

'विरोधकांचा अधिवेशनात पर्दाफाश करणार', देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांनां इशारा

 

Devendra Fadnavis : चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला..खोटं नरेटिव्ह तयार करायची फॅक्टरी विरोधकांनी उभारल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तसंच विरोधकांचा पर्दाफाश करण्याचे काम अधिवेशनात करण्याचा इशाराही फडणवीसांनी दिलाय. तर दुसरीकडे पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचे श्लोक नसल्याचं स्पष्ट करत अजित पवारांनी मनुस्मृतीचा वादही निकालात काढलाय.. विरोधकांनी खोटं नॅरेटिव्ह पसरवलं.. तरीही केंद्रात सत्ता आली नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला लगावलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

26 Jun 2024, 19:15 वाजता

सोलापुरात ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांची बॅनरबाजी 

 

Solapur : शरद कोळींना विधान परिषदेवर घेण्यासाठी शिवसैनिकांनी सोलापुरात बॅनरबाजी केलीय. विधान परिषदेवर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना घेण्याची मागणी या बॅनरच्यामाध्यमातून करण्यात आलीय. - सोलापुरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून निष्ठावंत शरद कोळी असं म्हणत बॅनर झळकावण्यात आलेत. सोलापुरातील सात रस्ता या ठिकाणी बॅनर लावून शरद कोळींना आमदार करण्याची शिवसैनिकांनी मागणी केलीय. 
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

26 Jun 2024, 18:27 वाजता

महाड-रायगड मार्गावरील वाहतूक ठप्प, 25-30 गावांचा महाड शहराशी संपर्क तुटला

 

Mahad : महाड ते रायगड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. लाडवली इथं पर्यायी मार्गावरून पाणी वाहू लागल्यानं 25 ते 30 गावांचा महाड शहराशी संपर्क तुटला. लाडवलीमधील पुलाचं काम अर्धवट राहिल्यानं त्याचा फटका नागरिकांना बसला. महाड तालुक्यात जोरदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि नदीपात्रातून काढलेल्या पर्यायी मार्गावरून पाणी वाहू लागलं. विशेष म्हणजे झी २४ तासनं नदीपात्रातून काढलेल्या पर्यायी मार्गाबाबतची बातमी दाखवली होती. तसंच या प्रकरणी स्थानिकांनी आंदोलनही केलं होतं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Jun 2024, 17:48 वाजता

'मिटकरींच्या तोंडाला आवर घाला', प्रवीण दरेकरांची अमोल मिटकरींवर टीका

 

Amol Mitkari Vs Pravin Darekar : महायुतीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसतंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती, त्याला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत मिटकरी यांच्या तोंडाला आवर घालण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, आता महायुतीतील नेत्यांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

26 Jun 2024, 17:33 वाजता

पुण्यातील बालसुधारगृह हाऊसफुल्ल

 

Pune Child Reform Home : पुण्यातील बालसुधारगृह हाउसफुल्ल झालंय. अल्पवयीन मुलांकडून होणा-या गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय. चोरी, बलात्कार,खुनाचा प्रयत्न आणि खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. सध्या बालसुधारगृहात केवळ 50 मुलं राहण्याची क्षमता आहे. तर निरीक्षण गृहात सध्या 70 मुलांचं वास्तव्य आहे. येरवडा परिसरात असणा-या बालसुधारगृहातही मुलांच्या संख्येत वाढ झालीय. यामुळे प्रशासनावर ताण पडतोय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

26 Jun 2024, 16:17 वाजता

'या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन', उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

 

Uddhav Thackeray : उद्यापासून सुरु होणा-या विधीमंडळाच्या अधिवेशनावरुन उद्धव ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. उद्यापासून सुरु होणारं विधिमंडळाचं अधिवेशन या सरकारचं शेवटचं अधिवेशन असेल.. आणि या अधिवेशनाला आपण उपस्थित राहू असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

26 Jun 2024, 15:43 वाजता

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा BMCला मिळणार

 

Mumbai Mahalaxmi Race Course : महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिलीय. महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागेत सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणारेय. 1914 साली रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षांच्या लीजवर ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर हा करार 2013 मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर या जमिनीवर थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रकल्पात थीम पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनर असा समावेश होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. थीम पार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करणे गरजेचे होते. ही 211 एकर जागा आहे. त्यामध्ये 91 एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे, तर उर्वरित 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली जाईल. आतापर्यंत ही जागा लीजवर देण्यात आली होती. दरम्यान यावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय....मुख्यमंत्र्यांच्या कॉन्ट्रक्टर मित्रांना हे रेसकोर्स मिळू नये अशी मागणी त्यांनी केलीये....

बातमीचा व्हिडीओ पाहा-

26 Jun 2024, 15:15 वाजता

'शेतकरी, सामन्यांची लूट करणारं सरकार',विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

 

Vijay Wadettiwar : शेतक-यांची लूट सुरू असून हे लूट करणारं सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केलाय... त्याचबरोबर सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय...तर विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे अधिवेशन वादळी होणार असल्याचं संकेत विरोधकांनी दिलेत...महाविकास आघाडीची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर बैठक झाली...यावेळी सरकारला घेरण्याची रणनीती या बैठकीत ठरल्याचं समजतंय...तर बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप करत अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत दिलेत...

26 Jun 2024, 14:02 वाजता

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार?

 

State Vidhimandal Adhiveshan : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यताय. या अधिवेशनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाल्यामुळे मविआचा आत्मविश्वास वाढलाय. तर अनेक मुद्द्यांवरून सरकारी पक्षांमध्ये असलेला विसंवाद गेले काही दिवस समोर येतोय. सध्या असलेली विरोधकांची एकी अधिवेशनात कायम ठेवणं हे विरोधकांसमोरील आव्हान असेल तर विसंवादाचा धागा दूर करून एकत्र येणं हे महायुतीसाठी गरजेचं असेल. अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील.