Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 26 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

26 Jun 2024, 08:03 वाजता

पुण्यात झिका व्हायरचा शिरकाव

 

Pune Zika Virus : पुण्यात झिका व्हायरसनं शिरकाव केलाय.. शहरातील एरंडवणा परिसरात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आलेत.. एका डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झालीये.. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये झिका व्हायरसची अद्याप कोणतिही लक्षणं आढळून आलेली नाहीत... झिका हा रोग एडीस इजिप्ती या डासांमुळे होतो. त्यामुळे  पुणे महानगर पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाय सुरु केलेत. रुग्ण आढळेल्या परिसरात औषध फवारणी सुरु केलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jun 2024, 08:01 वाजता

शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी मतदान

 

Shikshak-Padvidhar Election : विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झालीये... तसंच नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरसाठीही मतदान प्रक्रिया सुरु झालीये. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंधपणे लढत असली तरी महायुतीत मात्र बिघाडी झाल्याचे चित्र पहायला मिळालंय. नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीसमोर बंडखोरीचे संकट नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या संदीप गुळवेंचा मार्ग सुकर झालाय. दुसरीकडे भाजपशी संबंधित मात्र अपक्ष असलेले विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार एडवोकेट महिंद्र भावसार रिंगणात आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना बंडखोरीचा तोंड द्यावे लागणार आहे. या चौघांमध्येच खरी लढत रंगणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jun 2024, 07:58 वाजता

लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

 

Loksabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून अटीतटीचं राजकारण पाहण्यास मिळतंय. अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणारेय. एनडीएकडून ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तर इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस खासदार के.सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षपदासाठी आज सकाळी 11 वाजता निवडणूक होणारेय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आता सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आलाय. काँग्रेसनं सर्व खासदारांना संसदेत हजर राहण्याच्या सूचना दिल्यायत. देशाच्या इतिहासात तिस-यांदा लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणाराय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सहमतीच न झाल्यामुळे ही निवडणूक लागलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -