Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 26 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

26 Jun 2024, 13:51 वाजता

हिजाब बंदीला मुलींनी दिलेलं आव्हान कोर्टानं फेटाळलं

 

Mumbai : मुंबईतील चेंबूर इथल्या आचार्य मराठे कॉलेजनं घातलेली हिजाब, बुरखा आणि नकाबबंदी योग्य असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिलाय. नकाबबंदीच्या विरोधातली याचिका हायकोर्टानं फेटाळलीय. महाविद्यालयाच्या परिसरात हिजाब, नकाब आणि बुरख्यावरची बंदी केवळ एक समान ड्रेसकोडसाठी लागू करण्यात आलीय. मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणं हा त्यामागचा हेतू नसल्याचा युक्तिवाद या कॉलेजनं केलाय. आचार्य मराठे कॉलेजनं हिजाब, नकाब, बुरखा, स्टोरी, टोपी आणि इतर कुठल्याही प्रकारच्या बॅजवर बंदी घातली. या निर्णयाला 9 विद्यार्थिनींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं.

26 Jun 2024, 11:49 वाजता

लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्लांची निवड

 

Loksabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदासाठी आवाजी मतदानाने NDAचे उमेदवार ओम बिर्ला यांची निवड झालीय. पंतप्रधान मोदींनी ओम बिर्लांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्याला एनडीएच्या घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता. तर इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश यांच्या नावाचा अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळेंनी प्रस्ताव मांडला. विरोधकांनी निवडणुकीची मागणी न केल्यामुळे आवाजी मतदानानंच ओम बिर्लांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी त्यांना आसनापर्यंत पोहोचवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सभागृहाकडून बिर्लांचं अभिनंदन केलं. ओम बिर्लांनी नवा इतिहास रचला असं यावेळी मोदी म्हणाले. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jun 2024, 10:44 वाजता

राज्यात पावसाची दडी, पेरण्या खोळंबल्या

 

Maharashtra Monsoon : मुंबई शहर आणि उपनगरांसह 11 जिल्ह्यांत पावसानं दांडी मारलीय. त्यामुळे शेतक-यांच्या पेरण्या खोळंबल्यात. कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसानं सरासरी गाठलीये. मात्र नंदुरबार, संभाजीनगर, धाराशिव, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतक-यांना दमदार पावसाची ओढ लागलीये. अनेक ठिकाणी पेरण्यांची काम पूर्ण झालीयेत. मात्र पेरणीयुक्त पाऊस नसल्यानं शेतक-यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यताय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jun 2024, 10:40 वाजता

पुण्यात महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी

 

Pune Women Fight : पुण्याच्या हवेली तालुक्यातील रहाटवडे गावात महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली.. जमिनीच्या वादातून गावातील दोन कुटुंबतल्या महिला एकमेकींना भिडल्या.. त्यांच्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.. घटनास्थळी काही पुरुषही हजर होते. मात्र कोणीही हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही गुन्हाची नोंद नाहीये.. मात्र खेडशिवापूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - पुण्यात महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

 

26 Jun 2024, 10:38 वाजता

राज्यात लवकरच बाईक-टॅक्सी?

 

Bike-Taxi Service : राज्यात लवकरच बाईक टॅक्सी सुरु होण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याची तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलये.. यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.. तसंच एकट्या प्रवाशाला रिक्षा आणि टॅक्सीचालकांची आरेरावी सहन करावी लगाणार नाही.. शिवाय या सेवेमुळे वाहतूक कोंडीलाही आळा बसण्याची शक्यता आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jun 2024, 09:48 वाजता

पुणे महापालिका अ‍ॅक्शन मोडवर 

 

Pune : पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर पुण्यात जवळपास 144 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. महिनाभरात 85 रुफ टॉप आणि तळमजल्यावर असलेल्या  55 हॉटेल्स, पब वर कारवाई करण्यात आलीय. जवळपास 3 लाख चौरस फुटांचं बांधकाम पाडून टाकण्यात आलंय. तर अनधिकृत बांधकाम केल्यामुळे आतापर्यंत 21 जणावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jun 2024, 09:15 वाजता

