Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 02 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 Oct 2024, 11:54 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पीए निवडणुकीच्या रिंगणात

 

Chief Minister Eknath Shinde PA In Election : नांदेडमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीए बालाजी खतगावकर निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांनी मुखेड विधानसभेवर दावा करत थेट भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांना आव्हान दिलंय. खतगावकरांनी मुखेडमधून निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. मुखेडमधून परिवर्तन रॅली काढत त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीये. यावेळी महायुतीला उमेदवार निवडून येणं महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2024, 11:31 वाजता

Ramesh Chennithala & Nana Patole : 2024 साली मविआचं सरकार येणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलाय.. अमित शाहांनीही मविआचं सरकार येणार असल्याचं मान्य केल्याचंही चेन्नीथला म्हणालेत... तर मविआचं जागावाटप जवळपास ठरलं असल्याचं नाना पटोले म्हणालेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2024, 11:24 वाजता

अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे आक्रमक

 

Sambhajiraje Facebook Post : अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेत शिवप्रेमींना आवाहन केलंय . येत्या सहा तारखेला सकाळी 11 वाजता मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ येण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलंय. 24 डिसेंबर 2016 रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन करण्यात आलं होतं.  या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील केल्याचं सरकारी दफ्तरी नोंद आहे. मात्र,स्मारकाच्या कामाला अद्याप सुरूवात देखील न झाल्यानं शिवप्रेमी नाराज आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2024, 10:35 वाजता

नवरात्रीत अधिकाधिक जागा घोषित करु - विजय वडेट्टीवार

 

Nagpur Vijay Wadettiwar : जागावाटपात आम्ही खूप पुढे गेलोय. नवरात्रीत अधिकाधिक जागा आम्ही घोषित करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिलीये. तर यासंदर्भात  8,9,10 ऑक्टोबरला सलग बैठक होणार असल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2024, 10:19 वाजता

पुण्यात हेलिकॉप्टर अपघातात 3 जणांचा मृत्यू

 

Pune Helicoptar Accident : पुण्यात खासगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय. बावधन परिसरात ही घटना घडली. दाट धुक्यामुळं हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे. सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झालाय. त्यांचे मृतदेह रेस्क्यू करण्यात यश आलं असून डीजीसीएकडून पुढची चौकशी केली जातेय. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात झाला. 

बातमी पाहा - पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं! तिघांचा मृत्यू; 'या' नेत्याला आणण्यासाठी मुंबईत येताना अपघात

2 Oct 2024, 10:14 वाजता

भामट्याकडून बनावट कोर्ट तयार करुन फसवणूक

 

Fake Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.. पण ते खरं आहे.. बनावट सुप्रीम कोर्ट तयार करून भामट्यांनी एस. पी. ओसवाल यांना तब्बल 7 कोटींचा गंडा घातलाय.. ओसवाल यांच्यावर आधार कार्डचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.. त्याचाच फायदा भामट्यांनी घेतला.. ओसवाल यांना स्काईप कॉल करून त्यांच्याविरोधात सुनावणी सुरू असल्याचं भामट्यांनी भासवलं. त्यासाठी खोटं सुप्रीम कोर्ट तयार करण्यात आलं... तसेच बनावट सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हेही दाखवण्यात आलेत.. कोर्टात सुनावणी सुरू असल्याचा विश्वास त्यानंतर ओसवाल यांना बसला.. भामट्यांनी सुनावणी झाल्यानंतर ओसवाल यांच्याविरोधात ऑर्डर पास केली आणि त्यांना बँक खात्यात 7 कोटी रुपये भरण्यास सांगितलंय.. पोलिसांनी याप्रकरणी आता दोघांना अटक केलीय... तर 5 कोटी रुपये भामट्यांकडून हस्तगत करण्यात आलेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2024, 08:37 वाजता

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला

 

Chandrapur : चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय.... पावसाचा जोर ओसरल्यामुळे, व्याघ्र प्रकल्प खुला केलाय.. त्यामुळे पुन्हा एकदा ताडोबात  पर्यटकांची रेलचेल सुरू होईल... स्थानिक लोकांच्या रोजगाराला आणि अर्थव्यवस्थेलाही  मोठी चालना मिळणारेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2024, 08:14 वाजता

सांगलीत आजी-माजी खासदारांमध्ये जुंपली

 

Sangli : सांगलीत आजी-माजी खासदारांची चांगलीच जुपली. विशाल पाटील रंग बदलणारा सरडा आहे, अशी टीका माजी खासदार संजयकाका पाटलांनी केलीय. विशाल पाटील अपघाताने झालेला खासदार असल्याचं संजयकाकांनी म्हटलं. तर दुसरीकडे विद्यमान खासदार विशाल पाटलांनीही संजयकाकांवर पलटवार केलाय. लोकसभेत पराभूत झाल्यानं ते वैफल्यग्रस्त काका बनलेत, अशी टीका विशाल पाटलांनी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2024, 08:01 वाजता

पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून मदत

 

Flood Help : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळालेत. निधी वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळालंय.. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2024, 07:59 वाजता

महाविकासआघाडीची आज महत्त्वाची बैठक

 

Mumbai MVA Meeting : महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणारेय. विधानसभा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यानं मविआचं बैठकीचं सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आज दुपारी 2 वाजता पुन्हा महत्त्वाची बैठक पार पडणारेय. बैठकीत जागावाटपाचा मुद्दा विदर्भावर येऊन थांबलाय. यावर तोडगा काढण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक होणारेय. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष दोघांनी दावा केलेल्या जागांवरचा तिढा अजून सुटलेला नाही. विदर्भातील जास्तीत जास्त जागा लढण्यावर काँग्रेस ठाम आहे. तर ठाकरे गटानंही विदर्भातील काही जागांवर दावा केलाय. त्यामुळे चर्चेचं गु-हाळ विदर्भाच्या मुद्द्यावर अडकलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -