Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 29 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

29 Nov 2024, 16:31 वाजता

सोमवारी भाजपच्या विधीमंडळ नेत्याची निवड होणार?

 

BJP : सोमवारी भाजपच्या विधीमंडळ नेत्याची निवड होणार?...भाजपची विधीमंडळ नेता निवड सोमवारी?... भाजपचे पक्षनिरीक्षक दिल्लीतून मुंबईत येणार...सोमवारपासून सरकार स्थापनेच्या हालचाली

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

29 Nov 2024, 15:52 वाजता

5 डिसेंबरला महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी - सूत्र

 

Swearing-in ceremony of the State Cabinet :  5 डिसेंबरला महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी - सूत्र...आझाद मैदानावर सरकारचा शपथविधी - सूत्र...लवकरच होणार अधिकृत घोषणा - सूत्र...अखेर सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला - सूत्र 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

29 Nov 2024, 12:44 वाजता

फडणवीस विदर्भातील बॅकलॉग भरुन काढतील - वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यांतर विदर्भातील बॅकलॉग भरुन काढतील आणि विदर्भाचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही असं वडेट्टीवार म्हणालेत.. अजितदादा आणि एकनाथ शिंदेंची उपयुक्तता संपल्यात जमा असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Nov 2024, 12:07 वाजता

शिवसेनेकडून महत्त्वाच्या खात्यांची मागणी-सूत्र 

 

Shivsena Cabinet Demand : नव्या सरकारमध्ये शिवसेनेकडूनही महत्त्वाच्या खात्यांची मागणी होतेय. जवळपास शिवसेनेने 12 खात्यांची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दिल्लीतल्या कालच्या बैठकीनंतर आजच्या मुंबईतल्या बैठकीत या खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं सांगितलंय. इतकंच नाही तर शिवसेनेने मागितलेलं गृहखातं देण्यास भाजपने नकार दिल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय....

29 Nov 2024, 11:51 वाजता

सरकार EPFO 3.0 ची घोषणा करण्याची शक्यता

 

Possibility Of Government Announce EPFO 3.0 : कर्मचारी पेन्शन योजनेत सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यामुळे येत्या काळात पीएफ खातेधारकांना अधिक लाभ मिळू शकतात. ज्यांना निवृत्तीनंतर अधिक पीएफची रक्कम हवी, त्यांना अधिक टक्के रक्कम भरण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो, त्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्रालयानं दिली आहे. सरकार EPFO 3.0 ची घोषणा करू शकतं. त्यामुळे बेसिक वेतनातून 12 टक्के रकमेची मर्यादा काढून टाकली जाईल. त्या ऐवजी जास्त पीएफसाठी जास्त रक्कम भरण्याची मुभा मिळेल, याबाबत विचार केला जातोय. तसंच PF मधले पैसे खातेधारकांना एटीएममधून काढण्याची सुविधा दिली जाऊ शकते, त्याचाही विचार सुरू आहे, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे.  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Nov 2024, 11:05 वाजता

राष्ट्रवादीची महत्त्वाच्या खात्यांची मागणी - सूत्र

 

NCP Demand : नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून 10 मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. राष्ट्रवादीनं  8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. आज मुंबईत खाते वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Nov 2024, 10:26 वाजता

शरद पवारांना धमकावणाऱ्याला कारावासाची शिक्षा

 

Sharad Pawar : शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या आरोपीला अटक करण्यात आलीय. बिहारमधून ही अटक करण्यात आली. आता त्याला  गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने दीड वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. शरद पवारांच्या  'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी लँडलाईनवर २५ ते ३० कॉल्स करून आरोपीने त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. तसंच शरद पवारांना देशी कट्ट्याने उडवू अशी धमकीही दिली होती. 2 डिसेंबर 2022चं हे प्रकरण होतं.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Nov 2024, 10:11 वाजता

भारतात धावणार पहिली हायड्रोजन ट्रेन

 

Hydrogen Train : लवकरच भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन सुरु होणार आहे.. 8 कोच असलेल्या या ट्रेनची पहिली झलक तुम्ही झी 24तासवर पाहू शकता.. ही ट्रेन ताशी 110 किमी वेगानं धावणार आहे.. ही ट्रेन डिझेल किंवा वीजेवर धावणार नसून ती चक्क हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून करणार आहे. या ट्रेनची पहिली ट्रायल रन हरियाणाच्या जिंद-सोनीपत मार्गावर होणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Nov 2024, 09:13 वाजता

टोमॅटोच्या शेतात गांजाची लागवड

 

Chandwad Ganja Seized : रविंद्र गांगुर्डे यांच्या मालकीच्या टोमॅटोच्या शेतात २१५ किलो वजनाची ६५ गांजाची झाडं लावण्यात आली होती. चांदवड तालूक्यातील वडनेर-भैरव पोलीस ठाणे हद्दीतील तपनपाडा,दुधखेड शिवारात जिल्हा प्रमुखांच्या विशेष पोलीस पथकाने छापा टाकत कारवाई केली. याची किंमत १२,लाख ९३ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी रविंद्र गांगुर्डेविरोधात वडनेर-भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Nov 2024, 09:11 वाजता

पुण्यातील टेकड्यांवर सीसीटीव्ही आणि लाईट बसवले जाणार

 

Pune : पुण्यातील टेकड्यांवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि लाईट बसवले जाणारेत....यासाठी पुणे पोलिसांकडून राज्य सरकारकडे अहवाल पाठवला जाईल..त्यासाठी 13 हून अधिक टेकड्या आणि सात ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेत...