मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलं, 'या' अभिनेत्यासोबत...

Mohammed Shami - Sania Mirza : मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलंय की, शमी नाही तर 'या' अभिनेत्यासोबत...

नेहा चौधरी | Updated: Jun 28, 2024, 02:01 PM IST
मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलं, 'या' अभिनेत्यासोबत... title=
Sania Mirza made it clear during the talk of marriage with Mohammed Shami she will marry salman khan

Mohammed Shami - Sania Mirza : माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर तिच्या दुसऱ्या लग्नाची बातमीची अफवा पसरलीय. सानिया मिर्झा ही क्रिकेटपटू मोहम्मद शमीसोबत लग्न करणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीय. नुसती लग्न करणार अशी चर्चा नाही तर 19 ऑगस्टला साखरपुडा आहे, असंही बातमी समोर येत आहे. मोहम्मद शमी सध्या टी टी-20 वर्ल्ड कप 2024 खेळत नसला तरी सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. या अफवेनंतर सानिया मिर्झाचे वडील यांनी या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याच म्हटलंय. 

शमी नाही तर 'या' अभिनेत्यासोबत...

तरदुसरीकडे सानिया मिर्झा हिने मोहम्मद शमीऐवजी तिला बॉलिवूडमधील सुपरस्टार आवडतो असं सांगितलंय. सोशल मीडियावर सानियाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये कॉफी विथ करणमध्ये तिने सलमान खानवर आपलं प्रेम असल्याच म्हटलं होतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी या व्हिडीओ वरून सानियाला शमीशी नाही तर सलमान खानशी लग्न करायच आहे, असं गणित जोडलंय. 

सलमान खान अविवाहित असून सानियाने घटस्फोट घेतला आहे. अशातच या दोघांनी लग्न करावं असं नेटकऱ्यांनी कमेंट्स केले आहेत. दरम्यान सानिया मिर्झा आणि सलमान खान हे दीर्घ काळापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेक इव्हेंटमध्ये त्यांचे सोबत भरपूर फोटो आहेत. एवढंच नाही तर बिग बॉस शो दरम्यानही सलमान खान आणि सानिया मिर्झाची भेट झाली होती. या दोघांची भेट फराह खान हिने घालून दिली होती. ऑन स्क्रीनशिवायही सानिया आणि सलमान अनेक खासगी कार्यक्रमातही भेटत असतात. 

त्यामुळे या मैत्रीचं रुपांतर लग्नात झालं पाहिजे असं नेटकरी आणि चाहत्यांची इच्छा आहे. पण नेटकऱ्यांच्या या इच्छेवर सानिया किंवा सलमान यांनी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही.