1 Nov 2024, 19:12 वाजता
अजित पवारांची अरविंद सावंतांवर टीका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शायना एनसी यांच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही अरविंद सावंतांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय...शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अशी वक्तव्य शोभत नसल्याचं अजित पवार म्हणालेत...लाडक्या बहिणींचा सन्मान करणा-या राज्यात अशा वक्तव्यांना स्थान नसल्याचं अजित पवार ट्विटकरत म्हणालेत...पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अजित पवार काय म्हणालेत...
1 Nov 2024, 19:09 वाजता
अरविंद सावंतांच्या विधानाचा नीलम गोऱ्हेंकडून समाचार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार अरविंद सावंत यांच्या शायना एनसी संदर्भातील विधानाचा, शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी खरपूस समाचार घेतला. मराठी ग्राम्य भाषेत माल हा शब्द अपमानास्पद स्वरुपात वापरला जातो. या प्रकरणी आपण अरविंद सावंतांविरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहोत. तसंच त्यांच्यावर कारवाईची मागणीही आपण करणार असल्याचं नीलम गो-हे यांनी सांगितलं.
1 Nov 2024, 17:54 वाजता
25 नोव्हेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन?
Sansad Winter Session : 25 नोव्हेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन चालणार असल्याचं समजतंय. तर जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये 26 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन होणार असल्याचं सांगण्यात आलंय. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी जुन्या संसद भवनामधील सेंट्रल हॉलमध्ये राज्यघटना स्वीकारली गेली होती. त्याला यंदा 75 वर्षं पूर्ण होत आहे. त्या ऐतिहासिक दिवसाचं स्मरण म्हणून, सेंट्रल हॉलमध्ये संयुक्त अधिवेशन घेतलं जाणार असल्याचं समजतंय.
1 Nov 2024, 16:05 वाजता
विधानसभेतील बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेतील बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु केलेत.. भाजपातील नाराजांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुढाकार घेणार आहेत.. परिस्थिती नुसार बंडखोरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यावरही भर देण्यात येणार आहे... त्यामुळे देवेंद्र फडणवीस बोरिवलीतील बंडखोर नेते गोपाळ शेट्टींचीही भेट घेण्याची दाट शक्यता आहे..
1 Nov 2024, 15:48 वाजता
कोल्हापुरात अश्लील पार्टीवर पोलिसांचा छापा
Kolhapur Party : कोल्हापुरात अश्लील पार्टीवर पोलिसांनी छापा मारलाय.. गगनबावड्यातील कोदे इथल्या नयनिल फार्म रिसॉर्टवर पोलिसांनी ही कारवाई केलीये.. या कारवाईदरम्यान 9 तरुणींसह 31जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात मुंबई, पुणे, सांगलीसह कोल्हापुरातील नागरिकांचा समावेश आहे.. पार्टीत या तरुणी अश्लील हावभाव करत असल्याचं आढळून आलंय. या कारवाईत पोलिसांनी दारु, मोबाईलसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.
1 Nov 2024, 15:28 वाजता
नांदेडमध्ये मविआत बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नांदेडच्या नायगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यानं बंडखोरी केलीय.राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे पूत्र शिरीष गोरठेकर यांनी बंड पुकारलाय. समर्थकांची बैठक घेऊन अपक्ष लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. या मतदारसंघात काँग्रेसकडून मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळालीय. त्या अशोक चव्हाणांचे मेव्हणे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या सून आहेत. या बंडामुळे मीनल खतगावकरांना फटका बसण्याची शक्यता आहे.
1 Nov 2024, 15:21 वाजता
माल शब्दावरुन आरोप-प्रत्यारोप
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अरविंद सावंत यांनी माल म्हणून संबोधल्याचा आरोप शायना एनसी यांनी केलाय. तसा व्हिडिओ त्यांनी दाखवून सावंत यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केलाय.. यातून सावंत आणि ठाकरेंच्या शिवसेनेची मानसिकता दिसत असल्याचं त्यांनी म्हटलंय.. तर माल या शब्दाचा चुकीचा अर्थ शायना एनसी यांनी घेतल्याचं सावंत म्हणालेत.. त्यांच्याविषयी माल शब्द वापरला नसल्याचं स्पष्टीकरण सावंत यांनी दिलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
1 Nov 2024, 14:47 वाजता
नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबरला नाशिकमध्ये येणार आहेत... धुळ्यांनतर नाशिकमध्येही त्यांची जाहीर सभा होणार आहे.. निवडणुकीसाठी महायुतीनं स्टार प्रचारकांना मैदानात उतरवलंय. नाशिकमध्ये मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे यांच्याही प्रचार सभांची मागणी करण्यात आलीये.गिरीष महाजनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळाची पाहणी केली...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
1 Nov 2024, 13:29 वाजता
रश्मी शुक्लांना पदावरून हटवा- संजय राऊत
Sanjay Raut on Rashmika Shukla : काँग्रेस नेते नाना पटोलेंपाठोपाठ खासदार संजय राऊतांनीही रश्मी शुक्लांवर आरोप केलेत. रश्मी शुक्ला आजही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन टॅप करतात, असा आरोप राऊतांनी केलाय. पदाधिका-यांना तडीपार करून राज्यातील निवडणुका ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरूये आणि याचा सूत्रधार रश्मी शुक्ला आहेत. निवडणूक आयोग त्यांना पदावरून का हटवत नाही? असा सवाल राऊतांनी निवडणूक आयोगाला विचारलाय.
1 Nov 2024, 13:07 वाजता
माहीममध्ये सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम
Sada Sarvankar : सदा सरवणकर माहीम मतदार संघातून लढण्यावर ठाम आहेत.. माघार घेणार नसल्याचं सरवणकर म्हणालेत.. महायुतीनं तिकीट दिलं असून आता माघार घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.. निवडणूक लढू आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. वर्षा बंगल्यावर कोणतीही बैठक झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.. राज ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली त्यांनी वेळ दिल्यावर भेटणार असल्याचं त्यांनी म्हटलंय..