नागा साधु आणि त्यांच्या रहस्यमय गोष्टींबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. पण तुम्ही कधी महिला नागा साधु यांच्याबद्दल माहिती जाणन घेतली आहे. पुरुष नागा साधू यांच्याप्रमाणेच महिला नागा साधू देखील ईश्वराची भक्ती आणि साधनेला समर्पित असतात. त्यांच जीवन कठीण असून त्यामध्ये अनुशासन, तप आणि पूजा - पाठ याचा समावेश असतो. महिला नागा साधु सामान्य महिलांच्या तुलनेत अतिशय वेगळं आयुष्य जगतात. त्या कायम भक्तीमध्ये लीन असतात. असेच महिला नागा साधु यांच्या जीवनाशी निगडीत रहस्यमय आणि रोमांचक गोष्टी.
महिला नागा साधु होण्यासाठी मोठी कठीण आणि दिर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी महिलांना 6 ते 12 वर्षे ब्रम्हचर्य नियमांचे पालन करावे लागते. या दरम्यान संसारातील इच्छा आणि मोह मायेपासून स्वतःला दूर ठेवावे लागते. सगळी नाती तोडून स्वतःला देवाला समर्पित करावे लागते. जर या कठोर अनुशासनचे पालन केले तर गुरु त्यांना नागा साधु होण्याची इच्छा पूर्ण करतात.
नागा साधु होण्याअगोदर या महिलांना मुंडन करावे लागते. या प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचे असते पिंडदान. महिला नागा साधु होण्यासाठी त्यांना जिवंतपणी स्वतःचे पिंडदान करावे लागते. पिंडदानाचा अर्थ आहे की, महिला आपली जुनी ओळख आणि जगापासून पूर्णपणे मुक्त होतात. मृत्यूनंतर केली जाणारी सर्व क्रिया आता करावी लागते. यानंतर महिला साधुंचा आध्यात्मिक प्रवास सुरु होतो आणि त्यांच संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केले जाते.
पुरुष नागा साधू पूर्णपणे नग्न राहतात. मात्र महिला नागा साधु राखाडी रंगाचे वस्त्र घालू शकतात. पण महत्त्वाचं हे कपडे कुणीच कुठून शिवून घेऊ नये. तसेच त्या आपल्या माथ्यावर टिका आणि भस्म लावतात. महिला नागा साधु फारच कमी दिसतात. त्यांना कुंभ मेळ्यात पाहिले जाते. महिला नागा साधु पुरुष नागा साधुंच्या मागे चालतात. पण त्यांच्या स्नानाची जागा मात्र वेगळी असते. महिला नागा साधु अतिशय सामान्य जीवन जगतात. त्या जमिनीवर झोपतात, अतिशय सामान्य आहार घेतात आणि कोणत्याही प्रकारच्या सुख-सुविधांपासून लांब राहते.