वंचितच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार

 

Buldhana Firing : बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार झाल्याची घटना समोर आलीय. वचिंतचे उप-तालुकाध्यक्ष सुनील बोदडे आणि युवा आघाडीचे प्रकाश भिसे हे नांदुरावरून जळगाव जामोदकडं येत होते. यावेळी खांडवी-आसलगाव दरम्यान त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी लोखंडी रॉडनं हल्ला केला. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्ला कोण केला याचा शोध पोलीस घेत आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jun 2024, 08:20 वाजता

पठाण आणि त्याच्या बायकोच्या नावावर 7 लाखांचे व्यवहार

 

Neet Paper Leak Update : NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी जलील आणि त्याच्या पत्नीच्या नावावर जून महिन्यात 7 लाखांहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. आरोपी जलील पठाण आणि संजय जाधव यांनी बीड जिल्ह्यातून 5 पालकांची फसवणूक केलीय. पैसे घेऊन कामच केलं नसल्याची माहिती समोर आलीय. तर आतापर्यंत 14 जणांची फसवणूक झाल्याचंही समोर आलंय. या सर्व पालकांची मुलं लातूरच्या खासगी क्लासेसमध्ये नीटची तयारी करतात. आरोपी जलील पठाणनं पालकांकडून घेतलेले पैसे पत्नीच्या खात्यावर स्वीकारले. त्यानंतर ते पुढे संजय जाधवला पाठवण्यात आल्याचं समोर आलंय. एकट्या जून महिन्यात पती-पत्नीच्या खात्यावर 7 लाखांपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा 

26 Jun 2024, 08:18 वाजता

नीटमधील आरोपी कोनगलवार पत्नीसह फरार

 

Neet Paper Leak Update : लातूरमधील नीट घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेला धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याच्या आयटीआयचा सुपरवायझर इरण्णा मष्णाजी कोनगलवार हा पत्नीसह फरार झाला आहे. नांदेडच्या एटीएसने पहिल्या दिवशी त्याची चौकशी करून सोडून दिले होते. तेव्हापासून तो बेपत्ता झाला आहे. दुसरीकडे संजय जाधव व पठाणमार्फत मिळणारे पैसे कोनगलवार हा दिल्लीतील सूत्रधार गंगाधर याला पाठवायचा. गंगाधर च्या शोधासाठी नांदेड एटीएसचे आणि लातूर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले होते. मात्र या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे कळताच गंगाधर ही दिल्लीतून गायब झाला. तो सतत जागा बदलत असल्याचे मोबाइल लोकेशनवरून पोलिसांना कळले. तो डेहराडूनला असल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिस तिकडे निघाले, पण गंगाधरन तिथूनही पसार झालाय.. दिल्ली ला गंगाधर ला पैसे मिळाले की तो डेहराडून ला कुणाला तरी द्यायचा असे ही तपासात आता पुढे आले आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jun 2024, 08:06 वाजता

NEET पेपरफुटी प्रकरणाचं लोण बीडपर्यंत

 

Neet Paper Leak Beed Connection : NEET पेपरफुटी प्रकरणी महत्त्वाची अपडेट बातमी बीडमधून... पेपरफुटी प्रकरणाचं लोण आता बीडपर्यंत पोहोचलंय. माजलगावमधल्या 7 शिक्षकांची यासंदर्भात चौकशी झाल्याची माहिती समजतेय. NEET पेपरफुटी प्रकरणी तपास करणा-या विशेष पथकाकडून या शिक्षकांची चौकशी करण्यात येतेय. आरोपी जलील पठाण आणि संजय जाधव हे दोघेही स्वत: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. ते ज्या शिक्षकांची मुलं लातूरला NEETच्या तयारीसाठी येत होती त्याच पालकांना ते हरत असल्याचं समजतंय. यात बीड जिल्ह्यातील नेकनूरसह अन्य भागांतील 7 शिक्षकांचा समावेश आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -