दिवाळी अगोदरच मुकेश अंबानींकडून जियो युझर्सला खास गिफ्ट! Free कॉलिंगसोबत....

मुकेश अंबानींच्या जिओ रिलायन्सने आपल्या रिचार्च प्लानचे दर वाढवले होते. यामुळे युझर्स नाराज झाले होते. या ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी जिओने नवा प्लान आणला आहे. युझर्सला दिवाळी अगोदर खास गिफ्ट. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 3, 2024, 09:10 AM IST
दिवाळी अगोदरच मुकेश अंबानींकडून जियो युझर्सला खास गिफ्ट! Free कॉलिंगसोबत....  title=

जिओने यावर्षी जुलै महिन्यात ग्राहकांना नाराज केलं होतं. मोबाइल रिचार्जचे दर वाढल्यामुळे अनेक युझर्सने वेगळ्या पर्यायाचा विचार करायला सुरुवात केली होती. जिओ पाठोपाठ एअरटेल आणि वीने देखील दर वाढवले गहहोते. जिओने 15% पर्यंत दर वाढवले होते. यामुळे अनेक युझर्सने BSNL कडे गेले. या दरम्यान BSNL ने देखील रिचार्ज प्लान स्वस्त केले होते. 

जिओने आता 999 रुपये आणि 899 रुपयाचे दोन रिचार्ज प्लान बाजारात आणले आहे. दिवाळीच्या अगोदरच मुकेश अंबानींनी हा प्लान बाजारात आणला आहे. हा रिचार्ज जवळपास 90 दिवस चालणार आहे. या दोन्ही प्लानमधील सगळ्यात बेस्ट प्लान कोणता? 

999 रुपयांचा प्लान

रिचार्ज 999 रुपयांमध्ये 98 दिवसांचा प्लान मिळणार आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि 100 फ्री एसएमएस मिळणार आहेत. जर तुम्ही जिओच्या 5G नेटवर्क परिसरात असाल तर तुम्हाला अनलिमिटेड 5G डाटा मिळणार आहे. या प्लानमध्ये एकून 196GB डेटा मिळणार आहे.

899 रिचार्ज प्लान 

हे रिचार्ज 899 रुपयांचे असून 90 दिवस चालते. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 मोफत एसएमएस मिळतील. याशिवाय, तुम्हाला 5G नेटवर्क भागात 20GB अतिरिक्त डेटा आणि अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 200GB डेटा मिळेल.

कोणता प्लान सर्वात बेस्ट 

Jio चे Rs 999 आणि Rs 899 चे प्लान जवळपास सारखेच आहेत. पण त्यांच्यात दोन मोठे फरक आहेत. 899 रुपयांचा प्लॅन 90 दिवसांसाठी आहे आणि त्यात 200GB डेटा उपलब्ध आहे. त्याच वेळी, 999 रुपयांचा प्लॅन 98 दिवसांसाठी आहे आणि त्यात 196GB डेटा उपलब्ध आहे.

तर, जर तुम्ही 999 रुपयांच्या प्लॅनसाठी गेलात तर तुम्हाला 100 रुपये अधिक खर्च करावे लागतील, परंतु तुम्हाला 899 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 4GB कमी डेटा मिळेल. 999 रुपयांचा प्लॅन 8 दिवसांपर्यंत चालतो, परंतु तुम्हाला 20GB अतिरिक्त डेटा हवा असल्यास, तुम्हाला 98 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये हा 20GB डेटा मोफत उपलब्ध आहे.